Jio च्या कोट्यवधी यूझर्ससाठी गुडन्यूज! 200 रुपयांनी स्वस्त झाला हा प्लॅन

Last Updated:

जिओने लाखो यूजर्सना आनंदी केले आहे. कंपनीने आपला एक महागडा प्लॅन पुन्हा लाँच केला आहे. नव्याने लॉन्च केलेल्या प्लॅनमध्ये यूझर्सना पूर्वीपेक्षा जास्त व्हॅलिडिटी ऑफर केली जात आहे.

जिओ रिचार्ज प्लॅन
जिओ रिचार्ज प्लॅन
मुंबई : Reliance Jio ने कमी होत चाललेल्या यूजरबेसच्या पार्श्वभूमीवर मोठा निर्णय घेतला आहे. देशातील सर्वात मोठ्या टेलिकॉम कंपनीच्या करोडो यूजर्सना याचा फायदा होणार आहे. जुलैमध्ये सर्व खासगी कंपन्यांनी आपले रिचार्ज प्लॅन महाग केले आहेत. तेव्हापासून Airtel, Jio आणि Vodafone Idea चे लाखो यूझर्स कमी झाले आहेत. जिओने आपला एक प्लॅन पुन्हा लाँच केला आहे, ज्यामध्ये यूझर्सना पूर्वीपेक्षा अधिक व्हॅलिडिटी मिळेल.
आधी महाग केला प्लॅन
Jio ने जुलैमध्ये 999 रुपयांचा प्लॅन 200 रुपयांनी महाग केला. मग हा प्लॅन 1,199 रुपयांना उपलब्ध होता. या प्लॅनमध्ये उपलब्ध असलेल्या फायद्यांबद्दल सांगायचे तर, यूझर्सना भारतातील कोणत्याही नेटवर्कवर फ्री कॉलिंगची सुविधा मिळेल. याव्यतिरिक्त, यूझर्सना विनामूल्य राष्ट्रीय रोमिंगचा लाभ देखील मिळतो. हा प्लॅन दररोज 3GB हाय स्पीड डेटा आणि 100 मोफत एसएमएससह येतो. अशा प्रकारे यूझर्सना एकूण 252GB डेटाचा लाभ दिला जातो. याशिवाय जिओच्या कॉम्प्लिमेंटरी ॲप्सचा ॲक्सेसही दिला जात होता.
advertisement
आता सुधारित
यापूर्वी हा प्लॅन 999 रुपयांना उपलब्ध होता.पण त्यात फक्त 84 दिवसांची व्हॅलिडिटीहोती. आता कंपनीने 999 रुपयांचा एक नवीन प्लॅन लॉन्च केला आहे, ज्यामध्ये यूजर्सना 14 दिवसांची अतिरिक्त व्हॅलिडिटी मिळेल. या नवीन सुधारित प्लॅनमध्ये, यूझर्सना आता 98 दिवसांची व्हॅलिडिटी मिळेल. या प्लॅनमध्ये उपलब्ध असलेल्या फायद्यांबद्दल बोलायचे झाल्यास, यूझर्सना भारतातील कोणत्याही नेटवर्कवर अनलिमिटेड मोफत कॉलिंग आणि राष्ट्रीय रोमिंगचा लाभ मिळेल. जिओ या प्लॅनमध्ये दररोज 2GB डेटा देत आहे. यामध्ये यूजर्सना एकूण 196GB डेटाचा फायदा मिळेल. तसेच, दररोज 100 मोफत एसएमएस दिले जातील. याशिवाय यूझर्सना जिओच्या कॉम्प्लिमेंटरी ॲप्सचा मोफत प्रवेश मिळेल.
advertisement
Jio व्यतिरिक्त, Airtel चा 979 रुपयांचा रिचार्ज प्लॅन देखील आहे. ज्यामध्ये यूझर्सना भारतभरातील कोणत्याही नेटवर्कवर अनलिमिटेड कॉलिंग, फ्री नॅशनल रोमिंग आणि दररोज 100 मोफत एसएमएसचा लाभ मिळतो. या प्लॅनमध्ये यूजर्सना दररोज 2GB हायस्पीड डेटाचा लाभ दिला जात आहे. तसंच, एअरटेलच्या प्लॅनमध्ये, यूझर्सना 84 दिवसांची व्हॅलिडिटी ऑफर केली जाते.
मराठी बातम्या/टेक्नोलॉजी/
Jio च्या कोट्यवधी यूझर्ससाठी गुडन्यूज! 200 रुपयांनी स्वस्त झाला हा प्लॅन
Next Article
advertisement
Blockbuster Movie: पत्नीने खर्च केले 300 कोटी, हिरो पतीचा 19 वर्षांनी लहान अभिनेत्रीसोबत रोमान्स; सिनेमा ठरला ब्लॉकबस्टर
पत्नीने खर्च केले 300 कोटी, हिरो पतीचा 19 वर्षांनी लहान अभिनेत्रीसोबत रोमान्स
    View All
    advertisement