advertisement

Sikander Shaikh : आधी हात कुणी उचलला? हल्ल्यानंतर 'महाराष्ट्र केसरी' सिकंदर शेखची पहिली प्रतिक्रिया! पठ्ठ्यानं मन जिंकलं

Last Updated:

Sikander Shaikh Kusti Controversy : कुस्ती सुरू असताना कोकाटेच्या एका समर्थकाने सिकंदरवर हात उचलल्याचं पहायला मिळालं. अशातच या संपूर्ण प्रकरणावर सिंकदर शेखची पहिली प्रतिक्रिया समोर आली आहे.

Sikander Shaikh First Reaction On Mulshi Kusti Controversy
Sikander Shaikh First Reaction On Mulshi Kusti Controversy
Sikander Shaikh Kusti Video : महाराष्ट्राचा प्रसिद्ध मल्ल आणि तरुणाईच्या गळ्यातील ताईत असलेला सिकंदर शेख गेल्या काही दिवसांपासून चर्चेच्या केंद्रस्थानी आहे. पुण्यातील मुळशी येथील पौड गावामध्ये महाशिवरात्रीच्या निमित्ताने कुस्तीचा सामना आयोजित करण्यात आला होता. या कुस्तीला सिकंदर शेख अन् माऊली कोकाटे यांची कुस्ती लागली होती. या सामन्यात वाद झाल्याचं पहायला मिळालं. कुस्ती सुरू असताना कोकाटेच्या एका समर्थकाने सिकंदरवर हात उचलल्याचं पहायला मिळालं. त्यामुळे मोठा राडा झाला. अशातच या संपूर्ण प्रकरणावर सिंकदर शेखची पहिली प्रतिक्रिया समोर आली आहे.

11 लाखाची कुस्ती...

मुळशीच्या पौंड तालुक्यात 17 फेब्रुवारीला महाशिवरात्री उत्सवानिमित्त मल्लिकार्जुन कुस्ती किताब स्पर्धा भरवण्यात आली होती. 11 लाखाची कुस्ती यावेळी आयोजित करण्यात आली होती. जवळपास दीड तास चाललेल्या कुस्तीच्या स्पर्धेत सिकंदर शेख आणि माऊली कोकाटे यांच्यात तगडी फाईट पहायला मिळालं. कुस्ती सुटत नसल्याने दोन्ही मल्ल थकल्यासारखं पहायला मिळालं. तर माऊली कोकाटे याने सिकंदरच्या कानठाळी देण्यास सुरूवात केली. त्यावर सिकंदरने त्याला ताकीद देखील दिली होती. पण...
advertisement

माऊलीने सिकंदरला कानठाळी दिली 

सिकंदरने वॉर्निंग दिल्यानंतर माऊली थांबला नाही. माऊलीने पुन्हा सिकंदरला कानठाळी दिली. त्यामुळे मॅचमध्ये वादावादी सुरू झाली. त्याचवेळी माऊलीचा एक कट्टर समर्थक थेट आखाड्यात उतरला अन् त्यानं सिकंदरवर हात उचलला. त्यावेळी सिकंदर चांगलाच भडकला अन् पंचांनी सामना थांबवला. काही वेळाने राग शांत झाल्यानंतर सामना पुन्हा सुरू करण्यात आला पण निकाल काहीच लागला नाही. त्यामुळे दोन्ही मल्लांना विजयी घोषित करण्यात आलं. त्यावर सिकंदरने महाराष्ट्र टाईम्सशी बोलताना आपली बाजू मांडत सौम्य प्रतिक्रिया दिली अन् विषय संपवला आहे.
advertisement

आमची बॉडी गरम होती... - सिकंदर शेख

आमच्यात जे झालं ना ते काही रागारागात झालं. आम्ही कुस्तीत होतो अन् आमची बॉडी गरम होती. त्यामुळे ते झालं. मला कुणालाही बदनाम करायचं नाही. कोकाटेसोबत एक पोरगं होतं तो माझ्या अंगावर धावून आला. त्याची मला फाईट बसली. तो जो कोण होता तो कोकाटे सोबत असतो. हा मोठा विषय नाही पण बाहेरून रिंगमध्ये येऊन मारणं चुकीचं आहे, असंही सिकंदर शेख म्हणाला.
advertisement

माऊली कोकाटेचा सन्मान ठेवला

दरम्यान, सिकंदर शेख शांत स्वभावाचा मल्ल मानला जातो. सिकंदरच्या टेकनिकसमोर इतर मल्ल गार होतात. त्यामुळे महाराष्ट्रात सिकंदरला मोठा मानणारा वर्ग आहे. यावेळी देखील सिकंदरने माऊली कोकाटेचा एक मल्ल म्हणून सन्मान ठेवल्याचं पहायला मिळालं. मात्र, बाहेरून येऊन कुस्ती खेळत असलेल्या मल्लावर धावून जाणं हे देखील न पटणारी गोष्ट निश्चितच आहे.
view comments
मराठी बातम्या/स्पोर्ट्स/
Sikander Shaikh : आधी हात कुणी उचलला? हल्ल्यानंतर 'महाराष्ट्र केसरी' सिकंदर शेखची पहिली प्रतिक्रिया! पठ्ठ्यानं मन जिंकलं
Next Article
advertisement
करोडो लोकांना Income टॅक्स नोटीस, करदात्यांच्या मनात धडकी; 'NUDGE' Notice आली तर काय करावे, काय टाळावे
करोडो लोकांना Income टॅक्स नोटीस, करदात्यांच्या मनात धडकी; काय करावे, काय टाळावे
  • आयकर विभागाची NUDGE नोटीस

  • दुर्लक्ष केलं तर अडचण वाढणार

  • काय करावे, काय टाळावे?

View All
advertisement