IND vs SA : शुभमनला डिस्चार्ज पण त्याच हॉस्पिटलमध्ये रातोरात पोहोचले तीन साऊथ अफ्रिकन खेळाडू, कारण काय?
- Published by:Saurabh Talekar
Last Updated:
India vs South Africa Test : दक्षिण आफ्रिकेचे काही प्रमुख क्रिकेटपटू काल रात्री कोलकात्यातील वुड्सलँड्स हॉस्पिटलमध्ये गेले होते, अशी माहिती मिळाली आहे.
South Africa Player in hospital : भारत आणि साऊथ अफ्रिका यांच्यातील दोन सामन्यांच्या कसोटी मालिकेतील पहिला सामना टीम इंडियाने गमावला. त्यामुळे आता साऊथ अफ्रिका 1-0 ने मालिकेत आघाडीवर आहे. अशातच आता टीम इंडियासाठी आगामी सामना करो या मरो असणार आहे. पुढील गुवाहाटी येथे होणारा सामना जिंकला तरच टीम इंडियाला मालिकेत लाज राखता येणार आहे. अशातच सर्वांना धक्का देणारी माहिती समोर आली आहे.
साऊथ अफ्रिकेच्या खेळाडूंनी हॉस्पिटल गाठलं
दक्षिण आफ्रिकेचे काही प्रमुख क्रिकेटपटू काल रात्री कोलकात्यातील वुड्सलँड्स हॉस्पिटलमध्ये गेले होते, अशी माहिती मिळाली आहे. भारतासोबतच्या कसोटी मालिकेतील पहिल्या मॅचनंतर खेळाडूंनी हॉस्पिटल गाठलं. त्यामुळे अनेकांच्या भूवया उंचावल्या आहेत. विशेष म्हणजे शुभमन गिल देखील याच रुग्णालयात भरती होता. काल सकाळी त्याला डिस्चार्ज देण्यात आला होता.
advertisement
आरोग्याच्या तक्रारी की आणखी काही?
भारतीय पीचवर मॅच खेळल्यानंतर किंवा प्रवासादरम्यान कोणत्याही प्रकारच्या आरोग्याच्या तक्रारी असल्यास ते तपासून पाहण्यासाठी ही नियमित तपासणी करण्यात आली असावी, अशी शक्यता वर्तविण्यात येत आहे. मात्र, निश्चित कारण अद्याप समोर आलं नाही. साऊथ अफ्रिका टीम अद्याप कोलकातामध्येच असून खेळाडूंच्या चेकअपनंतर टीम गुवाहाटीला रवाना होईल.
advertisement
शुभमन गिल जायबंदी
दरम्यान, तर टीम इंडिया देखील अद्याप कोलकाताच्या मैदानावरच आहे. तिथंच टीम इंडियाचा सराव सुरू असल्याची माहिती आहे. शुभमन गिल जायबंदी असल्याने साई सुदर्शन आणि देवदत्त पेडिक्कल या दोन्ही खेळाडूंवर गौतम गंभीर फोकस करताना दिसतोय. त्यामुळे आता टीम इंडिया पुन्हा 7 लेफ्ट हँडर खेळाडूंसोबत मैदानात उतरणार का? असा सवाल विचारला जात आहे.
view commentsLocation :
Kolkata,West Bengal
First Published :
November 18, 2025 12:43 PM IST
मराठी बातम्या/स्पोर्ट्स/
IND vs SA : शुभमनला डिस्चार्ज पण त्याच हॉस्पिटलमध्ये रातोरात पोहोचले तीन साऊथ अफ्रिकन खेळाडू, कारण काय?


