advertisement

Kalyan- Shilphata Metro: डोंबिवली ते नवी मुंबई आता मेट्रोने जा! 'मेट्रो 12A' मार्गाची घोषणा, इतके आहे स्थानकं

Last Updated:

उपमुख्यमंत्री आणि नगरविकास मंत्री एकनाथ शिंदे यांनी कल्याण ते तळोजा पर्यंत धावणाऱ्या 'मेट्रो 12' च्या मार्गांना मंजुरी देण्यात आली आहे.

Mumbai Metro Line 12A Extension Kalyan Shilphata Road Taoja Approved Know All About
Mumbai Metro Line 12A Extension Kalyan Shilphata Road Taoja Approved Know All About
कल्याण: उपमुख्यमंत्री आणि नगरविकास मंत्री एकनाथ शिंदे यांनी कल्याण ते तळोजा पर्यंत धावणाऱ्या 'मेट्रो 12' च्या मार्गांना मंजुरी देण्यात आली आहे. या माध्यमातून 'मेट्रो 12 ए' हा प्रोजेक्ट दहिसर मोरी ते कल्याण शिळफाटा पर्यंत विस्तारणार आहे. खासदार डॉ. श्रीकांत शिंदे यांनी दिलेल्या माहितीनुसार, या प्रकल्पासाठी प्रशासकीय मान्यता मिळाली असून ज्याचा खर्च 8414.53 कोटी पर्यंत आहे. या प्रकल्पासोबतच, खासदार शिंदे यांनी मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरण (एमएमआरडीए) च्या माध्यमातून शहरामध्ये राबवण्यात येणार्‍या विकास प्रकल्पांची पाहणी केली.
कल्याण- डोंबिवलीकरांचा प्रवास अधिक वेगवान करण्यासाठी या क्षेत्रामध्ये अनेक प्रकल्प सुरू आहेत. मेट्रो, रेल्वे, रस्ते, उड्डाणपूल, उन्नत मार्ग, रेल्वे पूल आणि रस्ता रुंदीकरण असे प्रकल्प सुरू असून अनेकांचे काम पूर्ण झाले आहेत. याशिवाय, एमएमआरडीएने या प्रकल्पाचं काम पूर्ण करण्यासाठी 4897 कोटी रुपयांचा निधी मंजूर केला असून खासदार डॉ. श्रीकांत शिंदे यांनी या प्रकल्पाच्या सद्यस्थितीची पाहणी केली. यावेळी खासदार श्रीकांत शिंदे यांनी पलावा उड्डाणपूल, मेट्रो 12, तिसरा पत्री पूल, वालधुनी नदी लगत विठ्ठल वाडी स्टेशन ते कल्याण नव्या अहिल्यानगर महामार्गापर्यंतचा उन्नत मार्ग आणि कल्याण रिंग रोड या प्रकल्पाची पाहणी केली.
advertisement
प्रकल्पाचे काम जलद गतीने करण्याचे आणि प्रकल्पासाठी जमीन उपलब्ध करून देण्यासाठी आवश्यक असलेले अतिक्रमण हटवण्याचे निर्देश सुद्धा त्यांनी दिले. यावेळी त्यांनी तळोजा मेट्रो 12 च्या विस्ताराची घोषणा केली. या मार्गाच्या विस्तारामुळे कल्याण शीळ मार्गावरील आणखी काही गावांनाही या मेट्रोचा फायदाही होणार आहे. मेट्रो 12 चे मार्ग दोन भागातून जात आहे. पहिल्या मार्गासाठी स्थानके निश्चित झाली असून दुसऱ्या मार्गाचा फायदा डोंबिवली, मानपाडा, काटई नाका, ग्रोथ सेंटर, देसाई नाका, पडले गाव, कल्याण फाटा, गोठेघर, दहिसर मोरी, दहिसरगाव, किरवली गाव, रोहिंजन आणि खुटारी गाव भागातील प्रवाशांना होईल. मेट्रो 12 आणि मेट्रो 12 ए खुटारी येथे एकत्रित येतील. ही मेट्रो लाईन ग्रामीण भागातून जाणारी पहिली मेट्रो असेल. भविष्यात ती मेट्रो 14 सोबतही जोडली जाणार असल्याचे बोलले जात आहे. भविष्यात मेट्रो जोडल्यास नवी मुंबई, कांजूरमार्ग ते मुंबई थेट प्रवासासाठी त्याचा फायदा होईल.
advertisement
विस्तारित मार्ग मेट्रो 14 सोबत कटाई नाका ते कल्याण फाटा दरम्यान रेल्वे ट्रॅक आणि रेल्वे स्टेशन एकत्र करण्याचा प्रस्ताव आहे. हा मेट्रो मार्ग निळजे डेपो, मेट्रो 14 आणि नॅशनल हायस्पीड रेल्वेच्या ठाणे बुलेट ट्रेन स्टेशनला जोडला जाणार आहे. या सुधारित मार्गाची एकूण लांबी 18.4 किलोमीटर इतकी आहे. सध्या, अंदाजे 10.5 किलोमीटरच्या मार्गावरीव बांधकाम सुरू आहे.
view comments
मराठी बातम्या/Kalyan Dombivli/
Kalyan- Shilphata Metro: डोंबिवली ते नवी मुंबई आता मेट्रोने जा! 'मेट्रो 12A' मार्गाची घोषणा, इतके आहे स्थानकं
Next Article
advertisement
बांगलादेशींचे मुंबई पोलिसांना 'ओपन चॅलेंज'; बॉर्डरवर लाच दिली अन् शहरत उभे केले नेटवर्क, मोठा कट उघड
मुंबई पोलिसांना 'ओपन चॅलेंज'; बॉर्डरवर लाच दिली अन् शहरत उभे केले नेटवर्क
  • ही मुंबईची सुरक्षा की थट्टा?

  • सीमेवरून सरळ शहरात शिरकाव

  • 'रिव्हर्स एन्ट्री'ने मुंबईच्या सुरक्षेला सुरूंग

View All
advertisement