Apple चाहत्यांसाठी गुडन्यूज! पुढच्या महिन्या लाँच होणार स्वस्त iPhone 17e? लीकमधून मोठा खुलासा
- Published by:Devika Shinde
Last Updated:
iPhone 17e launch date leak : जर तुम्हीही नवीन आयफोन घेण्याच्या विचारात असाल आणि बजेटची चिंता असेल, तर ही बातमी तुमच्यासाठी अत्यंत महत्त्वाची आहे.
मुंबई : स्मार्टफोनच्या जगात जेव्हा 'अॅपल' (Apple) या नावाचा उल्लेख होतो, तेव्हा लोक समजून जातात की किंमत लाखांच्या आसपास असणार, त्यात प्रो वर्जनचं काही घ्यायचं असेल तर मात्र ही किंमत लाखांच्या पार देखील जाते. त्यामुळे आता मध्यमवर्गीय भारतीयासाठी आयफोन घेणं हे एक स्वप्न असतं, पण अॅपलने 'SE' सिरीज आणि गेल्या वर्षीच्या '16e' मॉडेलद्वारे हे स्वप्न बजेटमध्ये आणण्याचा प्रयत्न केला आहे. आता पुन्हा एकदा टेक विश्वात एकाच नावाची चर्चा रंगली आहे, ती म्हणजे iPhone 17e.
जर तुम्हीही नवीन आयफोन घेण्याच्या विचारात असाल आणि बजेटची चिंता असेल, तर ही बातमी तुमच्यासाठी अत्यंत महत्त्वाची आहे.
अॅपलचे कधीही आपल्या स्मार्टफोन्सची लाँच डेट आधी जाहीर करत नाहीत. गेल्या वर्षी 19 फेब्रुवारी रोजी अॅपलने सर्वांना चकित करत iPhone 16e लाँच केला होता. आता तोच कित्ता अॅपल यावर्षीही गिरवण्याची शक्यता आहे. टेक वर्तुळातील चर्चांनुसार, 18 किंवा 19 फेब्रुवारी 2026 रोजी iPhone 17e मार्केटमध्ये एन्ट्री करू शकतो आणि फेब्रुवारीच्या अखेरीस याची विक्री सुरू होऊ शकते.
advertisement
काय सांगते लीक झालेली माहिती?
चिनी सोशल मीडिया प्लॅटफॉर्म 'Weibo' वरील प्रसिद्ध टिपस्टर 'Smart Pikachu' च्या मते, CES (Consumer Electronics Show) संपल्यानंतर अॅपलने iPhone 17e च्या उत्पादनावर (Production) लक्ष केंद्रित केले आहे. याचे काही संभाव्य फीचर्स खालीलप्रमाणे असू शकतात:
डिस्प्ले: 6.1 इंचाचा आयलंड डिस्प्ले (Dynamic Island), जो युजर्सना प्रीमियम अनुभव देईल.
advertisement
प्रोसेसर: यामध्ये अॅपलचा लेटेस्ट A19 चिपसेट मिळण्याची शक्यता आहे, ज्यामुळे फोनचा वेग आणि परफॉर्मन्स जबरदस्त असेल.
डिझाईन: हा फोन बजेट सेगमेंटमध्ये असला तरी याचे लूक आधुनिक ठेवण्यावर कंपनीचा भर असेल.
आयफोनप्रेमी जरी या लाँचची आतुरतेने वाट पाहत असले, तरी काही तज्ज्ञांनी सावधगिरीचा इशारा दिला आहे. अॅपल सहसा आपले बजेट फोन्स (उदा. SE सिरीज) दरवर्षी अपडेट करत नाही. या फोन्समध्ये सहसा 2 ते 3 वर्षांचे अंतर असते. iPhone 16e ला अपेक्षेप्रमाणे यश मिळाले नसल्याने, अॅपल खरोखरच यावर्षी 17e आणणार की मार्चमध्ये होणाऱ्या MWC 2026 (Mobile World Congress) पर्यंत वाट पाहणार, हे आता पाहायचं आहे.
advertisement
का खास ठरू शकतो iPhone 17e?
जर हा फोन लाँच झाला, तर तो अशा लोकांसाठी उत्तम पर्याय असेल ज्यांना लेटेस्ट प्रोसेसर आणि अॅपलची सुरक्षा हवी आहे, पण ज्यांचे बजेट फ्लॅगशिप मॉडेलइतके नाही.
सध्या तरी या सर्व अफवा आणि लीक झालेल्या माहितीवर आधारित बातम्या आहेत. जोपर्यंत अॅपल अधिकृत घोषणा करत नाही, तोपर्यंत आपल्याला वाट पाहावी लागेल. मात्र, फेब्रुवारी महिना आयफोन चाहत्यांसाठी नक्कीच महत्त्वाचा ठरणार आहे.
Location :
Mumbai,Maharashtra
First Published :
Jan 14, 2026 10:07 PM IST
मराठी बातम्या/टेक्नोलॉजी/
Apple चाहत्यांसाठी गुडन्यूज! पुढच्या महिन्या लाँच होणार स्वस्त iPhone 17e? लीकमधून मोठा खुलासा









