Success Story : नोकरीचा राजीनामा देऊन धरली व्यवसायाची वाट, दोन मराठी बहिणींची जोडी ठरतेय हिट

Last Updated:

Business journey : नोकरी असो अथवा व्यावसाय महिला या पुरुषांच्या नेहमी बरोबर दिसता आहे. त्याच प्रमाणे नाशिक मधील २ बहिणींनी देखील उत्तम असा व्यावसाय सुरू केला आहेत. नोकरी पेक्षा छोटा का होईना स्वतःचा व्यावाया असावा या करता स्नेह आणि विभा या दोन तरुणीनी मिळून एक पिझा सेंटर सुरू केले आहे. ज्या माध्यमातून या दोघी बहिणी महिन्याला चांगलीच कमाई करत आहेत.

+
दोन

दोन बहिणी करत आहे पिज़्ज़ा विक्री करून स्वतःचा व्यवसाय.

नोकरी असो अथवा व्यवसाय महिला या पुरुषांच्या नेहमी बरोबर दिसत आहे. त्याच प्रमाणे नाशिक मधील २ बहिणींनी देखील उत्तम असा व्यवसाय सुरू केला  आहे. नोकरी पेक्षा छोटा का होईना स्वतःचा व्यवसाय असावा या करता स्नेहा आणि विभा या दोन तरुणीनी मिळून एक पिझा सेंटर सुरू केले आहे. ज्या माध्यमातून या दोघी बहिणी महिन्याला चांगलीच कमाई करत आहेत.
विभा आणि स्नेहा या दोघी बहिणी आहेत आणि त्या दोघी उत्तम अशा डान्स कोरियोग्राफर देखिल आहेत. विशेष म्हणजे या दोघी बहिणी एकाच  शाळेत डांस टिचर म्हणून देखिक काम करत होत्या. परंतु स्वतःचा व्यवसाय करावा या करता त्यांनी कोरोना पूर्वी एक कॅफे देखिक सुरू केला होता. परंतु अचानक आलेल्या लॉकडाउन मुळे त्यांचा नवीनच व्यवसाय हा त्याना बंद करावा लागला. 
advertisement
व्यवसाय बंद झाल्यानंतर काहीतरी काम हवे या करता त्यांनी पुन्हा नोकरी करण्याचा विचार केला. परंतु नोकरीत काही रस राहिला नाही, या करता या दोघी बहिणींनी डांस क्लासेस घेण्यास सुरवात केली. परंतु, यात पण पाहिजे तसे पैसे मिळत नसल्याने त्यांनी पुन्हा आपण फूड बिझनेस करू शकतो या विचाराने एक छोटी सुरवात आता केली आहे. 
advertisement
सकाळी डांस क्लासेस घेऊन या दोघी  तरुणी संध्याकाळी  एका छोट्या हातगाडीवर पिज्जा आणि पिज्जा पाणीपुरी असे पदार्थ एकदम कमी भावात विक्री करत असतात. कॅफेचा जुना अनुभव असल्याने या दोघी तरुणी उत्तम असे खाद्य पदार्थ बनवत असतात . यामुळे रोज संध्याकाळी यांच्या गाडीवर मोठी गर्दी होत असते आणि या माध्यमातून या दोघी चांगली कमाई देखील करू लागल्या आहेत.  तुम्हाला देखील यांची नवीन पिज्जा पाणीपुरी ही खायची असल्याने यांच्याकडे नक्की भेट द्या.
view comments
मराठी बातम्या/Success Story/
Success Story : नोकरीचा राजीनामा देऊन धरली व्यवसायाची वाट, दोन मराठी बहिणींची जोडी ठरतेय हिट
Next Article
advertisement
Dhule Election: भाजप कार्यकर्त्यांचा धिंगाणा, शिवीगाळ केली, ईव्हीएम मशीन फोडली, शिंदे गटाच्या आरोपाने खळबळ
भाजप कार्यकर्त्यांचा धिंगाणा, शिवीगाळ केली, ईव्हीएम मशीन फोडली, शिंदे गटाच्या आर
  • मतदान केंद्रावर मोठा गोंधळ झाल्याचा प्रकार समोर आला आहे.

  • प्राथमिक विद्यामंदिरातील मतदान केंद्रात असलेल्या मतदान यंत्राची तोडफोड

  • भाजप कार्यकर्त्यांनी तोडफोड केल्याचा आरोप शिंदे गटाने केला आहे.

View All
advertisement