Stuart Board : 'युवराज सिंगमुळे माझं करिअर झालं...', 19 वर्ष जुन्या जखमेवर काय म्हणाला स्टुअर्ट ब्रॉड? आयुष्याचा कानमंत्र दिला!
- Published by:Saurabh Talekar
Last Updated:
Stuart Board On Yuvraj Singh : जर ती घटना घडली नसती, तर मी एक चांगला बॉलर असल्याच्या भ्रमातच क्रिकेट खेळत राहिलो असतो. त्या वेळी मला नक्कीच खूप वाईट वाटले होते, असं स्टुअर्ट ब्रॉड म्हणाला.
Stuart Board On six sixes From Yuvraj Singh : डर्बनच्या मैदानावर 19 सप्टेंबर 2007 रोजी भारत आणि इंग्लंड यांच्यात रंगलेला तो थरार आजही क्रिकेट प्रेमींच्या डोळ्यासमोर जसाच्या तसा उभा राहतो. टी-20 वर्ल्ड कपची ही पहिल्यांदाच आयोजित केला गेला होता आणि न्यूझीलंडविरुद्ध पराभव पत्करावा लागल्यामुळे टीम इंडियासाठी हा सामना जिंकणं अत्यंत आवश्यक होते. अशा दबावाच्या परिस्थितीत भारतीय संघ मैदानात उतरला होता, जिथं युवराज सिंगच्या संतापाचा फटका इंग्लंडच्या स्टुअर्ट ब्रॉडला बसला. स्टुअर्ट ब्रॉडने यावर पहिल्यांदा प्रतिक्रिया दिली आहे.
मला नक्कीच खूप वाईट वाटलं होतं
युवराज सिंगने मारलेल्या सहा सिक्समुळे स्टुअर्ट ब्रॉडच्या करिअरची पुढील 5 ते 6 वर्षे वाचली, असं स्वतः ब्रॉडने म्हटलं आहे. तो म्हणाला की, जर ती घटना घडली नसती, तर मी एक चांगला बॉलर असल्याच्या भ्रमातच क्रिकेट खेळत राहिलो असतो. त्यावेळी मला नक्कीच खूप वाईट वाटलं होतं आणि मी दुःखी होतो, पण त्या सिक्सनी मला माझ्या उणिवांची जाणीव करून दिली आणि अधिक मेहनत घेण्यास प्रवृत्त केलं, असं स्टुअर्ट ब्रॉड म्हणाला.
advertisement
600 पेक्षा जास्त विकेट्स घेणारा बॉलर
ब्रॉडच्या मते, त्या प्रसंगाने त्याला एक योद्धा बनवलं आणि त्यातून धडा घेत त्याने आपल्या बॉलिंगमध्ये आमूलाग्र बदल केले. याच कारणामुळे तो टेस्ट क्रिकेटमध्ये 600 पेक्षा जास्त विकेट्स घेणारा जगातील महान बॉलर बनू शकलो. एका पराभवातून मिळालेला धडा एखाद्या खेळाडूला यशाच्या शिखरावर कसा नेऊ शकतो, याचं स्टुअर्ट ब्रॉड हे उत्तम उदाहरण दिलं आहे.
advertisement
Yuvraj Singh 6 Sixes savedd 5-6 years of my career. If that hadn't happened, I would have Played with the illusion of being a good bowler. Yes, i was sad and felt really bad but those six sixes were one main reason I had a good career
Stuart Board pic.twitter.com/kxTuTa3nWC
— (@Brutu24) January 5, 2026
advertisement
इंग्लंडविरुद्धच्या मॅचमध्ये काय घडलं होतं?
मॅचच्या 17 व्या ओव्हरनंतर युवराज आणि अँड्र्यू फ्लिंटॉफ यांच्यात मैदानात शाब्दिक चकमक झाली. या वादाने युवराज प्रचंड संतापला होता आणि त्याचा सर्व राग पुढच्या ओव्हरमध्ये स्टुअर्ट ब्रॉडवर निघाला. ब्रॉडच्या पहिल्या बॉलवर युवराजने मिडविकेटच्या वरून 111 मीटर लांब सिक्स मारला. त्यानंतर पुढच्या प्रत्येक बॉलवर त्याने सीमारेषेबाहेर हवाई सफर घडवून आणली. दुसऱ्या, तिसऱ्या, चौथ्या आणि पाचव्या बॉलवरही त्याने सलग सिक्स मारले.
advertisement
सर्वात वेगवान अर्धशतकाचा रेकॉर्ड
ब्रॉडला काहीच सुचेनासे झाले होते की बॉल कुठे टाकायचा. शेवटच्या बॉलवरही युवराजने कडक सिक्स मारून एकाच ओव्हरमध्ये ६ सिक्स मारण्याचा ऐतिहासिक विक्रम प्रस्थापित केला. त्याने केवळ 12 बॉल्समध्ये आपले अर्धशतक पूर्ण केले, जो आजही क्रिकेटमधील सर्वात वेगवान अर्धशतकाचा रेकॉर्ड मानला जातो. या एका ओव्हरने स्टुअर्ट ब्रॉडच्या करिअरला नवी दिशा दिली, असं त्याने स्वतः मान्य केलं आहे.
view commentsLocation :
Mumbai,Maharashtra
First Published :
Jan 06, 2026 11:10 AM IST
मराठी बातम्या/स्पोर्ट्स/
Stuart Board : 'युवराज सिंगमुळे माझं करिअर झालं...', 19 वर्ष जुन्या जखमेवर काय म्हणाला स्टुअर्ट ब्रॉड? आयुष्याचा कानमंत्र दिला!









