आता मालमत्ताच नव्हेतर सोशल मीडियावरही वारसदार निवडावा लागणार, वाचा सविस्तर

Last Updated:

Tech News : एखाद्या व्यक्तीचा मृत्यू झाल्यानंतर त्याची संपत्ती, बँक खाती, मालमत्ता यांसाठी कायदेशीर वारस ठरलेला असतो. पण तुम्ही कधी विचार केला आहे का की, त्या व्यक्तीच्या सोशल मिडिया अकाउंटचं काय होतं?

tech news
tech news
मुंबई : एखाद्या व्यक्तीचा मृत्यू झाल्यानंतर त्याची संपत्ती, बँक खाती, मालमत्ता यांसाठी कायदेशीर वारस ठरलेला असतो. पण तुम्ही कधी विचार केला आहे का की, त्या व्यक्तीच्या सोशल मिडिया अकाउंटचं काय होतं? त्याच्या पोस्ट, फोटो, व्हिडीओ, आठवणी यांचं काय? याच प्रश्नावर सोशल मीडिया कंपन्यांनी आता "डिजिटल वारस" ठरवण्याची सुविधा देण्यास सुरुवात केली आहे.
डिजिटल लिगसी म्हणजे नेमकं काय?
डिजिटल लिगसी किंवा सोशल मीडिया लिगसी कॉन्टॅक्ट म्हणजे असा एक पर्याय, ज्या अंतर्गत तुम्ही मृत्यूनंतर तुमचं सोशल मीडिया अकाऊंट कोण सांभाळणार हे आधीच निश्चित करू शकता. फेसबुक, गूगल, इन्स्टाग्रामसारखे बडे प्लॅटफॉर्म हे फीचर देतात. हे वापरून तुम्ही तुमच्या खात्याची माहिती, आठवणी आणि डेटावर तुमच्या विश्वासातील व्यक्तीला अधिकार देऊ शकता.
advertisement
फेसबुकवर लिगसी कॉन्टॅक्ट कसा सेट करावा?
फेसबुक वापरकर्त्यांना त्यांच्या जवळच्या व्यक्तीला "Legacy Contact" म्हणून नियुक्त करण्याची सुविधा देतो. यामुळे त्या व्यक्तीला तुमच्या निधनानंतर अकाऊंटच्या काही मर्यादित गोष्टी नियंत्रित करता येतात – जसे की प्रोफाइल फोटो बदलणे, श्रद्धांजली पोस्ट टाकणे वगैरे.
सेटिंग कसं कराल?
फेसबुक अ‍ॅप उघडा. “Settings & Privacy” > “Settings” मध्ये जा. “Memorialization Settings” निवडा. “Choose Legacy Contact” वर क्लिक करून विश्वासू व्यक्ती निवडा
advertisement
गुगलचे Inactive Account Manager फीचर
गुगल अकाउंटसाठी तुम्हाला Inactive Account Manager चा पर्याय मिळतो. जर तुमचं अकाऊंट काही कालावधीसाठी निष्क्रिय राहिलं, तर तुमचं डेटा डिलीट करायचा की इतर व्यक्तीला शेअर करायचा हे तुम्ही आधीच सेट करू शकता.
सेटिंग कशी करायची?
Google Account वर लॉगिन करा.
“Data & Privacy” मध्ये जा.
“Make a plan for your digital legacy” वर क्लिक करा.
advertisement
Inactive Account Manager सुरू करा आणि हवे तसे पर्याय निवडा.
इन्स्टाग्रामवर काय करता येईल?
इन्स्टाग्राम सध्या Legacy Contact सेट करण्याची सुविधा देत नाही. मात्र, जर एखाद्या व्यक्तीचा मृत्यू झाला असेल तर त्याच्या नातेवाईकांनी मृत्यू प्रमाणपत्र दाखवून अकाऊंट “Memorialized” करू शकतात.
यामध्ये अकाऊंटवर "Remembering" असा टॅग दिसेल, पण कोणीही त्या अकाऊंटमध्ये लॉगिन करू शकणार नाही.
advertisement
डिजिटल लिगसी का गरजेची आहे?
आजकाल आपल्या जीवनाचा मोठा भाग डिजिटल झाला आहे – फोटो, व्हिडीओ, आठवणी, संवाद या सर्व गोष्टी सोशल मिडियावर संग्रहित असतात. डिजिटल लिगसीमुळे तुमच्या डेटाचा गैरवापर टाळता येतो. कुटुंबियांना तुमच्या आठवणी जपता येतात. अकाउंटची प्रायव्हसी सुरक्षित राहते.अकाउंट हॅक होण्याचा धोका कमी होतो
दरम्यान, संपत्तीप्रमाणेच आता सोशल मीडिया अकाउंटसाठीही वारस ठरवणे आवश्यक बनले आहे. फेसबुक, गुगलसारख्या कंपन्यांनी दिलेल्या डिजिटल लिगसी फीचर्सचा वापर करून तुम्ही तुमचे डिजिटल आयुष्य तुमच्या मृत्यूनंतरही सुरक्षित ठेवू शकता.
view comments
मराठी बातम्या/टेक्नोलॉजी/
आता मालमत्ताच नव्हेतर सोशल मीडियावरही वारसदार निवडावा लागणार, वाचा सविस्तर
Next Article
advertisement
Bus fire: परत तीच अंधारी रात्र; ट्रॅव्हल्सच्या बसने घेतला पेट, 20 प्रवाशांचा होरपळून मृत्यू, काळजाचा थरकाप उडवणारा VIDEO
परत तीच अंधारी रात्र ट्रॅव्हल्सच्या बसने घेतला पेट, 20 प्रवाशांचा होरपळून मृत्यू
    View All
    advertisement