Smriti Mandhana Marriage : स्मृतीच्या वडिलांना हार्ट अटॅक, 9 तासात पलाशची प्रकृतीही बिघडली, नवरदेव रुग्णालयात

Last Updated:

भारताची वर्ल्ड कप विजेती क्रिकेटपटू स्मृती मानधना हिचा लग्न सोहळा तिच्या वडिलांना हार्ट अटॅक आल्यामुळे रद्द झाला आहे. यानंतर आता स्मृतीचा होणारा पती पलाश याचीही प्रकृती बिघडली आहे.

स्मृतीच्या वडिलांना हार्ट अटॅक, 9 तासात पलाशची प्रकृतीही बिघडली, नवरदेव रुग्णालयात
स्मृतीच्या वडिलांना हार्ट अटॅक, 9 तासात पलाशची प्रकृतीही बिघडली, नवरदेव रुग्णालयात
आसिफ मुरसळ, प्रतिनिधी
सांगली : भारताची वर्ल्ड कप विजेती क्रिकेटपटू स्मृती मानधना हिचा लग्न सोहळा रद्द झाला आहे. स्मृतीच्या वडिलांना हृदयविकाराचा झटका आल्यामुळे तिचा लग्न सोहळा स्थगित करण्यात आला. दरम्यान स्मृती मानधनाच्या वडिलांनंतर आता स्मृतीचा होणारा पती पलाश मुच्छल याचीही प्रकृती बिघडली आहे. एका खासगी रुग्णालयात उपचार घेऊन पलाश हॉटेलवर रवाना झाला आहे. व्हायरल इनफेक्शन झाल्याने पलाशने डॉक्टरांकडून उपचार घेतले आणि तो पुन्हा एकदा हॉटेलमध्ये आला आहे.
advertisement

स्मृतीच्या वडिलांना हार्ट अटॅक

सांगलीच्या समडोळ येथील मानधाना फार्म हाऊसवर आज संध्याकाळी स्मृतीचं लग्न होतं, यासाठी लग्नाची तयारीही जोरदार सुरू होती, पण स्मृतीचे वडील श्रीनिवास मानधना यांना हार्ट अटॅक आला. त्यानंतर त्यांना सांगलीतल्या एका खासगी रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आलं आहे.

तोपर्यंत लग्न करणार नाही

दरम्यान बाबा बरे होत नाहीत तोपर्यंत लग्न करणार नसल्याचा निर्णय स्मृतीने घेतला आहे. आज नाश्ता करत असतानाच स्मृतीच्या वडिलांना अस्वस्थ वाटू लागले, बरं वाटत नसल्यामुळे रुग्णवाहिका बोलावण्यात आली आणि त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आले. श्रीनिवास मानधना हे सध्या डॉक्टरांच्या निगराणीखाली आहेत. स्मृती आणि तिच्या वडिलांचे नाते खूपच भावनिक असून ते जोपर्यंत बरे होत नाहीत, तोपर्यंत अनिश्चित काळासाठी लग्न पुढे ढकलण्याचा निर्णय स्मृतीने स्वत: घेतल्याचं कुटुंबियांनी माध्यमांना सांगितलं आहे.
advertisement
स्मृतीच्या वडिलांच्या प्रकृतीविषयी विचारले असता, डॉक्टर त्यांच्यावर उपचार करीत आहेत. त्यांना सद्य स्थितीत रुग्णालयातच ठेवण्याचा सल्ला डॉक्टरांनी दिला आहे. तसेच शक्य तितका आराम करण्यासही डॉक्टरांनी बजावल्याने लग्न सोहळा पुढे ढकलण्याचा निर्णय घेतल्याचे स्मृतीच्या कुटुंबियांनी सांगितले.
स्मृतीच्या लग्नाची मॅनेजमेंट करणाऱ्या तोहीन मिश्रा यांच्याकडून आज होणारा लग्न सोहळा रद्द करण्यात आल्याचं सांगितलं. स्मृती मनधाना आणि संगीत दिग्दर्शक पलाश मुच्छल यांचा संध्याकाळी सांगलीमध्ये साडेचार वाजता लग्न सोहळा पार पडणार होता. लग्न सोहळ्यासाठी क्रीडा आणि विविध क्षेत्रातील दिग्गज उपस्थित राहणार होते. लग्न स्थळाच्या ठिकाणावरून येणाऱ्या पाहुण्यांना परत पाठवण्यात आलं, तसंच लग्न स्थळाचं डेकोरेशनही काढण्यात आलं.
view comments
मराठी बातम्या/स्पोर्ट्स/
Smriti Mandhana Marriage : स्मृतीच्या वडिलांना हार्ट अटॅक, 9 तासात पलाशची प्रकृतीही बिघडली, नवरदेव रुग्णालयात
Next Article
advertisement
'ते' पाहुन गौरी गर्जेच्या पायाखालची जमीन सरकली, वडिलांना WhatsApp वर पाठवलेला पुरावा काय? मोठी अपडेट
गौरीने वडिलांना फोटो पाठवले, कुटुंबावर आभाळ कोसळलं! मेसेजमध्ये होतं काय?
  • 'ते' पाहुन गौरी गर्जेच्या पायाखालची जमीन सरकली, वडिलांना WhatsApp वर पाठवलेला पु

  • 'ते' पाहुन गौरी गर्जेच्या पायाखालची जमीन सरकली, वडिलांना WhatsApp वर पाठवलेला पु

  • 'ते' पाहुन गौरी गर्जेच्या पायाखालची जमीन सरकली, वडिलांना WhatsApp वर पाठवलेला पु

View All
advertisement