शर्ट काढायला लावला, हात बांधले! तिलक वर्मासोबत सूर्याने काय केलं? गंभीरसह अख्खी टीम इंडिया हसली, पाहा Video
- Published by:Saurabh Talekar
Last Updated:
Team india Dressing Room Viral Video : भारतीय संघाने मालिका जिंकल्यानंतर, तिलक वर्मा यांनी ड्रेसिंग रूममध्ये त्यांचा वाढदिवस साजरा केला. तिलक याने स्वतः इंस्टाग्रामवर व्हिडिओ शेअर केला आहे.
Tilak Varma Video Video : पाचव्या आणि अखेरचा टी-ट्वेंटी सामना पावसाने धुवून निघाल्यानंतर आता टीम इंडियाचा ऑस्ट्लिया दौरा संपुष्टात आला आहे. वनडे मालिका गमावली असली तरी टीम इंडियाने टी-ट्वेंटी मालिका 2-1 ने जिंकली आहे. अखेरचा सामना पावसामुळे होऊ शकला नाही. अशातच सूर्याने टीम इंडियामध्ये मोठा बदल केला होता. सूर्याने आपल्याच मुंबई इंडियन्सच्या मित्राला म्हणजेच तिलक वर्माला संधी दिली नाही. तर मॅचनंतर सूर्याने तिलकसोबत नको ते केलं.
तिलक वर्माला बर्थडे बॉम्ब
भारतीय संघाने मालिका जिंकल्यानंतर, तिलक वर्मा यांनी ड्रेसिंग रूममध्ये त्यांचा वाढदिवस साजरा केला. तिलक याने स्वतः इंस्टाग्रामवर व्हिडिओ शेअर केला आहे. यावेळी सूर्यकुमार यादवने तिलक वर्माला बर्थडे बॉम्ब दिले. यावेळी व्हिडिओमध्ये सूर्यकुमार एका काचेत काहीतरी ढवळताना दिसत आहे. त्यावेळी सूर्याने तिलकचा कार्यक्रम करण्यासाठी केक कापण्यासाठी त्याला बसवलं. मला तुझे केस चांगले दिसावेत अशी माझी इच्छा आहे, असं सूर्या तिलकला म्हणतो.
advertisement
पाहा Video
advertisement
तिलकच्या चेहऱ्यावर केक लावला
सूर्याने तिलकला शर्ट काढण्यास सांगितलं. त्यानंतर तिलक केक कापतो आणि सूर्य त्याच्या डोक्यावर ग्लास ओततो. सूर्यकुमारने तिलकच्या चेहऱ्यावर केक लावला. जवळच उभ्या असलेल्या अर्शदीप सिंगनेही तिलकच्या चेहऱ्यावर केक लावला. तिलकने अर्शदीपला लगेच प्रत्युत्तर दिलं अन् केक अर्शदीपला देखील लावला. त्यानंतर दुसरा केक खाण्यासाठी आलेला शिवम दुबे हसत पळून जाताना दिसतोय.
advertisement
गौतम गंभीरला हसू आवरेना
दरम्यान, तिलक वर्मासोबत टीम इंडियाच्या खेळाडूंनी फोटो काढले. टीम इंडिया ड्रेसिंग रुममधून हॉटेलवर जाताना हा प्रकार घडला. त्यावेळी गौतम गंभीरला देखील हसू आवरलं नाही. त्याचा व्हिडीओ मुंबई इंडियन्सने देखील शेअर केला आहे.
view commentsLocation :
Mumbai,Maharashtra
First Published :
November 09, 2025 9:18 AM IST
मराठी बातम्या/स्पोर्ट्स/
शर्ट काढायला लावला, हात बांधले! तिलक वर्मासोबत सूर्याने काय केलं? गंभीरसह अख्खी टीम इंडिया हसली, पाहा Video


