KKR vs RR : आधी मुंबईने आता मुंबईकराने गेम केला,वैभव सुर्यवंशी फुसका बार ठरला

Last Updated:

आयपीएलच्या 18 व्या हंगामात आज कोलकत्ता नाईट रायडर्सने प्रथम फलंदाजी करताना 206 धावा ठोकल्या आहेत. त्यामुळे राजस्थान रॉयल्ससमोर 207 धावांचे आव्हान आहे. या आव्हानाचा पाठलाग करताना राजस्थान रॉयल्सने खराब सूरूवात केली आहे.

vaibhav suryavanshi
vaibhav suryavanshi
KKR vs RR : आयपीएलच्या 18 व्या हंगामात आज कोलकत्ता नाईट रायडर्सने प्रथम फलंदाजी करताना 206 धावा ठोकल्या आहेत. त्यामुळे राजस्थान रॉयल्ससमोर 207 धावांचे आव्हान आहे. या आव्हानाचा पाठलाग करताना राजस्थान रॉयल्सने खराब सूरूवात केली आहे. राजस्थानकडून पुन्हा एकदा वैभव सुर्यवंशी अपयशी ठरला आहे. यावेळी त्याचा एका मुंबईकराने गेम केला आहे.
कोलकत्ताने दिलेल्या 207 धावांच्या लक्ष्याचा पाठलाग करताना राजस्थान रॉयल्सकडून यशस्वी जयस्वाल आणि वैभव सुर्यवंशी जोडी मैदानात उतरली होती. यावेळी पुन्हा एकदा वैभव सुर्यवंशी आपल्या फलंदाजीची चुणुक दाखवेल अशी अपेक्षा होती. मात्र वैभव अवघ्या 4 धावांवर बाद झाला. वैभव अरोराने टाकलेल्या बॉलवर सुर्यवंशीने उंचावर बॉल टाकला होता. यावेळी अजिंक्य रहाणेने उलट पळत जात भन्नाट कॅच घेतला.
advertisement
दरम्यान याआधी मुंबईविरूद्द शून्य धावांवर वैभव सुर्यवंशी आऊट झाला होता. दीपक चहरने वैभव सुर्यवंशीची विकेट घेतली होती. याआधी त्याने 35 बॉलमध्ये शतक ठोकलं होतं. आयपीएलमधलं हे दुसरं सर्वांत वेगवान शतक होतं.

राजस्थान रॉयल्स (प्लेइंग इलेव्हन):

यशस्वी जैस्वाल, वैभव सूर्यवंशी, रियान पराग (कर्णधार), कुणाल सिंग राठोड, ध्रुव जुरेल (विकेटकिपर), शिमरोन हेटमायर, वानिंदू हसरंगा, जोफ्रा आर्चर, महेश थेक्षाना, युद्धवीर सिंग चरक, आकाश मधवाल
advertisement

कोलकाता नाईट रायडर्स (प्लेइंग इलेव्हन) :

रहमानउल्ला गुरबाज (विकेटकिपर), सुनील नरेन, अजिंक्य रहाणे (कर्णधार), आंगक्रिश रघुवंशी, मोईन अली, व्यंकटेश अय्यर, रिंकू सिंग, आंद्रे रसेल, रमणदीप सिंग, वरुण चक्रवर्ती, वैभव अरोरा
view comments
मराठी बातम्या/स्पोर्ट्स/
KKR vs RR : आधी मुंबईने आता मुंबईकराने गेम केला,वैभव सुर्यवंशी फुसका बार ठरला
Next Article
advertisement
Bus fire: परत तीच अंधारी रात्र; ट्रॅव्हल्सच्या बसने घेतला पेट, 20 प्रवाशांचा होरपळून मृत्यू, काळजाचा थरकाप उडवणारा VIDEO
परत तीच अंधारी रात्र ट्रॅव्हल्सच्या बसने घेतला पेट, 20 प्रवाशांचा होरपळून मृत्यू
    View All
    advertisement