पतीच्या निधनानंतर खचली नाही! 3 मुलींची आई यूट्यूब पाहून शिकली 'हे' काम, सुरू केला स्वतःचा उद्योग
- Published by:Arjun Nalavade
- local18
Last Updated:
प्रियंका सोनकर हिचा पती 2019 मध्ये निधन पावला. तीन मुलींसह अचानक तिच्यावर जबाबदाऱ्या आल्या. तिने 2021 मध्ये स्वयं-सहायता गटात प्रवेश घेतला. नंतर कर्ज घेऊन...
एकेकाळी त्यांच्याकडे फक्त पतीच्या मृत्यूचं दुःख, तीन मुलांची जबाबदारी आणि अनिश्चित भविष्य होतं. उत्तर प्रदेशातील कौशांबी जिल्ह्यातील सैनी भागातील मलका गावात राहणाऱ्या प्रियंका सोनकर यांनी केवळ स्वतःला आत्मनिर्भर सिद्ध केलं नाही, तर त्या इतर महिलांसाठीही प्रेरणास्रोत ठरल्या आहेत. त्यांना तीन मुली आहेत. प्रियंकाच्या पतीचं 2019 मध्ये निधन झालं. अचानक कुटुंबाचा उत्पन्नाचा मार्ग बंद झाला. अशा परिस्थितीत घर चालवणं कठीण झालं होतं, पण त्यांनी हार मानली नाही.
अशी चालवते कुटुंब
2021 मध्ये प्रियंकाने एका बचत गटात सामील होऊन काम करायला सुरुवात केली. त्यानंतर त्यांनी कर्ज घेतलं आणि चप्पल बनवण्याचं मशीन खरेदी केलं. युट्यूबवर चप्पल बनवण्याचं काम शिकल्या. गेल्या पाच महिन्यांपासून प्रियंका चप्पल बनवत आहेत. चप्पल तयार झाल्या असल्या तरी, त्या विकताना अडचणी येतात. काही चप्पल दुकानदार घरी येऊनच खरेदी करतात. जे शिल्लक राहतात, ते गावात किरकोळ दरात विकले जातात. अशा प्रकारे त्या आपल्या कुटुंबाचा गाडा चालवतात.
advertisement
सध्या कमी नफा
प्रियंका सोनकर सांगतात की, 2019 मध्ये पतीच्या निधनानंतर कुटुंब चालवणं खूप कठीण होतं. 2021 मध्ये त्या गटात सामील झाल्या, जिथे त्यांनी सुमारे तीन वर्षे काम केले. त्यानंतर त्यांनी कर्ज घेतलं आणि चप्पल बनवण्याचं मशीन खरेदी केलं. युट्यूबच्या मदतीने त्यांनी चप्पल बनवण्याचं काम शिकून घेतलं. जानेवारीपासून त्यांनी काम सुरू केलं. सध्या या कामातून थोडाफारच नफा मिळतो, ज्यामुळे कसाबसा कुटुंबाचा गुजारा चालतो. सध्या चप्पल विकायला खूप अडचण येते. तरीही, दुकानदार स्वतःहून फोन करून अनेक चप्पल घरी येऊन घेऊन जातात. उरलेला माल गावातच किरकोळ दरात विकला जातो.
advertisement
हे ही वाचा : आठवतोय का 'बाबा का ढाबा'? रातोरात स्टार झाले होते कांता प्रसाद, आता पुन्हा रस्त्यावरच यावं लागलं; पण का?
हे ही वाचा : उन्हाळ्यात जनावरांची काळजी कशी घ्यावी? पशुवैद्यकीय अधिकाऱ्यांनी दिल्या 'या' महत्त्वाच्या टिप्स!
Location :
Mumbai,Maharashtra
First Published :
May 06, 2025 2:19 PM IST
मराठी बातम्या/Success Story/
पतीच्या निधनानंतर खचली नाही! 3 मुलींची आई यूट्यूब पाहून शिकली 'हे' काम, सुरू केला स्वतःचा उद्योग