IND vs PAK : 18 बॉलमध्ये पाकिस्तानचा खेळ खल्लास, भारताचा दणदणीत विजय, 3 ओव्हर्समध्ये नेमकं काय घडलं?

Last Updated:

भारताने पुन्हा एकदा एका रोमांचक सामन्यात पाकिस्तानचा पराभव केला आहे. हाँगकाँग सिक्सेस 2025 च्या सामन्यात टीम इंडियाने पाकिस्तानवर पूर्णपणे वर्चस्व गाजवले.

News18
News18
IND vs PAK Hong Kong Sixes 2025 : भारताने पुन्हा एकदा एका रोमांचक सामन्यात पाकिस्तानचा पराभव केला आहे. हाँगकाँग सिक्सेस 2025 च्या सामन्यात टीम इंडियाने पाकिस्तानवर पूर्णपणे वर्चस्व गाजवले. दिनेश कार्तिकच्या नेतृत्वाखाली भारतीय संघ या स्पर्धेत खेळत आहे. दरम्यान, रॉबिन उथप्पाने पाकिस्तानविरुद्धच्या सामन्यात शानदार फलंदाजी करत 255 च्या स्ट्राईक रेटने धावा केल्या. भारताने पाकिस्तानचा 2 धावांनी पराभव केला.
रॉबिन उथप्पाची स्फोटक फलंदाजी
हाँगकाँग सिक्सेस स्पर्धेत दोन्ही संघ प्रत्येकी सहा षटके खेळतात. या सामन्यात पाकिस्तानने नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला आणि भारताला फलंदाजीचे आमंत्रण दिले. जेव्हा भारतीय संघ फलंदाजीसाठी आला तेव्हा सलामीवीर फलंदाज रॉबिन उथप्पाने भरत चिपलीसह पाकिस्तानी गोलंदाजांना फटकारण्यास सुरुवात केली. उथप्पाने 254.55 च्या स्ट्राईक रेटने 11 चेंडूत 28 धावा केल्या, त्यात दोन चौकार आणि तीन षटकार मारले. दरम्यान, भरत चिपलीने 13 चेंडूत दोन चौकार आणि दोन षटकार मारून 24 धावा केल्या.
advertisement
पाकिस्तान फक्त 3 षटकांत कसा हरला?
भारत आणि पाकिस्तान यांच्यातील हा सामना प्रत्येकी सहा षटकांचा खेळवण्यात आला. प्रथम फलंदाजी करणाऱ्या भारताने सहा षटकांत चार गडी गमावून 86 धावा केल्या. पाकिस्तान फलंदाजीला आला तेव्हा त्यांनी तीन षटकांत एक गडी गमावून 41 धावा केल्या. पण त्यानंतर पावसाने खेळ खराब केला. सततच्या पावसामुळे सामना पुन्हा सुरू होऊ शकला नाही. भारताने डीएलएस पद्धतीने हा सामना दोन धावांनी जिंकला. पावसापूर्वी पाकिस्तानने चांगली फलंदाजी केली, पण दुसऱ्या षटकातील शेवटचे तीन चेंडू आणि चौथ्या षटकातील पहिला चेंडू डॉट बॉल असल्याने सामना अडकला. डीएलएस पद्धतीने भारताला या सलग चार डॉट बॉलचा फायदा मिळाला आणि पाकिस्तानने सामना 2 धावांनी गमावला.
view comments
मराठी बातम्या/स्पोर्ट्स/
IND vs PAK : 18 बॉलमध्ये पाकिस्तानचा खेळ खल्लास, भारताचा दणदणीत विजय, 3 ओव्हर्समध्ये नेमकं काय घडलं?
Next Article
advertisement
Bus fire: परत तीच अंधारी रात्र; ट्रॅव्हल्सच्या बसने घेतला पेट, 20 प्रवाशांचा होरपळून मृत्यू, काळजाचा थरकाप उडवणारा VIDEO
परत तीच अंधारी रात्र ट्रॅव्हल्सच्या बसने घेतला पेट, 20 प्रवाशांचा होरपळून मृत्यू
    View All
    advertisement