PGCIL Apprentice Bharti 2025 : पॉवर ग्रिड कॉर्पोरेशन ऑफ इंडिया मध्ये 1000+ जागांसाठी भरती! जाणून घ्या अर्जप्रक्रिया
- Published by:Chetan Bodke
- local18
Last Updated:
पॉवर ग्रिड कॉर्पोरेशन ऑफ इंडिया लिमिटेड अंतर्गत मेगा भरतीची अधिसूचना जारी करण्यात आली आहे. यामध्ये इच्छुक उमेदवारांना शिकता शिकता अर्थात अप्रेंटिसशिप करता करता नोकरी करण्याची सुवर्ण संधी उपलब्ध झाली आहे.
पॉवर ग्रिड कॉर्पोरेशन ऑफ इंडिया लिमिटेड अंतर्गत मेगा भरतीची अधिसूचना जारी करण्यात आली आहे. यामध्ये इच्छुक उमेदवारांना शिकता शिकता अर्थात अप्रेंटिसशिप करता करता नोकरी करण्याची सुवर्ण संधी उपलब्ध झाली आहे. पॉवर ग्रिड कॉर्पोरेशन ऑफ इंडिया लिमिटेड कंपनीमध्ये 1000 हून अधिक जागांवर भरती केली जाणार आहे. पदांनुसार पात्र असणार्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत असून 6 ऑक्टोबर 2025 ही तारीख अर्ज करण्याची शेवटची तारीख आहे. ऑनलाईन पद्धतीने अर्ज प्रक्रिया केली जाणार आहे. अप्रेंटिसशिपसाठी कोणकोणत्या पदांवर भरती केली जाणार आहे, जाणून घेऊया...
पॉवर ग्रिड कॉर्पोरेशन ऑफ इंडिया लिमिटेड कंपनीमध्ये, 15 वेगवेगळ्या पदांवर भरती केली जाणार आहे. इलेक्ट्रिकल ITI साठी अप्रेंटिसशिप, इलेक्ट्रिकल डिप्लोमासाठी अप्रेंटिसशिप, सिव्हिल डिप्लोमासाठी अप्रेंटिसशिप, इलेक्ट्रिकल ग्रॅज्युएट अप्रेंटिसशिप, इलेक्ट्रॉनिक आणि टेलिकम्युनिकेशनसाठी ग्रॅज्युएट अप्रेंटिसशिप, कम्प्युटर सायन्समध्ये ग्रॅज्युएशन केलेल्यांसाठी अप्रेंटिसशिप, ऑफिस मॅनेजमेंट डिप्लोमा, HR एक्झिक्युटिव्ह, सेक्रेटेरियल असिस्टंट, CSR एक्झिक्युटिव्ह, लॉ एक्झिक्युटिव्ह, PR असिस्टंट, राजभाषा असिस्टंट, लायब्ररी प्रोफेशनल असिस्टंट अशा वेगवेगळ्या पदांसाठी नोकरभरती केली जाणार आहे.
advertisement
या वेगवेगळ्या पदांसाठी इंजिनियरिंग, डिप्लोमा, ITI, ग्रॅज्युएशन आणि पोस्ट ग्रॅज्युएशन सारख्या शिक्षणासाठी उमेदवारांना गरज आहे. उमेदवारांना कोणत्या पदासाठी काय शिक्षण हवं, ही माहिती जाणून घ्यायची असल्यास नोकरीच्या जाहिरातीची PDF वाचून घ्या. अर्जदारांसाठी वयाची अट किमान 18 वर्षे पूर्ण हवे, अशी आहे. 13 सप्टेंबरपासून सुरू झालेल्या भरती प्रक्रियेसाठी ऑनलाईन अर्ज करण्यासाठीची शेवटची तारीख 06 ऑक्टोबर आहे. अप्रेंटिसशिपच्या माध्यमातून केल्या जाणाऱ्या भरती प्रक्रियेत अर्जदारांसाठी अर्ज शुल्क नसणार आहे. परीक्षेची तारीख जाहिरातीमध्ये नमुद करण्यात आलेली नाही. परीक्षेच्या काही दिवस आधी अर्जदारांना ईमेलच्या माध्यमातून हॉलतिकिट येईल.
Location :
Maharashtra
First Published :
September 25, 2025 4:46 PM IST
मराठी बातम्या/महाराष्ट्र/
PGCIL Apprentice Bharti 2025 : पॉवर ग्रिड कॉर्पोरेशन ऑफ इंडिया मध्ये 1000+ जागांसाठी भरती! जाणून घ्या अर्जप्रक्रिया