WhatsApp वर लग्नाचं कार्ड आलंय? चुकूनही उघडू नका, बँक अकाउंट होईल रिकामं

Last Updated:

Whatsapp Cyber Fraud: आजकाल लग्नाचा सीझन आहे आणि व्हॉट्सअॅपवर इनव्हिटेशन कार्ड न मिळणे दुर्मिळ आहे. या डिजिटल युगात लोक ई-कार्डद्वारे सहजपणे आमंत्रणे पाठवतात.

व्हॉट्सअॅप वेडिंग इनव्हिटेशन कार्ड
व्हॉट्सअॅप वेडिंग इनव्हिटेशन कार्ड
Whatsapp Cyber Fraud: आजकाल लग्नाचा सीझन सुरु आहे आणि आता लोक प्रत्यक्षात येऊन पत्रिका देण्याऐवजी टेक्नॉलॉजीचा वापर करत आहे. लोक आता व्हॉट्सअ‍ॅपवर निमंत्रण पत्रिका पाठवत आहेत. परंतु फसवणूक करणारे लोक या सोयीचा गैरफायदा घेत आहेत. सायबर फसवणुकीची एक नवीन पद्धत म्हणजे वेडिंग इनव्हिटेशन स्कॅम, ज्यामध्ये तुमच्या फोन आणि बँक अकाउंटवर हल्ला करण्यासाठी बनावट लग्नाचे कार्ड पाठवले जाते. तुम्ही थोडेसेही निष्काळजी असाल तर तुमचे बँक बॅलन्स काही मिनिटांत गायब होऊ शकते.
हा नवीन WhatsApp Wedding Scam कसा काम करतो?
फसवणूक करणारे तुम्हाला अज्ञात नंबरवरून एक आकर्षक लग्नाचे डिजिटल कार्ड पाठवतात. ज्यामध्ये अनेकदा लिंक किंवा PDF फाइल असते. मेसेजसोबत "कृपया आमच्या लग्नाला या," "कृपया कार्ड उघडा," किंवा "family invitation" असे भावनिक वाक्ये असतात जेणेकरून लोक विचार न करता क्लिक करतात.
advertisement
तुम्ही ती लिंक उघडताच, तुमच्या फोनवर मालवेअर इन्स्टॉल होऊ शकते. हे हानिकारक सॉफ्टवेअर तुमच्या फोनची माहिती, ओटीपी, बँकिंग अ‍ॅप डेटा आणि पासवर्ड चोरते. बऱ्याच प्रकरणांमध्ये, ते तुमच्या फोनवर पूर्णपणे नियंत्रण देखील ठेवू शकते.
या फसवणुकीचा धोका का वाढत आहे?
advertisement
लोक सहसा लग्नाच्या कार्डवर क्लिक करतात कारण तो एक सामाजिक आणि भावनिक विषय आहे. शिवाय, फसवणूक करणारे कार्ड इतके वास्तववादी पद्धतीने डिझाइन करतात की एखादा सामान्य यूझर देखील ते खरे समजू शकतो. म्हणूनच हा वेडिंग कार्ड स्कॅम वेगाने पसरत आहे आणि हजारो लोक आधीच त्याचे बळी पडले आहेत.
या धोकादायक Scamपासून कसे वाचायचे?
advertisement
दक्षता महत्त्वाची आहे. कोणत्याही अज्ञात नंबरवरून येणारी कोणतीही PDF, लिंक किंवा वेबसाइट व्हेरिफाय केल्याशिवाय कधीही उघडू नका. मेसेज तुमच्या ओळखीच्या एखाद्या व्यक्तीकडून येत असला तरी, प्रथम कॉल करा आणि त्याची पुष्टी करा. तुमच्या फोनवर अँटीव्हायरस प्रोग्राम ठेवा आणि कधीही बँक ओटीपी, पासवर्ड किंवा इतर पर्सनल माहिती कोणाशीही शेअर करू नका.
advertisement
तुम्ही चुकून एखाद्या लिंकवर क्लिक केले असेल, तर तुमची ऑनलाइन बँकिंग ताबडतोब बदला. सर्व पासवर्ड अपडेट करा आणि तुमच्या फोनची सुरक्षा तपासा. आवश्यक असल्यास, 1930 वर सायबर हेल्पलाइनवर तक्रार करा.
view comments
मराठी बातम्या/टेक्नोलॉजी/
WhatsApp वर लग्नाचं कार्ड आलंय? चुकूनही उघडू नका, बँक अकाउंट होईल रिकामं
Next Article
advertisement
Bus fire: परत तीच अंधारी रात्र; ट्रॅव्हल्सच्या बसने घेतला पेट, 20 प्रवाशांचा होरपळून मृत्यू, काळजाचा थरकाप उडवणारा VIDEO
परत तीच अंधारी रात्र ट्रॅव्हल्सच्या बसने घेतला पेट, 20 प्रवाशांचा होरपळून मृत्यू
    View All
    advertisement