ChatGPT चा सर्वात स्वस्त प्लॅन लॉन्च! फक्त 399 मध्ये मिळतील अनेक फीचर्स
- Published by:Mohini Vaishnav
Last Updated:
ChatGPT Go Plan price: OpenAI ने भारतासाठी ChatGPT Go सबस्क्रिप्शन प्लॅन लाँच केला आहे. ज्याची किंमत ₹399/महिना आहे. यामध्ये, यूझर्सना GPT-5 अॅक्सेस, 10 पट जास्त मेसेज आणि इमेज जनरेशन, जलद रिस्पॉन्स टाइम आणि अॅडव्हान्स्ड टूल्स मिळतील...
मुंबई : आर्टिफिशियल इंटेलिजेंस (AI) वर काम करणारी कंपनी OpenAI ने भारतात त्यांचा नवीन सबस्क्रिप्शन प्लॅन ChatGPT Go लाँच केला आहे. हा आतापर्यंतचा सर्वात स्वस्त प्लॅन आहे, ज्याची किंमत फक्त 399 रुपये प्रति महिना आहे. कंपनीचे म्हणणे आहे की ही ऑफर विशेषतः भारतीय यूझर्ससाठी डिझाइन करण्यात आली आहे जेणेकरून अधिक लोक कमी किमतीत AI चा फायदा घेऊ शकतील.
या प्लॅन अंतर्गत, यूझर्सना फ्री मोफत व्हर्जनच्या तुलनेत 10 पट जास्त मेसेज पाठवण्याची आणि 10 पट जास्त इमेज जनरेट करण्याची सुविधा मिळेल. याशिवाय, त्याचा रिस्पॉन्स टाइम देखील जलद असेल.
ChatGPT Go सबस्क्रिप्शनना GPT-5 मॉडेल्समध्ये एक्सटेंडेड अॅक्सेस, लाँग मेमरी सपोर्ट, इमेज जनरेशन, फाइल अपलोड आणि अॅडव्हान्स्ड डेटा अॅनालिसिस (पायथॉन टूल्ससह) सारखी फीचर्स देखील मिळतील. तसेच, हा प्लॅन प्रोजेक्ट मॅनेजमेंट, टास्क मॅनेजमेंट आणि कस्टम GPT सारख्या अॅडव्हान्स्ड फीचर्सना देखील सपोर्ट करतो.
advertisement
सध्याच्या प्रीमियम प्लॅनपेक्षा स्वस्त
सध्या भारतात OpenAI चे दोन प्रीमियम प्लॅन उपलब्ध आहेत, ChatGPT Plus, ज्याची किंमत दरमहा 1,999 रुपये आहे आणि दुसरा ChatGPT Pro, ज्याची किंमत दरमहा 19,900 रुपये आहे. या तुलनेत, ChatGPT Go खूपच परवडणारा आहे.
advertisement
कंपनीने अद्याप ChatGPT Go साठी नेमकी वापर मर्यादा जाहीर केलेली नाही. तसेच, GPT-5 लाँच झाल्यामुळे इतर पेड यूझर्सना देण्यात आलेल्या ChatGPT व्यक्तिमत्त्वांचा त्यात समावेश नसेल.
भारत OpenAI साठी दुसऱ्या क्रमांकाची सर्वात मोठी बाजारपेठ आहे. येथे कोट्यवधी इंटरनेट यूझर आहेत, ज्यांपैकी मोठ्या संख्येने किंमत संवेदनशील आहेत. अशा परिस्थितीत, OpenAI चा असा विश्वास आहे की ChatGPT Go भारतातील अधिकाधिक लोकांपर्यंत पोहोचण्याचा मार्ग सुलभ करेल. हे पाऊल कंपनीच्या बाजार धोरणाचा एक भाग आहे जेणेकरून अधिकाधिक लोकांना प्रगत AI टूल्सचा अनुभव घेता येईल.
view commentsLocation :
Mumbai,Maharashtra
First Published :
August 19, 2025 3:02 PM IST


