Vaibhav Suryavanshi : ऑस्ट्रेलिया दौऱ्यावर असलेल्या वैभव सुर्यवंशीला वॉर्निग, भारतात आल्यावर फिटनेसची होणार चौकशी?
- Published by:Prashant Gomane
Last Updated:
वैभव सुर्यवंशीला एक वॉर्निग आली आहे. या वॉर्निंगनूसार त्याची फिटनेसची चौकशी होण्याची शक्यता आहे. त्यामुळे नेमकं हे काय प्रकरण आहे? हे जाणून घेऊयात.
Vaibhav Suryavanshi News : टीम इंडियाचा युवा स्टार खेळाडू वैभव सुर्यवंशी सध्या ऑस्ट्रेलिया दौऱ्यावर आहे.या दौऱ्यात वैभव सुर्यवंशी त्याच्या बॅटीने चांगली कामगिरी करतो आहे. अशात वैभव सुर्यवंशीला एक वॉर्निग आली आहे. या वॉर्निंगनूसार त्याची फिटनेसची चौकशी होण्याची शक्यता आहे. त्यामुळे नेमकं हे काय प्रकरण आहे? हे जाणून घेऊयात.
टीम इंडियाचा अंडर 19 संघ ऑस्ट्रेलिया दौऱ्यावर आहे. या दौऱ्यातला शेवटचा टेस्ट सामना सध्या टीम इंडिया खेळते आहे. या सामन्या दरम्यानच वैभव सुर्यवंशीला मोठी वॉर्निग मिळाली आहे.त्यामुळे आता भारतात आल्यावर त्याच्या फिटनेसची चौकशी होणार आहे. टीम इंडियाच्या माजी प्रशिक्षकाने केलेल्या विधानानंतर वैभव सुर्यवंशीची चौकशी होणार आहे.
टीम इंडियाचे माजी फलंदाजी प्रशिक्षक विक्रम राठोड यांनी वैभव सुर्यवंशीला त्याच्या फिटनेसवरून त्याला इशारा दिला आहे. तसेच भारतात आल्यावर त्याची चौकशी केली जाणार असल्याचेही राठोड यांनी सांगितले आहे.
advertisement
आयपीएलमधल्या राजस्थान रॉयल्स या फ्रेंचायजी टीमने एक व्हिडिओ सोशल मीडियावर शेअर केला आहे. या व्हिडिओमध्ये विक्रम राठोड आणि वैभव सूर्यवंशी यांच्यातील व्हिडिओ कॉल संभाषण दाखवण्यात आले आहे. या कॉलमध्ये, राठोड सुरुवातीला हसतात आणि वैभवला ऑस्ट्रेलियातील त्याच्या अनुभवाबद्दल विचारतात. त्यानंतर अचानक विषय फिटनेसकडे वळवतो.
यावेळी राठोड कॉलवर वैभवला विचारतात, "तुझी फिटनेस कशी आहे?'' वैभव यावर उत्तर देतो, ''फिटनेस ठीक आहे.''परंतु प्रशिक्षक त्याच्या उत्तराशी सहमत नसल्याचे दिसून येते आणि पुढे ते म्हणतात, तू परत आल्यावर समजेल. याचाच अर्थ वैभव सुर्यवंशीने आपल्या फिटनेसवर विशेष लक्ष द्यावे, अशी राठोडची इच्छा आहे. त्यामुळे वैभव भारतात परतल्यास त्याची फिटनेस चाचणी घेतील,अशी चर्चा आहे.
advertisement
मिडिया रिपोर्टनुसार, वैभवला औपचारिकपणे इशारा देण्यात आला आहे. संघ व्यवस्थापनाने त्याला स्पष्ट केले आहे की फिटनेस मानकांशी कोणतीही तडजोड केली जाणार नाही. भारतात परतल्यानंतर त्याची फिटनेस टेस्ट केली जाईल. हे पाऊल महत्त्वाचे आहे कारण वैभवला राजस्थान रॉयल्ससाठी भविष्यातील संभाव्य खेळाडू म्हणून पाहिले जाते आणि संघ त्याला पुढील स्तरावर विकसित करू इच्छितो.
advertisement
ऑस्ट्रेलियात फलंदाजीने धमाका
ऑस्ट्रेलिया दौऱ्यातील पहिल्या मल्टी-डे सामन्यात वैभव सूर्यवंशीने 113 धावांची शानदार खेळी खेळली. ही त्याच्या कारकिर्दीतील आतापर्यंतची सर्वोत्तम कामगिरी होती. प्रशिक्षक आणि निवडकर्त्यांनी त्याच्या कामगिरीचे कौतुक केले आहे, परंतु क्रिकेटमध्ये दीर्घकालीन टिकून राहण्यासाठी फिटनेस ही गुरुकिल्ली आहे याची आठवण करून दिली आहे.
Location :
Mumbai,Maharashtra
First Published :
October 07, 2025 4:15 PM IST
मराठी बातम्या/स्पोर्ट्स/
Vaibhav Suryavanshi : ऑस्ट्रेलिया दौऱ्यावर असलेल्या वैभव सुर्यवंशीला वॉर्निग, भारतात आल्यावर फिटनेसची होणार चौकशी?