RCB च्या विक्रीमागे विराटच्या रिटायरमेंटचा प्लान... IPL मध्ये भूकंप होणार! ऑक्शनआधी घडामोडींना वेग

Last Updated:

गतविजेत्या रॉयल चॅलेंजर्स बँगलोर (RCB) ला आयपीएल 2026 मध्ये नवा मालक मिळणार आहे. सध्याचे मालक डियाजियोने टीमची विक्री होणार असल्याचं स्पष्ट केलं आहे.

RCB च्या विक्रीमागे विराटच्या रिटायरमेंटचा प्लान... IPL मध्ये भूकंप होणार! ऑक्शनआधी घडामोडींना वेग
RCB च्या विक्रीमागे विराटच्या रिटायरमेंटचा प्लान... IPL मध्ये भूकंप होणार! ऑक्शनआधी घडामोडींना वेग
मुंबई : गतविजेत्या रॉयल चॅलेंजर्स बँगलोर (RCB) ला आयपीएल 2026 मध्ये नवा मालक मिळणार आहे. सध्याचे मालक डियाजियोने टीमची विक्री होणार असल्याचं स्पष्ट केलं आहे. आरसीबीच्या पुरुष आणि महिला टीमच्या विक्रीची प्रक्रिया सुरू झाली आहे. 31 मार्च 2026 पर्यंत ही प्रक्रिया पूर्ण होण्याची शक्यता आहे. विराट कोहली हा आरसीबीच्या विक्रीमागचं कारण असण्याची शक्यता आहे.
सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार एएमपी स्पोर्ट्स ऍन्ड एंटरटेन्मेंट चे संस्थापक इंद्रनील दास ब्लाह यांनी आरसीबीच्या विक्रीच्या निर्णयावर प्रकाश टाकला आहे. 'आरसीबी 2025 पर्यंत कोणतीही ट्रॉफी जिंकली नव्हती, पण तरीही टीम टॉप 3 ब्रॅन्ड मध्ये होती. विराट कोहलीची निवृत्ती लवकरच होणार आहे, त्यामुळे फ्रॅन्चायजीची ब्रॅन्ड व्हॅल्यूही कमी होईल. हा तोटा टाळण्यासाठी सध्याचे मालक लवकर बाहेर पडू इच्छित आहेत', असं इंद्रनील दास ब्लाह म्हणाले आहेत.
advertisement

विराट आरसीबीच्या विक्रीचं कारण?

विराट कोहलीमुळे आरसीबी एकही ट्रॉफी न जिंकता, टॉप-3 ब्रॅन्ड झाली. विराटची निवृत्ती होईल, तेव्हा नक्कीच टीमची ब्रॅन्ड व्हॅल्यू कमी होईल, असं टीमच्या मालकांना वाटत आहे. विराट कोहली आयपीएलच्या पहिल्या मोसमापासून आरसीबीकडून खेळत आहे. तेव्हापासूनच तो आरसीबीचा पोस्टर बॉय आहे. आयपीएल 2025 जिंकल्यानंतर आरसीबीची ब्रॅन्ड व्हॅल्यूदेखील वाढली आहे. 2024 मध्ये आरसीबीची ब्रॅन्ड व्हॅल्यू 227 मिलियन डॉलर होती, जी 18.5 टक्क्यांनी वाढून 269 मिलियन डॉलर झाली आहे.
advertisement

विराटने केला नाही करार

दुसरीकडे आयपीएल रिटेनशन आधी विराट कोहलीने आरसीबीसोबत करार केला नसल्याचं वृत्तही समोर आलं आहे. विराट कोहलीने काही वर्षांपूर्वीच आपण आरसीबीमधूनच निवृत्त होणार असल्याचं आणि दुसऱ्या टीमकडून खेळणार नसल्याचं स्पष्ट केलं होतं. आरसीबीची विक्री झाली, तर टीमचे मालक आणि टीमचं नावही बदललं जाण्याची शक्यता आहे, ज्यामुळे आयपीएलमधलं आरसीबीचं अस्तित्वही संपेल, त्यामुळेच विराटने करार केला नाही का? आरसीबीची विक्री होत असेल तर विराट आयपीएलमधूनही रिटायरमेंट घेणार का? अशी भीती त्याच्या चाहत्यांनी व्यक्त केली आहे.
view comments
मराठी बातम्या/स्पोर्ट्स/
RCB च्या विक्रीमागे विराटच्या रिटायरमेंटचा प्लान... IPL मध्ये भूकंप होणार! ऑक्शनआधी घडामोडींना वेग
Next Article
advertisement
Bus fire: परत तीच अंधारी रात्र; ट्रॅव्हल्सच्या बसने घेतला पेट, 20 प्रवाशांचा होरपळून मृत्यू, काळजाचा थरकाप उडवणारा VIDEO
परत तीच अंधारी रात्र ट्रॅव्हल्सच्या बसने घेतला पेट, 20 प्रवाशांचा होरपळून मृत्यू
    View All
    advertisement