IND vs AUS : '...तर आश्चर्य वाटायला नको', पराभवानंतर भडकले सुनील गावस्कर, रोहित अन् विराटवर केली मोठी भविष्यवाणी!

Last Updated:

India vs Australia ODI : गावस्कर यांच्या मते, विराट कोहली आणि रोहित शर्मा हे ॲडलेड येथे होणाऱ्या दुसऱ्या वनडे मॅचमध्ये आपली कामगिरी सुधारतील.

Sunil Gavaskar Big statement on Virat Kohli and Rohit
Sunil Gavaskar Big statement on Virat Kohli and Rohit
India vs Australia : टीम इंडिया आणि ऑस्ट्रेलिया यांच्यात तीन सामन्यांची वनडे मालिका खेळवली जात आहे. या अटीतटीच्या सामन्यात टीम इंडियाचा पराभव झाला. सध्या तीन मॅचच्या वनडे सीरिजमध्ये भारत 0-1 ने पिछाडीवर आहे. दुसरा वनडे ॲडलेडमध्ये गुरुवार, 23 ऑक्टोबर रोजी खेळला जाईल. ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या पहिल्या वनडे मॅचमध्ये टीम इंडियाला मिळालेल्या लाजीरवाण्या पराभवानंतर, भारताचे माजी कॅप्टन सुनील गावस्कर यांनी प्रतिक्रिया दिली आहे.

थोडा वेळ आणि अधिक प्रॅक्टिसची गरज

गावस्कर यांच्या मते, विराट कोहली आणि रोहित शर्मा हे ॲडलेड येथे होणाऱ्या दुसऱ्या वनडे मॅचमध्ये आपली कामगिरी सुधारतील. ते लवकरच मोठा स्कोर करतील, फक्त त्यांना थोडा वेळ आणि अधिक प्रॅक्टिसची गरज आहे. पर्थमध्ये झालेल्या पहिल्या वनडेमध्ये रोहित शर्माने 8 रन केले होते आणि विराट कोहली खातेही न उघडता आऊट झाला होता. त्यावर बोलताना गावस्कर यांनी दोन्ही स्टार खेळाडूंची बाजू घेतली आहे.
advertisement

ऑस्ट्रेलियाचं सर्वात जास्त बाउन्स पीच

इंडिया टुडेसोबत बोलताना सुनील गावस्कर म्हणाले की, रोहित आणि विराट हे कदाचित ऑस्ट्रेलियाच्या सर्वात जास्त बाउन्स असलेल्या पीचवर खेळत होते. ज्या प्लेअर्सनी काही महिन्यांपासून इंटरनॅशनल क्रिकेट खेळले नाही, त्यांच्यासाठी हे सोपं नव्हतं. शुभमन गिल आणि श्रेयस अय्यर यांच्यासाठीही हे चॅलेंजिंग होते, जे नियमितपणे इंटरनॅशनल क्रिकेट खेळतात. भारत अजूनही खूप चांगली टीम आहे आणि भारताने चॅम्पियन्स ट्रॉफी जिंकली आहे. जर रोहित आणि कोहली यांनी पुढील दोन सामन्यांमध्ये मोठा स्कोर केला, तर आश्चर्य वाटून घेऊ नका, अशी भविष्यवाणी देखील गावस्कर यांनी केली आहे.
advertisement

नेट्समध्ये वेळ घालवा आणि थ्रोडाऊन घ्या - गावस्कर

दरम्यान, रोहित आणि विराट काही महिन्यांच्या इंटरनॅशनल क्रिकेटपासून दूर राहिल्यानंतर पुन्हा टीममध्ये आले आहेत. ते जेवढे जास्त खेळतील, नेट्समध्ये वेळ घालवतील आणि थ्रोडाऊन घेतील, तेवढ्या लवकर ते आपला फॉर्म परत मिळवतील. कदाचित ते रिझर्व्ह बॉलर्सकडून 22 यार्ड्स ऐवजी 20 यार्ड्सवरून बॉलिंग करवून घेतील. एकदा ते रन करायला लागले की, भारतचा एकूण स्कोर 300 किंवा त्याहून अधिक होईल, असं देखील गावस्कर म्हणाले आहेत.
view comments
मराठी बातम्या/स्पोर्ट्स/
IND vs AUS : '...तर आश्चर्य वाटायला नको', पराभवानंतर भडकले सुनील गावस्कर, रोहित अन् विराटवर केली मोठी भविष्यवाणी!
Next Article
advertisement
OTT Movie: बोल्ड सीन्सने भरलेला सिनेमा, फॅमिलीसोबत चुकूनही पाहू नका; 2 तास 28 मिनिटांची कहाणी ओटीटीवर हिट
2 तास 28 मिनिटांचा बोल्ड सिनेमा, फॅमिलीसोबत चुकूनही पाहू नका
    View All
    advertisement