Toxic Teaser : 1 मिनिटं 55 सेकंद नुसता वॉयलेन्स, 'धुरंधर 2' ला टक्कर द्यायला येतोय यशचा 'टॉक्सिक', VIDEO
- Published by:Minal Gurav
Last Updated:
यशच्या 'टॉक्सिक' सिनेमाचा टीझर रिलीज झाला आहे. हा सिनेमा रिलीज होताच 'धुरंधर 2' आणि 'डकैत'ला काटे की टक्कर देणार आहे.
यशच्या बहुप्रतिक्षित 'टॉक्सिक: अ फेयरीटेल फॉर ग्रोन-अप्स' या चित्रपटाचा टीझर प्रदर्शित झाला आहे. निर्माते आणि यश यांनी त्यांच्या सोशल मीडिया अकाउंटवर सर्व भाषांमधील टीझर शेअर केला आहे. टीझर शेअर करताना यशनं सांगितलंय की सर्वात हिंसक अवतारात दिसणार आहे. 1 मिनिट 55 सेकंदाच्या टीझरमध्ये हिंसाचाराशिवाय दुसरे काहीही दाखवले नाही. टीझर एका पार्टीने सुरू होतो. पार्श्वभूमीत एक आवाज येतो, 'यावेळी युद्ध वेगळे आहे'. त्यानंतर गोळीबार होतो. एक सर्कस दिसतो आणि आत अनेक गुंड दिसतात.
कथेची सुरुवात सर्कसच्या सेटिंगने होते आणि पूर्व आशियाई थीम असलेल्या पार्श्वभूमीवर जाते ज्यामध्ये वेगवेगळ्या युगांची झलक दिसते. संपूर्ण टीझर गडद आहे. टीझरमध्ये हिंसाचार आणि हाय-ऑक्टेन व्हिज्युअल्स कथाकथनकाचे बारकावे आणि स्ट्राँग परफॉर्मन्स पाहायला मिळतोय.
advertisement
'टॉक्सिक'च्या टीझरमध्ये यश पूर्णपणे बदललेला दिसतो. त्याचं बॉडी ट्रान्सफॉर्मेशनल सिनेमाचा मोठा प्लस पॉइंट आहे. तो कधीकधी बारीक आणि चपळ, तर कधीकधी अवजड आणि युद्धासाठी सज्ज असल्याचा दिसतोय. टीझर रिलीज होताच, सगळे वेडे होणार आहेत असं निर्मात्यांनी म्हटलं आहे.
advertisement
'टॉक्सिक'चा टीझर रिलीज होताच चाहत्यांनी सोशल मीडियावर या चित्रपटाला ब्लॉकबस्टर म्हणायला सुरुवात केली आहे. एका चाहत्याने लिहिले, 'यश बॉस दाढीशिवाय, एक अनएक्सपेक्टेड लूक.' दुसऱ्याने लिहिलंय, 'हिंसाचाराला प्रवृत्त करणारा राया 19 मार्चला येतोय.'
'टॉक्सिक'ची 'धुरंधर 2' आणि 'डकैत' सोबत फाइट
"टॉक्सिक: अ फेयरीटेल फॉर ग्रोन-अप्स" हे चित्रपट कन्नड आणि इंग्रजीमध्ये एकाच वेळी शूट करण्यात आला आहे. ज्याचं डब व्हर्जन हिंदी, तेलुगू, तमिळ आणि मल्याळममध्ये करण्यात आलं आहे. या चित्रपटात कियारा अडवाणी, नयनतारा, रुक्मिणी वसंत, तारा सुतारिया आणि हुमा कुरेशी यांच्याही महत्त्वाच्या भूमिका आहेत. हा चित्रपट 19 मार्च 2026 रोजी थिएटरमध्ये रिलीज होणार आहे. बॉक्स ऑफिसवर त्याची स्पर्धा रणवीर सिंगच्या 'धुरंधर 2' आणि आदिवी शेषच्या 'डकैत' सोबत होणार आहे. तिन्ही सिनेमे एकाच दिवशी रिलीज होणार आहेत.
Location :
Mumbai,Maharashtra
First Published :
Feb 20, 2026 2:01 PM IST
मराठी बातम्या/मनोरंजन/
Toxic Teaser : 1 मिनिटं 55 सेकंद नुसता वॉयलेन्स, 'धुरंधर 2' ला टक्कर द्यायला येतोय यशचा 'टॉक्सिक', VIDEO










