advertisement

रोहित पुन्हा घरच्या मैदानावर दिसणार, BCCI मास्टर प्लॅन; टीम इंडिया 22 मॅच खेळणार, संपूर्ण वेळापत्रक

Last Updated:

India Schedule: भारतीय क्रिकेट संघाचा 2026-27 हंगामात घरच्या मैदानावर कार्यक्रम ठरला असून 17 ठिकाणी 22 आंतरराष्ट्रीय सामने खेळवले जाणार आहेत. वेस्ट इंडिजपासून सुरुवात होत ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या कसोटी मालिकेपर्यंत रोमांचक क्रिकेट पाहायला मिळणार आहे.

News18
News18
मुंबई: भारतीय क्रिकेट नियामक मंडळाने (BCCI) गुरुवारी भारतीय क्रिकेट संघाच्या 2026-27 च्या घरच्या हंगामाचे वेळापत्रक जाहीर केले. येत्या हंगामात भारत 17 वेगवेगळ्या मैदानांवर एकूण 22 आंतरराष्ट्रीय सामने खेळणार आहे. वेस्ट इंडिज, श्रीलंका, झिम्बाब्वे आणि ऑस्ट्रेलिया या चार संघांचा भारत दौरा या हंगामात होणार आहे.
वेस्ट इंडिज दौरा: सप्टेंबर-ऑक्टोबर 2026
घरच्या हंगामाची सुरुवात वेस्ट इंडिजच्या व्हाईट-बॉल दौऱ्याने होणार आहे. या दौऱ्यात 5 एकदिवसीय आणि 3 T20I सामने होतील. पहिला सामना 27 सप्टेंबर रोजी तिरुवनंतपुरम येथे होणार असून संपूर्ण मालिका 17 ऑक्टोबरपर्यंत चालेल.
एकदिवसीय सामन्यांची ठिकाणे: तिरुवनंतपुरम, गुवाहाटी, नवी चंदीगड
T20I सामन्यांची ठिकाणे: लखनऊ, रांची, इंदूर, हैदराबाद, बेंगळुरू
advertisement
विशेष म्हणजे बेंगळुरूच्या चिन्नास्वामी स्टेडियमवर आंतरराष्ट्रीय सामना ऑक्टोबर 2024 नंतर प्रथमच होणार आहे.
क्र.दिवसतारीखवेळसामनास्थळ
1रवि27 सप्टेंबर 2026दुपारी 2:00पहिला वनडेतिरुवनंतपुरम
2बुध30 सप्टेंबर 2026दुपारी 2:00दुसरा वनडेगुवाहाटी
3शनि03 ऑक्टोबर 2026दुपारी 2:00तिसरा वनडेन्यू चंदीगड
4मंगळ06 ऑक्टोबर 2026सायं 7:00पहिला टी-20लखनऊ
5शुक्र09 ऑक्टोबर 2026सायं 7:00दुसरा टी-20रांची
6रवि11 ऑक्टोबर 2026सायं 7:00तिसरा टी-20इंदूर
7बुध14 ऑक्टोबर 2026सायं 7:00चौथा टी-20हैदराबाद
8शनि17 ऑक्टोबर 2026सायं 7:00पाचवा टी-20बेंगळुरू
advertisement
श्रीलंका दौरा: डिसेंबर 2026
वेस्ट इंडिज दौऱ्यानंतर श्रीलंका संघ भारत दौऱ्यावर येणार आहे. या दौऱ्यात 3 एकदिवसीय आणि 3 T20I सामने होतील. ही मालिका 13 ते 27 डिसेंबर दरम्यान खेळवली जाईल.
एकदिवसीय सामन्यांची ठिकाणे: दिल्ली, बेंगळुरू, अहमदाबाद
T20I सामन्यांची ठिकाणे: राजकोट, कटक, पुणे
क्र.दिवसतारीखवेळसामनास्थळ
1रवि13 डिसेंबर 2026दुपारी 2:00पहिला वनडेदिल्ली
2बुध16 डिसेंबर 2026दुपारी 2:00दुसरा वनडेबेंगळुरू
3शनि19 डिसेंबर 2026दुपारी 2:00तिसरा वनडेअहमदाबाद
4मंगळ22 डिसेंबर 2026सायं 7:00पहिला टी-20राजकोट
5गुरु24 डिसेंबर 2026सायं 7:00दुसरा टी-20कटक
6रवि27 डिसेंबर 2026सायं 7:00तिसरा टी-20पुणे
advertisement
झिम्बाब्वे दौरा: जानेवारी 2027
नवीन वर्षाच्या सुरुवातीला झिम्बाब्वे संघ भारत दौऱ्यावर येणार आहे. या दौऱ्यात ३ एकदिवसीय सामन्यांची मालिका होईल.
एकदिवसीय सामन्यांची ठिकाणे: कोलकाता, हैदराबाद, मुंबई
क्र.दिवसतारीखवेळसामनास्थळ
1रवि03 जानेवारी 2027दुपारी 2:00पहिला वनडेकोलकाता
2बुध06 जानेवारी 2027दुपारी 2:00दुसरा वनडेहैदराबाद
3शनि09 जानेवारी  2027दुपारी 2:00तिसरा वनडेमुंबई
advertisement
ऑस्ट्रेलिया कसोटी मालिका: जानेवारी ते मार्च 2027
घरच्या हंगामातील सर्वात महत्त्वाची आणि प्रतिष्ठेची मालिका बॉर्डर-गावस्कर ट्रॉफी होय. ऑस्ट्रेलियाविरुद्धची 5 कसोटी सामन्यांची मालिका 21 जानेवारी ते 7 मार्च 2027 दरम्यान खेळवली जाईल.
कसोटी सामन्यांची ठिकाणे:
नागपूर, चेन्नई, गुवाहाटी, रांची, अहमदाबाद
क्र.दिवसतारीख (पासून)तारीख (पर्यंत)वेळसामनास्थळ
1गुरु21 जानेवारी 202725 जानेवारी 2027सकाळी 9:30पहिली कसोटीनागपूर
2शुक्र29 जानेवरी 202702 फेब्रुवारी 2027सकाळी 9:30दुसरी कसोटीचेन्नई
3गुरु11-फेब्रुवारी-202715 फेब्रुवारी 2027सकाळी 9:00तिसरी कसोटीगुवाहाटी
4शुक्र19-फेब्रुवारी-202723 फेब्रुवारी 2027सकाळी 9:30चौथी कसोटीरांची
5शनि27-फेब्रुवारी-202703 मार्च 2027सकाळी 9:30पाचवी कसोटीअहमदाबाद
advertisement
एका दृष्टिक्षेपात संपूर्ण हंगाम
मालिकाकालावधीसामने
वेस्ट इंडिज (ODI+T20I)27 सप्टेंबर-17 ऑक्टोबर 20265 ODI + 3 T20I
श्रीलंका (ODI+T20I)13-27 डिसेंबर 20263 ODI + 3 T20I
झिम्बाब्वे (ODI)जानेवारी 20273 ODI
ऑस्ट्रेलिया (कसोटी)21 जानेवारी-07 मार्च 20275 कसोटी
एकूण२२ सामने
advertisement
view comments
मराठी बातम्या/स्पोर्ट्स/
रोहित पुन्हा घरच्या मैदानावर दिसणार, BCCI मास्टर प्लॅन; टीम इंडिया 22 मॅच खेळणार, संपूर्ण वेळापत्रक
Next Article
IPLमधील 'डील'चे गूढ! संघाची 15,300 कोटींना विक्री; फक्त जुना मालक नाही, BCCIला देखील मिळाले पैसे, गणित वाचून चक्रावून जाल
IPLमधील 'डील'चे गूढ! संघाची 15,300 कोटींना विक्री; जुना मालक नाही, BCCIला देखील मिळाले पैसे, गणित वाचून चक्रावून जाल
  • राजस्थान रॉयल्सची 15,300 कोटींना विक्री

  • मालकाच्या खिशात 3,000 कोटी कमी का?

  • BCCIला किती मिळाले? चक्रावून टाकणारे गणित

View All
advertisement