advertisement

इंटरनेट कनेक्शनशिवाय YouTube व्हिडिओज पाहता? SD मध्ये असे करा डाउनलोड

Last Updated:

आता फोनच्या SD कार्डवरही यूट्यूब व्हिडिओ डाउनलोड करता येणार आहेत. यामुळे फोनचे इंटरनल स्टोरेज भरले जाणार नाही आणि इंटरनेट कनेक्शन नसतानाही तुम्ही व्हिडिओ पाहू शकाल.

प्रतिकात्मक फोटो
प्रतिकात्मक फोटो
मुंबई : YouTube आता फक्त मनोरंजनासाठी वापरले जात नाही. विद्यार्थी त्यांच्या अभ्यासासाठी, खेळाडू त्यांच्या प्रशिक्षणासाठी आणि कलाकार त्यांच्या कला दाखवण्यासाठी या व्यासपीठाचा वापर करत आहेत. काही काळापूर्वी यूट्यूब SD कार्डवर व्हिडिओ डाउनलोड करण्याची परवानगी देत ​​नव्हते, परंतु आता तसे नाही. आता YouTube व्हिडिओ मोबाइलच्या SD कार्डवर डाउनलोड केले जाऊ शकतात, जे तुम्ही इंटरनेट कनेक्शनशिवाय देखील पाहू शकता. हे फीचर निवडक देशांमध्ये YouTube Premium सब्सक्रायबरसाठी उपलब्ध आहे.
SD कार्डवर व्हिडिओ कसा डाउनलोड करायचा?
YouTube वरून व्हिडिओ डाउनलोड करण्यासाठी, तुम्हाला व्हिडिओ पाहण्याच्या पेजवरील डाउनलोड बटण दाबावे लागेल. हे फीचर वापरण्यासाठी फोनमध्ये SD कार्ड असणे आवश्यक आहे. YouTube व्हिडिओ डाउनलोडसाठी SD कार्ड डिफॉल्ट स्टोरेज लोकेशन बनवण्यासाठी, काही सोप्या स्टेप्स फॉलो करणे आवश्यक आहे. यासाठी, सर्वप्रथम, यूट्यूबवरील तुमच्या प्रोफाइल पिक्चरवर टॅप करून सेटिंग्जमध्ये जा आणि नंतर Background and Downloads वर क्लिक करा. येथून यूज SD कार्ड ऑप्शन इनेबल करा.
advertisement
असे न केल्यास इंटरनल स्टोरेजवर स्टोअर होईल व्हिडिओ
SD कार्ड ऑप्शन इनेबल नसेल तर व्हिडिओ फोनच्या इंटरनल स्टोरेजमध्ये स्टोर केला जाईल. YouTube इंटरनल स्टोरेजमधून SD कार्डवर व्हिडिओ ट्रान्सफर करण्याची परवानगी देत ​​नाही. परंतु हे करण्याचा एक मार्ग आहे. यासाठी सर्वात आधी तुम्हाला इंटरनल स्टोरेजमधील डाउनलोड केलेला व्हिडिओ डिलीट करावा लागेल. यानंतर, सेटिंग्जमध्ये जा आणि व्हिडिओ स्टोरेज लोकेशन चेंज करा आणि व्हिडिओ पुन्हा डाउनलोड करा. आता हा व्हिडिओ फोनच्या इंटरनल स्टोरेजऐवजी SD कार्डवर स्टोअर केला जाईल. डाउनलोड करताना, लक्षात ठेवा की, व्हिडिओ डाउनलोड करण्यासाठी SD कार्डमध्ये पुरेसे स्टोरेज असावे. असे न झाल्यास व्हिडिओ डाउनलोड करता येणार नाही.
view comments
मराठी बातम्या/टेक्नोलॉजी/
इंटरनेट कनेक्शनशिवाय YouTube व्हिडिओज पाहता? SD मध्ये असे करा डाउनलोड
Next Article
17 जागा अख्ख्या राज्याचं गणित फिरवणार, बंगालच्या सत्तेची चावी देणारा गेमचेंज फॅक्टर; हे मतदार ठरवणार नवा मुख्यमंत्री
17 जागा अख्ख्या राज्याचं गणित फिरवणार, बंगालच्या सत्तेची चावी देणारा गेमचेंज फॅक्टर; हे मतदार ठरवणार नवा मुख्यमंत्री
  • एकच फॅक्टर! 277 जागांवर भारी

  • भूकंपाची केंद्रबिंदू ठरणाऱ्या 17 जागा

  • बंगालच्या राजकारणात खळबळ

View All
advertisement