एकही मॅच खेळला नाही, Reels करता करता IPL मध्ये पोहोचला 20 वर्षांचा हा तरुण कोण?
- Published by:Kranti Kanetkar
Last Updated:
एजाज सावरिया याने इन्स्टाग्रामवर बॉलिंगचे व्हिडीओ टाकून आदिल रशीद यांची दाद मिळवली आणि IPL 2026 मिनी ऑक्शनपर्यंत पोहोचला, पण तो अनसोल्ड राहिला.
नशीब कधी कुठे कसं साथ देईल याचा नेम नाही, कधी अचानक एखाद्या स्वप्नासारखं व्हावं आणि रातोरात सारं काही बदलावं पण क्षणिक असावं अशी परिस्थिती या 20 वर्षीय तरुणासोबत झाली आहे. एकाही प्रोफेशनल मॅच न खेळता हा तरुण थेट IPL 2026 च्या ऑक्शनपर्यंत पोहोचला. रिल्स करता करता तो IPL मध्ये गेला आहे. एजाज सावरिया हा 20 वर्षीय तरुण इन्स्टाग्रामवर बॉलिंगचे व्हिडीओ टाकायचा.
या व्हिडीओमुळे तो सोशल मीडियावर हळूहळू प्रसिद्ध होऊ लागला. इंग्लंडचे लेग स्पीनर इंग्लंडचे प्रसिद्ध लेग स्पिनर आदिल रशीद यांना त्याच्या बॉलिंगची स्टाइल आवडली. त्याचं बॉलिंग करण्याचं कौशल्य आवडलं. ते खूप खुश झाले. त्यांनी सावरियाच्या पोस्टवर कमेंट केली आणि त्याचे व्हिडीओ वेगानं व्हायरल होऊ लागले. हजारे ट्रॉफी, सैय्यद मुश्ताक अली ट्रॉफी सारख्या स्पर्धांमध्ये एकदाही त्याला सहभाग मिळालेला नाही. मात्र तरीही त्याला IPL मध्ये ऑक्शनची यावेळी संधी मिळाली.
advertisement
आयपीएल मिनी ऑक्शनमध्ये त्याचं नाव 265 व्या स्थानावर होतं. तो अनसोल्ड राहिला, त्याला कोणत्याही संघाने आपल्या टीममध्ये सध्या तरी घेतलं नाही. 2017 मध्ये त्याने विजय क्रिकेट क्लब जॉईन केला होता. 3 वर्ष तिथे खेळल्यानंतरही त्याला फार संधी देण्यात आल्या नाहीत. तिथून त्याने राजस्थानला जाण्याचा निर्णय घेतला. मात्र तिथेही वाट खडतर होती. त्यानंतर 2022 रोजी जयपूरमध्ये यायचा निर्णय घेतला.
advertisement
advertisement
इतक्या ठिकाणी फिरूनही म्हणावं तेवढं यश मिळत नव्हतं. जिल्ह्याच्या टीममध्ये जागा तर मिळाली मात्र बेंचवर बसण्याची वेळ आली. त्याला खेळण्याची संधी दिली नाही. अखेर त्याने इन्स्टाग्रामवर व्हिडीओ पोस्ट करायला सुरुवात केली. आदिल यांच्या कमेंटनंतर एजाज सावरिया याने व्हिडीओ अपलोड करणं थांबवलं नाही तर ते सुरूच ठेवलं त्याचे व्हिडीओ आता पूर्वीपेक्षा जास्त लोकांपर्यंत पोहोचू लागले. अखेर त्याला IPL २०२६ च्या मिनी ऑक्शनमध्ये संधी तर मिळाली मात्र अनसोल्डच राहण्याची वेळ आली.
view commentsLocation :
Mumbai,Maharashtra
First Published :
Dec 20, 2025 2:31 PM IST
मराठी बातम्या/Success Story/
एकही मॅच खेळला नाही, Reels करता करता IPL मध्ये पोहोचला 20 वर्षांचा हा तरुण कोण?










