advertisement

टीम इंडियाला 440 व्होल्टचा झटका, कॅप्टन स्पर्धेबाहेर होणार? BCCI ने दिली माहिती

Last Updated:

टीम इंडियाची कॅप्टन हरमनप्रीत कौरला दुखापत झाली आहे. पण आता तिची ही दुखापत पाहता ती स्पर्धेबाहेर होण्याची शक्यता आहे.

 harmanpreet kaur
 harmanpreet kaur
India vs Australia : टीम इंडियाचा महिला संघ संध्या ऑस्ट्रेलियासोबत तीन सामन्यांची वनडे मालिका खेळतो आहे. या मालिकेतला पहिला वनडे सामना आज खेळवण्यात आला.या सामन्यात ऑस्ट्रेलियाने 6 विकेट राखून भारताचा पराभव केला होता. या पराभवासह टीम इंडियाला आणखीण एक मोठा धक्का बसला आहे.कारण टीम इंडियाची कॅप्टन हरमनप्रीत कौरला दुखापत झाली आहे. पण आता तिची ही दुखापत पाहता ती स्पर्धेबाहेर होण्याची शक्यता आहे. बीसीसीआयने या संदर्भातली माहिती दिली आहे.
ब्रिस्बेनमध्ये ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या पहिल्या वनडे सामन्यात भारताला मोठा धक्का बसला होता. कारण टीम इंडियाची कर्णधार हरमनप्रीत कौरला फलंदाजी करताना गुडघ्याला दुखापत झाली होती. यु दुखापतीमुळे ती दुसऱ्या डावात क्षेत्ररक्षणाला आली नाही. त्यामुळे तिच्या अनुपस्थितीत उपकर्णधार स्मृती मानधना यांना संघाचे नेतृत्व करावे लागले. तसेच बीसीसीआयने दुखापतीची पुष्टी केली आणि सांगितले की त्यांची वैद्यकीय टीम तिच्या प्रकृतीवर बारकाईने लक्ष ठेवून आहे.
advertisement
दरम्यान हरमनप्रीत कौरची दुखापत पाहता ती स्पर्धेबाहेर होण्याची शक्यता आहे.त्यामुळे टीम इंडियाला हा मोठा धक्का असणार आहे. सामन्या बद्दल बोलायच झालं तर स्मृती मानधनाने 58 धावांची सर्वाधिक अर्धशतकीय खेळी केली होती.तिच्या पाठोपाठ कॅप्टन हरमनप्रीत कौरने 53 धावांची खेळी केली होती.या व्यतिरीक्त काश्वी गौतमने 43 धावांची खेळी केली होती. या बळावर भारताने प्रथम फलंदाजी करताना 214 धावा केल्या होत्या. ऑस्ट्रेलियाकडून अॅशले गार्डनरने 3,मेगन स्कटने 2, डार्सी ब्राऊन,अलाना किंग, ताहीला मॅकग्राथ आणि सोफीने प्रत्येकी 1 विकेट काढली होती.
advertisement
भारताने दिलेल्या 214 धावांच्या लक्ष्याचा पाठलाग करताना ऑस्ट्रेलियाने 38.2 ओव्हरमध्ये हे लक्ष्य गाठलं होतं. ऑस्ट्रेलियाकडून बेथ मुनीने 76 धावांची शतकीय खेळी केली होती. अॅलिसा हेलीने 50 धावांची तर अॅनाबेल सुथरलँडने 48 धावांची खेळी केली होती. या खेळीच्या बळावर ऑस्ट्रेलियाने 6 विकेट राखून विजय मिळवला होता. या विजयासह ऑस्ट्रेलियाने तीन सामन्यांच्या वनडे मालिकेत 1-0 ने आघाडी घेतली आहे.
view comments
मराठी बातम्या/स्पोर्ट्स/
टीम इंडियाला 440 व्होल्टचा झटका, कॅप्टन स्पर्धेबाहेर होणार? BCCI ने दिली माहिती
Next Article
advertisement
बांगलादेशींचे मुंबई पोलिसांना 'ओपन चॅलेंज'; बॉर्डरवर लाच दिली अन् शहरत उभे केले नेटवर्क, मोठा कट उघड
मुंबई पोलिसांना 'ओपन चॅलेंज'; बॉर्डरवर लाच दिली अन् शहरत उभे केले नेटवर्क
  • ही मुंबईची सुरक्षा की थट्टा?

  • सीमेवरून सरळ शहरात शिरकाव

  • 'रिव्हर्स एन्ट्री'ने मुंबईच्या सुरक्षेला सुरूंग

View All
advertisement