घर असावे घरासारखे, नकोत नुसत्या भिंती; तिथे असावा प्रेम, जिव्हाळा, नकोत नुसती नाती!
- Published by:Aryan K
Last Updated:
राजीव गुरव यांची 'Urbann Analysis & Solution' कंपनी नवी मुंबईतील सोसायट्यांना पुनर्विकास प्रक्रियेत मदत करते. त्यांच्या अनुभवी टीममुळे प्रक्रिया पारदर्शक आणि सोयीस्कर होते.
ही भावना प्रत्येकाच्या मनात असते. आपले स्वतःचे आधुनिक घर असावे हे स्वप्न सर्वांचेच असते, मग ते छोटे दोन खोल्यांचे घर असो, बंगला असो किंवा सदनिका असो. परंतु, एकदा एखाद्या घरात २५-३० वर्षे राहिल्यावर ती वास्तू जुनी होते. आधुनिक युगात राहात असताना आपले घरही तदनुसार असावे, अशी अपेक्षा मनात येते.
पुनर्विकास हा विचार आकर्षक वाटतो, परंतु यामध्ये अनेक जबाबदाऱ्या आणि अडचणींचा सामना करावा लागतो. विशेषतः सोसायटीच्या पुनर्विकास प्रक्रियेत, कागदपत्रांची पूर्तता, सरकारी प्रक्रिया, बिल्डरची निवड, तसेच विकास कार्याचा वेग या सर्व गोष्टी चिंता निर्माण करतात.
या सर्व अडचणी सोडवण्यासाठी राजीव गुरव यांची ‘Urbann Analysis & Solution’ कंपनी कार्यरत आहे. नवी मुंबईतील सीबीडी बेलापूर येथे स्थित असलेली ही कंपनी पुनर्विकासाच्या कामात सोसायट्यांना मदत करते. राजीव गुरव यांना स्थापत्य अभियांत्रिकीमध्ये पदवीधर असून, नगररचना विभागात काम करण्याचा प्रदीर्घ अनुभव आहे. त्यांनी विविध इमारतींच्या आरखड्यांना मंजुरी देणे, बांधकाम मानकांचे पालन करणे, आणि महानगरपालिकेच्या विविध प्रक्रियांचे पालन सुनिश्चित करणे याबाबत चांगली माहिती आहे.
advertisement
विशेषतः, राजीव गुरव नवी मुंबई महानगरपालिकेत 24 वर्ष काम केल्यामुळे, त्यांना पुनर्विकास प्रक्रियेत येणाऱ्या शासकीय नियमांची आणि अडचणींची सखोल माहिती आहे.तसेच त्यांचे सहकारी सुभाष पाटील यांनी सहकार विभागात 32 वर्षे काम केले असून ते सिडकोतून सह निबंधक या पदावरून सेवानिवृत्त झाले आहेत. या सर्वांच्या अनुभवामुळे, त्यांनी पुनर्विकासाच्या प्रक्रियेत असलेल्या अडचणींचे समर्पक निराकरण शोधून काढले आहे, ज्यामुळे सोसायट्यांना या प्रक्रियेत थेट मदत मिळते.
advertisement
Urbann Analysis & Solution कंपनी सर्व प्रक्रिया महाराष्ट्र सहकारी सोसायटी कायद्याशी संबंधित असलेल्या नियमांचे पालन करते . अडव्होकेट संतोष यादव यांचे नेतृत्वातील या कंपनीच्या कायदेशीर टीमद्वारे सर्व आवश्यक दस्तऐवजांची तपासणी आणि पूर्तता सुनिश्चित केली जाते, ज्यामुळे सदस्यांचे हक्क, स्वार्थ आणि सुरक्षितता यांचे रक्षण होईल.
वास्तुविशारद पियुष टाक यांचे नेतृत्वातील Urbann Analysis & Solution कंपनीची नियोजन टीम पर्यावरणाच्या दृष्टीकोनातून योग्य योजना तयार करते, ज्यामध्ये पर्यावरणीय बाबी सह योग्य FSI चा उपयोग सुनिश्चित करण्यात येतो त्यामुळे सभासदांचा जास्तीत जास्त फायदा होतो.
advertisement
विशेषतः सर्व प्रक्रिया हि सभासदाना विश्वासात घेऊन पारदर्शक पद्धतीने पूर्ण करण्याकडे कंपनीचा कल असतो ज्यामध्ये कंपनीच्यावतीने महेंद्र सप्रे सेवानिवृत्त सहाय्यक आयुक्त न मु म पा यांचा सभासदांशी नियमित संपर्क असतो. तर याकामी आजमितीस सुमारे 40 सहकार्यांची टीम जितेंद्र घाटे यांचेसह निरंतर व सातत्यपुर्णपणे कार्यरत आहे.

advertisement
पुनर्विकास प्रक्रियेत खालील टप्पे महत्त्वाचे आहेत:
- सामाजिक सहभाग: पुनर्विकास प्रक्रियेत, सोसायटीच्या सभासदांची संमती घेतली जाते. सभासदांच्या सहभागामुळे, प्रक्रिया अधिक पारदर्शक आणि सहकार्यात्मक बनते.
- प्रोजेक्ट मॅनेजमेंट कन्सल्टंटची नेमणूक : सभासदांच्या बहुमताने करण्यात येते. प्रोजेक्ट मॅनेजमेंट कन्सल्टंट पुनर्विकास कार्य सुव्यवस्थित आणि तांत्रिकदृष्ट्या मजबूत असेल हे सुनिश्चित करतात.
- विकासकाची निवड: विकासकाची निवड जाहीर निविदा प्रक्रियेद्वारे केली जाते. यासाठी, मराठी व इंग्रजीतील प्रमुख वृत्तपत्रांमध्ये निविदा सूचनांची जाहिरात दिली जाते. हे सुनिश्चित करते की सर्वोत्तम विकासकाची निवड पारदर्शकतेने केली जाते.
- पुनर्विकास योजना तयार करणे: एकदा विकासकाची निवड झाल्यावर, विकास योजना आणि feasibility report तयार केला जातो. यामध्ये प्रकल्पाच्या विविध पैलूंवर विचार केला जातो, जसे की खर्च, वेळापत्रक, आणि संसाधनांची उपलब्धता.
- शासकीय मंजुरी: नंतर विविध शासकीय विभागाकडून मंजुरी घेतली जाते. यामध्ये विविध कागदपत्रांची पूर्तता करणे, बिल्डिंग प्लान्स आणि इतर आवश्यक डोक्युमेंट्स सादर करणे यांचा समावेश होतो.
- प्रकल्प व सदनिकेसंदर्भात करार: विकासकरारनामा ,नवीन सदनिकासाठी, सभासदांशी करार केले जातात. सदनिकाधारकांच्या राहण्याच्या व्यवस्थेसाठी विकासकाकडून मासिक भाडे आणि इतर खर्चाची तरतूद केली जाते.
- पुनर्बांधणी प्रक्रिया: अंतिमतः, जुनी इमारत पाडून तिची पुनर्बांधणी केली जाते. यानंतर, त्या इमारतीचा किंवा सोसायटीचा ताबा घेऊन, त्याची मालकी परत मूळ सोसायटीकडे दिली जाते.
advertisement
राजीव गुरव यांची Urbann Analysis & Solution कंपनी सोसायटीच्या सदस्याचे आधुनिक आणि सर्व सुविधा असलेले घराचे स्वप्न पूर्ण करण्यात मदत करते. पुनर्विकास प्रक्रियेतून, प्रत्येक रहिवास्याला त्यांच्या स्वप्नातील घर प्रत्यक्षात साकार करण्याची संधी मिळते.
Location :
Mumbai,Maharashtra
First Published :
February 28, 2025 4:48 PM IST
मराठी बातम्या/Studio 18/
घर असावे घरासारखे, नकोत नुसत्या भिंती; तिथे असावा प्रेम, जिव्हाळा, नकोत नुसती नाती!