IND vs SA : बुमराहचा पंच, कुलदीपची जादू! कोलकाताच्या ईडन गार्डनवर WTC चॅम्पियन्सचं वस्त्रहरण, पहिल्या डावात कुठं फिरली मॅच?

Last Updated:

India vs South Africa 1st Test :जसप्रीत बुमराहने आपल्या भेदक स्विंग आणि अचूक बॉलिंगने दक्षिण आफ्रिकेच्या 5 बॅटर्सला पॅव्हेलियनचा रस्ता दाखवला. तर मोहम्मद सिराजने दोन महत्त्वाच्या विकेट्स घेतल्या.

India vs South Africa 1st Test
India vs South Africa 1st Test
WTC Champions Falls down : भारत आणि दक्षिण आफ्रिका यांच्यातील पहिल्या कसोटी मॅचच्या पहिल्या इनिंगमध्ये दक्षिण आफ्रिकेची बॅटिंग पत्त्याच्या बंगल्याप्रमाणे कोसळली. ईडन गार्डन्सवर कॅप्टन बावुमा याने टॉस जिंकून प्रथम बॅटिंगचा निर्णय घेतला होता, पण टीम इंडियाच्या फास्ट बॉलर्स आणि स्पिनर्सच्या भेदक माऱ्यासमोर त्यांचा डाव फक्त 55 ओव्हरमध्ये 159 धावांवर संपुष्टात आला. इनिंग्ज ब्रेक जाहीर करण्यात आला असून, टीम इंडिया आता बॅटिंगसाठी मैदानात उतरणार आहे.

साऊथ अफ्रिकेची बॅटिंग ढेपाळली

दक्षिण आफ्रिकेची सुरूवात संथ झाली. एडन मार्करम याने सर्वाधिक 31 धावा केल्या. याशिवाय रायन रिकलटन 23, विआन मल्डर 24 आणि टोनी डी झोर्झी 24 धावा काढून परतले. या चार बॅटर्सव्यतिरिक्त एकालाही 20 धावांचा आकडा पार करता आला नाही. कॅप्टन टेम्बा बावुमा फक्त 3 धावांवर आऊट झाला. ट्रिस्टन स्टब्स याने 15 धावा काढून एक बाजू सांभाळण्याचा प्रयत्न केला, पण त्याला दुसऱ्या बाजूने साथ मिळाली नाही. सलामीवीरांची विकेट गेल्यानंतरच साऊथ अफ्रिकेचा डाव ढेपाळण्यास सुरूवात झाली.
advertisement

जसप्रीत बुमराहचा पंच 

जसप्रीत बुमराहने आपल्या भेदक स्विंग आणि अचूक बॉलिंगने दक्षिण आफ्रिकेच्या 5 बॅटर्सला पॅव्हेलियनचा रस्ता दाखवला. यामध्ये एडन मार्करम, रायन रिकलटन, टोनी डी झोर्झी आणि केशव महाराज यांच्या महत्त्वाच्या विकेट्सचा समावेश आहे. तर मोहम्मद सिराजने मार्को जानसेन आणि काईल वेरेन्ने या दोघांना क्लीन बोल्ड करत 2 विकेट्स घेतल्या.
advertisement

कुलदीपने दाखवली फिरकीची जादू

भारताच्या स्पिनर्सने देखील कमाल केली. टीम इंडियाने खेळवलेल्या चार स्पिनर्सपैकी कुलदीप यादव याने कॅप्टन बावुमासह 2 महत्त्वाच्या विकेट्स घेतल्या, तर अक्षर पटेल याला 1 विकेट मिळाली. वॉशिंग्टन सुंदर याला विकेट मिळाली नसली तरी त्याने दुसऱ्या बाजूने दबाव कायम ठेवला. ईडन गार्डन्सच्या खेळपट्टीवर स्पिनर्सना मदत मिळत असल्याचे दिसत आहे. दक्षिण आफ्रिकेचा डाव लवकर गुंडाळल्यामुळे टीम इंडिया आता पहिल्या इनिंगमध्ये मोठी आघाडी घेण्याचा प्रयत्न करेल.
view comments
मराठी बातम्या/स्पोर्ट्स/
IND vs SA : बुमराहचा पंच, कुलदीपची जादू! कोलकाताच्या ईडन गार्डनवर WTC चॅम्पियन्सचं वस्त्रहरण, पहिल्या डावात कुठं फिरली मॅच?
Next Article
advertisement
Bus fire: परत तीच अंधारी रात्र; ट्रॅव्हल्सच्या बसने घेतला पेट, 20 प्रवाशांचा होरपळून मृत्यू, काळजाचा थरकाप उडवणारा VIDEO
परत तीच अंधारी रात्र ट्रॅव्हल्सच्या बसने घेतला पेट, 20 प्रवाशांचा होरपळून मृत्यू
    View All
    advertisement