AUS vs IND 2nd ODI : दुसऱ्या वनडेमध्येही शुभमन गिल तीच चूक करणार? गंभीरचा हट्ट टीम इंडियासाठी ठरतोय घातक?
- Published by:Saurabh Talekar
Last Updated:
Sitanshu Kotak explains the Kuldeep Yadav situation : व्यक्तिगत विचार करण्याऐवजी संघाच्या कामगिरीचा आणि बॅलन्सचा विचार केला जातो, असं सितांशू कोटक यांनी कुलदीपच्या प्लेइंग इलेव्हनमध्ये खेळण्यावर म्हटलं आहे.
AUS vs IND 2nd ODI : ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या पहिल्या वनडे सामन्यात आघाडीचा फिरकी गोलंदाज कुलदीप यादव याला बाहेर बसावे लागले तर ऑलराऊंडर खेळाडू वॉशिंग्टन सुंदर आणि नितीश कुमार रेड्डी यांनी पहिल्या एकदिवसीय सामन्यात अंतिम इलेव्हनमध्ये स्थान मिळवलं. अशातच कुलदीप यादवला संघात का घेतलं जात नाही? यावर टीम इंडियाचे बॅटिंग कोच सितांशू कोटक यांनी पत्रकार परिषदेत उत्तर दिलं आहे.
कुलदीप यादवला का घेतलं जात नाही?
कुलदीप यादवला का घेतलं जात नाही? असा सवाल सितांशू कोटक यांना पत्रकार परिषदेत विचारला गेला. त्यावेळी, विकेट पाहून तुम्ही जेव्हा टीमचा बॅलेन्स पाहिला तर त्यावरून नंबर 8 वर कोण खेळणार? याचा निर्णय होईल. पीचनुसार ठरेल की, नंबर 8 वर ऑलराऊंडर खेळवायचाय की बॅट्समन खेळवायचा, असं सितांशू कोटक म्हणाले आहेत.
advertisement
संघाच्या कामगिरीचा आणि बॅलन्सचा विचार
खेळपट्टीचा स्वभाव पाहूनच हेड कोच यांनी निर्णय घेतला. सर्वासोबत चर्चा करून ते निर्णय घेतात, असंही कोटक म्हणाले. व्यक्तिगत विचार करण्याऐवजी संघाच्या कामगिरीचा आणि बॅलन्सचा विचार केला जातो, असं सितांशू कोटक यांनी म्हटलं आहे.
रोहित आणि कोहलीवर निर्णय घेणे खूप घाईचे
advertisement
रोहित आणि कोहली दोघेही खूप अनुभवी आहेत. त्यांनी ऑस्ट्रेलियात येण्यापूर्वी कसून तयारी केली होती. मला वाटते की आत्ताच त्यांच्याबद्दल निर्णय घेणे खूप घाईचे आहे. त्यांनी नुकतेच कसोटी क्रिकेटमधून निवृत्ती घेतली आहे, असंही कोटक म्हणाले. आम्हाला त्यांच्या फिटनेस पातळीबद्दल आणि मालिकेपूर्वीच्या त्यांच्या तयारीबद्दल माहिती होती. आम्हाला एनसीएकडून त्यांचे व्हिडिओ मिळाले. जर तुम्हाला असे वाटत असेल की ते योग्य काम करत आहेत, तर तुम्हाला लगेच हस्तक्षेप करण्याची गरज नाही, असंही कोटक म्हणालेत.
advertisement
जास्त हस्तक्षेप करू नका
दरम्यान, जास्त हस्तक्षेप करण्याचा प्रयत्न करणे हा सर्वोत्तम मार्ग असू शकत नाही. विराट आणि रोहित दोघेही चांगल्या फॉर्ममध्ये दिसत होते. त्यांनी नेटमध्ये चांगली फलंदाजी केली. खरे सांगायचे तर, मला वाटते की ते चांगले प्रदर्शन करत आहेत, असंही मत देखील त्यांनी यावेळी व्यक्त केलं.
view commentsLocation :
Mumbai,Maharashtra
First Published :
October 22, 2025 2:47 PM IST
मराठी बातम्या/स्पोर्ट्स/
AUS vs IND 2nd ODI : दुसऱ्या वनडेमध्येही शुभमन गिल तीच चूक करणार? गंभीरचा हट्ट टीम इंडियासाठी ठरतोय घातक?