गगनभरारी! मराठी माध्यमातील समर्थ कुलकर्णी यांची हवाई दलात अधिकारीपदी निवड

Last Updated:

समर्थ कुलकर्णी आणि भव्य शाह या मराठी माध्यमातील तरुणांनी AFCAT परीक्षा उत्तीर्ण करून भारतीय हवाई दलात अधिकारी म्हणून निवड मिळवली, महाराष्ट्रासाठी ही अभिमानाची बातमी.

News18
News18
आजकाल स्पर्धा इतकी वाढलीय की मराठी त्या स्पर्धेत आपल्या मुलाला टिकवण्यासाठी म्हणून आई वडिल लाखो रुपये खर्च करुन चांगल्या दर्जाचं शिक्षण देण्याचा प्रयत्न करतात. मात्र मुलामध्ये टॅलेंट असेल तर त्यासाठी महागडी शाळा नाही तर योग्य दिशा मिळणं आवश्यक आहे हे पुन्हा एकदा सिद्ध झालं. मराठी माध्यमातून शिकलेल्या मुलांना इंग्रजीचा न्यूनगंड असतो. मात्र याच मराठी माध्यमातून शिकून समर्थ कुलकर्णी यांनी हवाई दलाच अधिकारी होण्याचा मान मिळवला, ही महाराष्ट्रासाठी अभिमानाची बातमी आहे.
ल्ली आपल्या मुलांना इंग्रजी माध्यमातच शिकवण्याचा पालकांमध्ये जो एक कल असतो, त्याला छेद देणारी आणि महाराष्ट्राला अभिमान वाटेल अशी बातमी आहे. ठाण्याचे दोन तरुण, मराठी माध्यमात शिकलेले समर्थ कुलकर्णी आणि पार्टटाईम नोकरी करून शिक्षण घेणारे भव्य शाह, हे दोघेही भारतीय हवाई दलात अधिकारी म्हणून रुजू झाले आहेत.
हैदराबादजवळील डुंडीगल येथील हवाई दल अकादमीमध्ये नुकताच २१६ वा दीक्षांत समारंभ पार पडला. या समारंभात महाराष्ट्रातील याच दोन तरुणांचा अधिकारी म्हणून रुजू होणार असल्याची माहिती दिली आहे. समर्थ कुलकर्णी यांनी दीड वर्षांचे खडतर प्रशिक्षण यशस्वीपणे पूर्ण करून हवाई दलात Air Traffic Controller म्हणून जबाबदारी स्वीकारली आहे. पहिल्याच प्रयत्नात त्यांनी 'अॅफकॅट' (AFCAT) परीक्षा पहिल्याच प्रयत्नात यशस्वीरित्या दिली होती.
advertisement
समर्थ कुलकर्णी यांच्या यशामागे त्यांच्या घरच्या संस्कारांचे मोठे बळ आहे. समर्थ यांचे वडील मुख्याध्यापक आहेत, तर आई गृहिणी आहे. आईवडिलांनी समर्थ यांना लहानपणापासूनच शिस्त आणि उत्तम सांस्कृतिक वातावरणात घडवले. समर्थ यांनी दहावीपर्यंतचे शिक्षण अहिल्यानगर इथे मराठी माध्यमातून पूर्ण केले, त्यानंतर बीसीए ही पदवी घेतली शिक्षणाचा उपयोग देशसेवेसाठी करायचा, असे संस्कार त्यांना घरातूनच मिळाले होते, ज्यामुळे त्यांनी 'हवाई दलतील प्रवेश परीक्षा' (AFCAT) दिली आणि पहिल्याच प्रयत्नात ते यशस्वी ठरले.
advertisement
या दोन्ही तरुणांचे यश मराठी माध्यमात शिकणाऱ्या आणि देशाच्या सेवेत जाण्याचे स्वप्न पाहणाऱ्या असंख्य तरुणांसाठी एक मोठी प्रेरणा आहे. इंग्रजी माध्यमाचा आग्रह धरणाऱ्या पालकांसाठी आणि विद्यार्थ्यांना हे एक ज्वलंत उदाहरण आहे की, भाषा कोणतीही असो, जिद्द आणि कठोर परिश्रमाच्या जोरावर देशाच्या सर्वोच्च पदांपर्यंत मजल मारता येते.
view comments
मराठी बातम्या/Success Story/
गगनभरारी! मराठी माध्यमातील समर्थ कुलकर्णी यांची हवाई दलात अधिकारीपदी निवड
Next Article
advertisement
BMC Election: निवडणूक आयोगाचा प्लॅन तयार, मतदान-निकालाच्या तारखा ठरल्या, २४ तासांत कधीही आचारसंहिता?
EC चा प्लॅन तयार, मतदान-निकालाच्या तारखा ठरल्या, २४ तासांत आचारसंहिता?
  • EC चा प्लॅन तयार, मतदान-निकालाच्या तारखा ठरल्या, २४ तासांत आचारसंहिता?

  • EC चा प्लॅन तयार, मतदान-निकालाच्या तारखा ठरल्या, २४ तासांत आचारसंहिता?

  • EC चा प्लॅन तयार, मतदान-निकालाच्या तारखा ठरल्या, २४ तासांत आचारसंहिता?

View All
advertisement