advertisement

VIDEO: 'माझ्या वडिलांना आज खूप प्राउड वाटेल...', स्टेडियमवर नाव कोरलं गेलं अन् राहुल द्रविड भावुक झाला

Last Updated:

चिन्नास्वामी आणि द्रविड: एक अतूट नातं राहुल द्रविडने आपल्या कारकिर्दीची सुरुवात याच मैदानावरून केली होती. कर्नाटककडून खेळताना त्याने इथे धावांचे डोंगर उभे केले आणि पुढे भारतीय संघाची भिंत म्हणून स्वतःची ओळख निर्माण केली.

राहुल द्रविडच्या यशात त्याच्या वडिलांचा मोठा वाटा आहे. आपल्या भाषणात द्रविडने खास आपल्या वडिलांचा उल्लेख केला.
राहुल द्रविडच्या यशात त्याच्या वडिलांचा मोठा वाटा आहे. आपल्या भाषणात द्रविडने खास आपल्या वडिलांचा उल्लेख केला.
बेंगळुरू: ज्या मैदानाच्या मातीत खेळून जगातील सर्वोत्तम फलंदाज म्हणून नाव कमावलं, त्याच मैदानाच्या एका टोकाला (End) जेव्हा स्वतःचं नाव मिळतं, तो क्षण कोणत्याही खेळाडूसाठी आयुष्याची कमाई असते. भारतीय क्रिकेटची 'द वॉल' राहुल द्रविडसाठी देखील कालचा दिवस असाच काहीसा होता. बेंगळुरूच्या एम. चिन्नास्वामी स्टेडियममधील एका पॅव्हेलियनला आता अधिकृतपणे ‘राहुल द्रविड एंड’ असे नाव देण्यात आले आहे. या सन्मानानंतर बोलताना द्रविडच्या शब्दांतून जुन्या आठवणींचा पूर वाहत होता आणि त्याचे डोळे पाणावले होते.
'घरापेक्षा जास्त वेळ याच मैदानावर घालवला'
द्रविडसाठी चिन्नास्वामी स्टेडियम म्हणजे केवळ सिमेंटचे बांधकाम नाही. आपल्या भावनांना वाट मोकळी करून देताना तो म्हणाला, "अनिल कुंबळे नेहमी म्हणतो तसं, आम्ही आमच्या स्वतःच्या घरापेक्षा जास्त वेळ याच मैदानावर घालवला आहे. हे मैदान माझ्यासाठी दुसऱ्या घरासारखं आहे. याच मैदानाने मला यशाची शिखरे दाखवली आणि अपयशातून सावरण्याची ताकदही दिली. आज मी जो कोणी आहे, त्यामागे या मैदानाचा आणि कर्नाटक क्रिकेट असोसिएशनचा (KSCA) मोठा वाटा आहे."
advertisement
वडिलांच्या आठवणीने गळा दाटून आला
राहुल द्रविडच्या क्रिकेट प्रवासात त्याचे वडील शरद द्रविड यांची भूमिका किती महत्त्वाची होती, हे पुन्हा एकदा जगासमोर आले. आपल्या भाषणात वडिलांचा उल्लेख करताना द्रविड अधिकच भावुक झाला. तो म्हणाला, "माझ्या वडिलांना क्रिकेटचं वेड आहे. मी लहान असताना ते ऑफिसमधून सुटी काढून मला येथे टेस्ट सामने आणि रणजी ट्रॉफीचे सामने दाखवायला घेऊन यायचे. माझ्यात क्रिकेटची ओढ त्यांनीच निर्माण केली."
advertisement
पुढे बोलताना तो म्हणाला, "आज जेव्हा त्यांना हे कळेल की, त्यांच्या मुलाच्या नावाने या ऐतिहासिक मैदानाचा एक 'एंड' ओळखला जाणार आहे, तेव्हा त्यांना माझा खूप अभिमान वाटेल. हे सुख माझ्यासाठी इतर कोणत्याही सन्मानापेक्षा मोठं आहे."
advertisement
एक अतूट नातं: चिन्नास्वामी आणि द्रविड
कर्नाटक राज्य क्रिकेट असोसिएशनने (KSCA) घेतलेल्या या निर्णयामुळे द्रविडच्या नावावर एक कायमस्वरूपी मोहोर उमटवण्यात आली आहे. माजी क्रिकेटपटू व्यंकटेश प्रसाद आणि त्यांच्या समितीचे आभार मानताना द्रविडने हा सन्मान आपल्या कुटुंबासाठी खूप मोठी गोष्ट असल्याचे सांगितले.
बेंगळुरूच्या गल्लीतून सुरू झालेला राहुल द्रविडचा प्रवास आज याच चिन्नास्वामी स्टेडियमवर अमर झाला आहे. आता जेव्हा जेव्हा या मैदानातून एखादा गोलंदाज 'राहुल द्रविड एंड' कडून धावत येईल, तेव्हा जगाला द्रविडच्या त्या संयमी खेळीची आणि त्याच्या वडिलांच्या क्रिकेटवेडाची आठवण नक्कीच येईल.
view comments
मराठी बातम्या/स्पोर्ट्स/
VIDEO: 'माझ्या वडिलांना आज खूप प्राउड वाटेल...', स्टेडियमवर नाव कोरलं गेलं अन् राहुल द्रविड भावुक झाला
Next Article
advertisement
8th Pay Commissionचा 'श्रीगणेशा', पगारवाढीचा फॉर्म भरण्यास सुरुवात; लाखो कर्मचाऱ्यांची प्रतीक्षा संपली, सरकारचा मोठा निर्णय
8th Pay Commissionचा 'श्रीगणेशा', पगारवाढीचा फॉर्म भरण्यास सुरुवात
  • 8व्या वेतन आयोगाबाबत सरकारचा मोठा निर्णय

  • लाखो कर्मचाऱ्यांची प्रतीक्षा संपली!

  • पगार आणि पेन्शन किती वाढणार

View All
advertisement