Team India : 4 वर्ष टीम इंडियाला पाणी दिलं, त्याचं हे फळ मिळालं? भारतीय खेळाडूला एकही चान्स न देता डच्चू!

Last Updated:

IND vs WI 4 वर्ष, 4 देश आणि तब्बल 4 हजार किमीचा प्रवास. एवढा काळ त्याने टीम इंडियाच्या खेळाडूंना पाणी दिलं, पण शेवटी त्याच्यावर अन्याय झाला. दुधातून माशी काढतो, तसंच त्याला टीम इंडियातून एकही मॅच न खेळता बाहेर करण्यात आलं आहे.

4 वर्ष टीम इंडियाला पाणी दिलं, त्याचं हे फळ मिळालं? भारतीय खेळाडूला एकही चान्स न देता डच्चू!
4 वर्ष टीम इंडियाला पाणी दिलं, त्याचं हे फळ मिळालं? भारतीय खेळाडूला एकही चान्स न देता डच्चू!
मुंबई : 4 वर्ष, 4 देश आणि तब्बल 4 हजार किमीचा प्रवास. एवढा काळ त्याने टीम इंडियाच्या खेळाडूंना पाणी दिलं, पण शेवटी त्याच्यावर अन्याय झाला. दुधातून माशी काढतो, तसंच त्याला टीम इंडियातून एकही मॅच न खेळता बाहेर करण्यात आलं आहे. वेस्ट इंडिजविरुद्धच्या टेस्ट सीरिजसाठी भारतीय टीमची घोषणा करण्यात आली. करुण नायरला अपेक्षेप्रमाणे टीममधून बाहेर करण्यात आलं, पण करुणसोबतच अभिमन्यू इश्वरनलाही डच्चू देण्यात आला आहे.
अभिमन्यू इश्वरन मागच्या 4 वर्षांपासून त्याच्या संधीची वाट पाहत होता. भारतीय टेस्ट टीमसोबत तो प्रवास करायचा, तसंच नेटमध्येही घाम गाळायचा, पण एकदाही त्याला भारताकडून खेळण्याची संधी मिळाली नाही. आता तर वेस्ट इंडिजविरुद्धच्या 2 टेस्ट मॅचच्या सीरिजमधून अभिमन्यू इश्वरनला टीम इंडियाबाहेर करण्यात आलं आहे.

अभिमन्यूनंतर 16 खेळाडूंचं पदार्पण

ऑस्ट्रेलिया ए विरुद्धच्या दुसऱ्या सामन्यात अभिमन्यू इश्वरनला प्लेयिंग इलेव्हनमध्ये घेण्यात आलं नाही, तेव्हाच अभिमन्यू इश्वरनची वेस्ट इंडिजविरुद्धच्या सीरिजसाठी टीम इंडियात निवड होणार नाही, याचे संकेत मिळाले होते. 2021 साली अभिमन्यू इश्वरनची टीम इंडियामध्ये निवड झाली, त्यानंतर यशस्वी जयस्वाल, देवदत्त पडिक्कल, रजत पाटीदार, साई सुदर्शन, इशान किशन, ध्रुव जुरेल, मुकेश कुमार, सरफराज खान आणि अंशुल कंबोज अशा कमीत कमी 16 खेळाडूंचं भारताकडून टेस्ट क्रिकेटमध्ये पदार्पण झालं, पण अभिमन्यू मात्र बेंचवरच बसून राहिला.
advertisement

अनेक खेळाडूंपेक्षा चांगलं रेकॉर्ड

अभिमन्यू इश्वरनने प्रथम श्रेणी क्रिकेटमध्ये 27 शतकांच्या मदतीने 7,841 रन केल्या आहेत, तसंच त्याच्या नावावर 31 अर्धशतकंही आहेत. अभिमन्यूचं हे रेकॉर्ड टीम इंडियाकडून पदार्पण केलेल्या इतर खेळाडूंपेक्षा चांगलं आहे, पण तरीही त्याला स्वत:ला सिद्ध करण्याची संधी न देताच बाहेर केलं गेलं आहे.

वेस्ट इंडिज सीरिजसाठी टीम इंडिया

advertisement
शुभमन गिल (कॅप्टन), यशस्वी जयस्वाल, केएल राहुल, साई सुदर्शन, देवदत्त पडिक्कल, ध्रुव जुरेल, रवींद्र जडेजा, वॉशिंग्टन सुंदर, जसप्रीत बुमराह, अक्षर पटेल, नितीश कुमार रेड्डी, एन जगदीसन, मोहम्मद सिराज, प्रसिद्ध कृष्णा आणि कुलदीप यादव.
मराठी बातम्या/स्पोर्ट्स/
Team India : 4 वर्ष टीम इंडियाला पाणी दिलं, त्याचं हे फळ मिळालं? भारतीय खेळाडूला एकही चान्स न देता डच्चू!
Next Article
advertisement
OTT Movie: धाकटीशी लग्न, मोठीसोबत सुहागरात, 1 तास 19 मिनिटांच्या सिनेमाने ओटीटीवर उडवलीय खळबळ
धाकटीशी लग्न, मोठीसोबत सुहागरात, 1 तास 19 मिनिटांच्या सिनेमाने OTTवर उडवलीय खळबळ
    View All
    advertisement