WPL 2026 : 10 रन्सवर 4 विकेट, टीम इंडियाच्या 'धुरंदर'ने 97 बॉलमध्ये चोप चोप चोपलं, गोलंदाजांची पिसं काढली
- Published by:Prashant Gomane
Last Updated:
डब्ल्युपीएलमध्ये आज रोमांचक सामना पार पडला आहे. या सामन्यात दिल्ली कॅपिटल्सचे 10 रन्सवर 4 विकेट पडले होते. इथून पुढे दिल्लीचा डाव गुंडाळला जाईल असे वाटले होते
Delhi Capital vs Royal Challengers Banglore WPL 2026 : डब्ल्युपीएलमध्ये आज रोमांचक सामना पार पडला आहे. या सामन्यात दिल्ली कॅपिटल्सचे 10 रन्सवर 4 विकेट पडले होते. इथून पुढे दिल्लीचा डाव गुंडाळला जाईल असे वाटले होते. पण टीम इंडियाच्या एका स्टार खेळाडूने वादळी खेळी करून दिल्ली कॅपिल्सचा डाव 166 धावापर्यंत नेला आहे. त्यामुळे दिल्लीने सामन्यात चांगली वापसी केली आहे.
खरं तर या सामन्यात दिल्ली कॅपिटल्स प्रथम फलंदाजीला उतरली होती.यावेळी आरसीबीच्या लॉरेन बेलने 5 धावांवर 2 विकेट काढल्या होत्या. यावेळी लिझेली ली आणि लॉरा वोव्हार्टला स्वस्तात बाद केले होते. त्यानंतर कॅप्टन जेमीमा रॉड्रीग्जने 4 धावा करून बाद झाली होती. त्यानंतर मेरीजन कॅप शुन्यावर बाद झाली होती. त्यामुळे दिल्ली कॅपिटल्सचे 10 धावांवर 4 विकेट पडले होते. इथून पुढे दिल्लीचा डाव ऑलआऊट होईल असे वाटत होते.
advertisement
Welcome to TATA WPL, Lucy Hamilton! 🙌
The young Australian all-rounder went all-guns-blazing, guiding DC to a fiery finish! 🔥#TATAWPL, #DCvRCB | LIVE NOW ➡️ https://t.co/4hTwxURDzO pic.twitter.com/sxkQ3PGaSg
— Star Sports (@StarSportsIndia) January 17, 2026
advertisement
पण टीम इंडियाच्या शेफाली वर्माने दिल्ली कॅपिटल्सचा डाव सावरला होता. शेफाली वर्मा याने यावेळी 41 बॉलमध्ये 62 धावांची खेळी केली होती. या खेळीत त्याने 4 षटकार आणि 5 चौकार मारले होते. या दरम्यान तिने एकटीने 97 बॉल फलंदाजी केली होती.तिच्यासोबत लुसी हेमिल्टनने 19 बॉलमध्ये 36 धावांची खेळी केली. या खेळीत तिने 3 चौकार आणि 3 षटकार मारले होते. त्यामुळे या धावाच्या बळावर दिल्लीने 20 ओव्हरमध्ये 166 धावा केल्या होत्या.
advertisement
आरसीबीकडून यावेळी लॉरेन बेल आणि सायली सातघरेने प्रत्येकी 3 विकेट घेतल्या होत्या. तर प्रेरणा रावतने 2 आणि नदीने डी क्लार्कने 1 विकेट घेतली होती.
मुंबई आणि पुण्यासह महाराष्ट्रातील महानगरपालिका निवडणुकीचे निकाल पाहण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या निवडणूक बातम्या तसेच अपडेट्सची यादी मिळवा.
Location :
Mumbai,Maharashtra
First Published :
Jan 17, 2026 9:44 PM IST
मराठी बातम्या/स्पोर्ट्स/
WPL 2026 : 10 रन्सवर 4 विकेट, टीम इंडियाच्या 'धुरंदर'ने 97 बॉलमध्ये चोप चोप चोपलं, गोलंदाजांची पिसं काढली










