Bluetooth आणि Wifi नेहमी ऑन ठेवता? 'हे' 5 धोके वाचल्यानंतर एका सेकंदाचाही वेळ न घालवता कराल बंद
- Published by:Devika Shinde
Last Updated:
आपल्यापैकी असे अनेक लोक आहेत जे आपल्या फोनमधील ब्लूटूथ आणि वाय-फाय सतत ऑन ठेवतात. लोक आपल्या सोयीसाठी हे फीचर्स ऑन ठेवतात.
मुंबई : आजच्या डिजिटल युगात स्मार्टफोनशिवाय जगणं कठीण आहे. कॉल, इंटरनेट, सोशल मीडिया, ऑनलाइन पेमेंट्स सगळं काही या छोट्याशा डिव्हाइसवर चालतं. पण याच्याशी संबंधीत कधीकधी आपण अशा काही गोष्टी करतो जे त्याच्या सुरक्षेसाठी धोकादायक ठरतात. फोनचा सुरक्षेचा धोका म्हणजे अर्थात तुमच्या सुरक्षेला धोका आहे.
आपल्यापैकी असे अनेक लोक आहेत जे आपल्या फोनमधील ब्लूटूथ आणि वाय-फाय सतत ऑन ठेवतात. लोक आपल्या सोयीसाठी हे फीचर्स ऑन ठेवतात, जेणेकरून नेटवर्क किंवा डिव्हाइस आपोआप कनेक्ट होईल आणि आपल्याला ऑन करण्यासाठी जास्तीची मेहनत घ्यावी लागणार नाही पण हे करताना तुम्ही नकळत मोठ्या धोक्याला आमंत्रण देत असता.
1. सुरक्षा आणि प्रायव्हसीला धोका
ब्लूटूथ किंवा वाय-फाय सतत सुरू असेल, तर हॅकर्सना तुमच्या फोनमध्ये घुसखोरी करणे सोपे जाते. पब्लिक नेटवर्क किंवा अनोळखी डिव्हाइसशी जोडून ते तुमचं डेटा, फाइल्स, बँकिंग ऍप्सची माहिती चोरू शकतात. काही वेळा कॅमेरा आणि माईकसुद्धा हॅक होतो.
advertisement
2. वैयक्तिक डेटा चोरी
सतत ऑन असलेलं ब्लूटूथ-वाईफाय तुमची लोकेशन आणि नेटवर्क डिटेल्स अॅप्स आणि वेबसाइट्सना देत राहतं. पब्लिक वाय-फाय तर अधिक धोकादायक असतं. इथं तुमचे पासवर्ड, बँक डिटेल्स सहज हॅक होऊ शकतात.
3. बॅटरीचा जास्त वापर
ही फीचर्स सतत ऑन असतील तर फोन सतत नवीन डिव्हाइस शोधत राहतो, ज्यामुळे बॅटरी लवकर संपते.
advertisement
4. लोकेशन ट्रॅक होण्याचा धोका
काही ऍप्स आणि थर्डपार्टी कंपन्या तुमची हालचाल ट्रॅक करून जाहिराती दाखवतात. चुकीच्या हातात ही माहिती गेली तर तुमचं खासगी जीवन धोक्यात येऊ शकतं.
5. अनोळखी नेटवर्कशी कनेक्टिव्हिटी
सार्वजनिक ठिकाणी काही हॅकर्स खोटे हॉटस्पॉट तयार करतात, ज्यामुळे तुमचा फोन आपोआप कनेक्ट होतो आणि डेटा चोरी होतो.
फोनची प्रायव्हसी, डेटा आणि बॅटरी वाचवण्यासाठी ब्लूटूथ आणि वाय-फाय फक्त गरजेच्या वेळीच ऑन ठेवा.
Location :
Mumbai,Maharashtra
First Published :
September 03, 2025 10:33 PM IST
मराठी बातम्या/टेक्नोलॉजी/
Bluetooth आणि Wifi नेहमी ऑन ठेवता? 'हे' 5 धोके वाचल्यानंतर एका सेकंदाचाही वेळ न घालवता कराल बंद