6,6,6,6,6,6,6,6... सलग 8 सिक्स मारून रेकॉर्ड रचणारा आकाश कुमार कोण? IPL मध्ये लागणार सर्वात मोठी बोली?

Last Updated:

Who is Akash Kumar Chaudhary : आकाश कुमारने 2019 मध्ये त्याच्या क्रिकेट कारकिर्दीला सुरुवात केली. त्याने मेघालयकडून नागालँडविरुद्ध प्रथम श्रेणी क्रिकेटमध्ये पदार्पण केले.

Who is Akash Kumar Chaudhary world record
Who is Akash Kumar Chaudhary world record
Fastest Fifty in Cricket Akash Kumar : आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये वर्ल्ड कप विनर खेळाडू युवराज सिंगची इंग्लंडमधील फिफ्टी कुणीच विसरू शकत नाही. 12 बॉलमध्ये फिफ्टी ठोकून युवराजने इतिहास रचला होता. अशातच आता गुजरातच्या सुरतमध्ये रविवारी मेघालयच्या आकाश कुमार चौधरीने फर्स्ट-क्लास क्रिकेटमध्ये सर्वात जलद अर्धशतक ठोकण्याचा जागतिक रेकॉर्ड आपल्या नावावर केला. अरुणाचल प्रदेशविरुद्धच्या रणजी ट्रॉफी प्लेट ग्रुप मॅचदरम्यान या 25 वर्षीय फलंदाजाने केवळ 11 बॉलमध्ये ही ऐतिहासिक कामगिरी केली.

आकाश कुमार चौधरी कोण?

आकाश कुमारपूर्वीचा रेकॉर्ड इंग्लंडचा वेन व्हाईटच्या नावावर होता, ज्याने 2012 मध्ये लीसेस्टरशायरकडून खेळताना एसेक्सविरुद्ध 12 बॉलमध्ये फिफ्टी मारली होती. आकाशच्या या धमाकेदार बॅटिंगने सर्वांनाच आश्चर्यचकित केलं आहे. पण हा आकाश कुमार चौधरी कोण? ज्याने रेड-बॉल क्रिकेटमधील स्फोटक फलंदाजीची व्याख्या बदलून टाकली.

प्रथम श्रेणी क्रिकेटमध्ये डेब्यू

advertisement
आकाश कुमारने 2019 मध्ये त्याच्या क्रिकेट कारकिर्दीला सुरुवात केली. त्याने मेघालयकडून नागालँडविरुद्ध प्रथम श्रेणी क्रिकेटमध्ये पदार्पण केले. त्याच वर्षी तो सिक्कीमविरुद्ध लिस्ट ए सामने आणि गुजरातविरुद्ध टी-20 सामनेही खेळला. एवढंच नाही तर आकाश मिडियम पेसर बॉलिंग देखील करतो. त्यामुळे आयपीएलमध्ये आकाशवर मोठी बोली लागण्याची शक्यता आहे.

गंभीरला हवा तसा खेळाडू

advertisement
आकाशच्या कारकिर्दीवर नजर टाकली तर, त्याने एकूण 30 प्रथम श्रेणी सामने, 28 लिस्ट ए सामने आणि 30 टी-20 सामने खेळले आहेत. प्रथम श्रेणी क्रिकेटमध्ये, आकाशने 500 हून अधिक धावा केल्या आहेत आणि 78 विकेट्स घेतल्या आहेत. तर आकाशने लिस्ट ए सामन्यांमध्ये 203 धावा केल्या आहेत आणि 37 विकेट्स घेतल्या आहेत, तर टी-20 मध्ये त्याच्या नावावर 28 विकेट्स आहेत. त्यामुळे गंभीरला हवा तसा खेळाडू आयपीएल ऑक्शनमध्ये झळकणार का? असा सवाल विचारला जात आहे.
view comments
मराठी बातम्या/स्पोर्ट्स/
6,6,6,6,6,6,6,6... सलग 8 सिक्स मारून रेकॉर्ड रचणारा आकाश कुमार कोण? IPL मध्ये लागणार सर्वात मोठी बोली?
Next Article
advertisement
Bus fire: परत तीच अंधारी रात्र; ट्रॅव्हल्सच्या बसने घेतला पेट, 20 प्रवाशांचा होरपळून मृत्यू, काळजाचा थरकाप उडवणारा VIDEO
परत तीच अंधारी रात्र ट्रॅव्हल्सच्या बसने घेतला पेट, 20 प्रवाशांचा होरपळून मृत्यू
    View All
    advertisement