PAK vs SL : आता श्रीलंका-पाकिस्तान सामन्यात राडा, हसरंगाने तासाभरात माज उतरवला, अबरारचा चेहरा पडला, Video
- Published by:Shreyas Deshpande
Last Updated:
आशिया कपमध्ये भारत-पाकिस्तान सामन्यानंतर श्रीलंका आणि पाकिस्तान यांच्यात सुरू असलेल्या सामन्यातही राडा झाल्याचं पाहायला मिळालं.
अबू धाबी : आशिया कपमध्ये भारत-पाकिस्तान सामन्यानंतर श्रीलंका आणि पाकिस्तान यांच्यात सुरू असलेल्या सामन्यातही राडा झाल्याचं पाहायला मिळालं. या सामन्यात पाकिस्तानचा कर्णधार सलमान आघाने टॉस जिंकून श्रीलंकेला पहिले बॅटिंगला बोलावलं, त्यानंतर पाकिस्तानने श्रीलंकेला 20 ओव्हरमध्ये 133/8 वर रोखलं. पाकिस्तानचा स्पिनर अबरार अहमदने वानिंदू हसरंगाला बोल्ड केलं, यानंतर अबरारने वानिंदू हसरंगा विकेट मिळाल्यानंतर ज्या प्रकारे सेलिब्रेशन करतो, तसं सेलिब्रेशन केलं.
अबरारचं हे सेलिब्रेशन पाहून वानिंदू हसरंगालाही राग अनावर झाला. यानंतर पुढच्या एका तासामध्येच हसरंगाने अबरारला त्याच पद्धतीने चोख प्रत्युत्तर दिलं. अबरार विकेट मिळाल्यानंतर जसं सेलिब्रेशन करतो, अगदी तसंच सेलिब्रेशन हसरंगानेही केलं. सगळ्यात आधी फखर झमानचा कॅच पकडल्यानंतर हसरंगाने अबरारला कॉपी केलं. यानंतरही हसरंगा थांबला नाही, पुढे त्याने सॅम अयुब आणि सलमान आघाचीही विकेट घेतली आणि तसंच सेलिब्रेशन केलं.
advertisement
That was so cool by Abrar Ahmad, Hasaranga's celebration 😭 pic.twitter.com/hzEjQOhbj7
— Azlan (@azlanxz) September 23, 2025
Hasranga 😀#Slvspak
Video- @SonyLIV pic.twitter.com/n7OUtQ7Y1k
— Gagan Deep Meena (@gaganmeena200) September 23, 2025
advertisement
भर मैदानामध्ये वानिंदू हसरंगाचं हे सेलिब्रेशन पाहून अबरार अहमदचा चेहराही पडला. या सगळ्या वादाचे व्हिडिओही समोर आले आहेत.
श्रीलंकेकडून या सामन्यात कामिंदू मेंडिसने सर्वाधिक 50 रन केले. तर असलंकाने 20 आणि करुणारत्नेने नाबाद 17 रनची खेळी केली. पाकिस्तानकडून शाहिन आफ्रिदीला सर्वाधिक 3 विकेट मिळाल्या. तर हारिस राऊफ, हुसैन तलत यांना प्रत्येकी 2-2 आणि अबरार अहमदला एक विकेट घेण्यात यश आलं. श्रीलंका आणि पाकिस्तान यांच्यातल्या या सामन्यात पराभूत होणाऱ्या टीमचं आशिया कपमधील आव्हान संपुष्टात येणार आहे.
Location :
Mumbai,Maharashtra
First Published :
September 23, 2025 11:50 PM IST
मराठी बातम्या/स्पोर्ट्स/
PAK vs SL : आता श्रीलंका-पाकिस्तान सामन्यात राडा, हसरंगाने तासाभरात माज उतरवला, अबरारचा चेहरा पडला, Video