New GST Rates : टीव्ही, फ्रीज, वॉशिंग मशीनसह AC झाले स्वस्त; पाहा किती पैसे वाचतील

Last Updated:

New GST Rates : सोनी, एलजी आणि पॅनासोनिक सारख्या प्रमुख टीव्ही कंपन्यांनी 22 सप्टेंबर 2025 पासून नवीन रेट लिस् जाहीर केली आहे.

न्यू जीएसटी रेट्स
न्यू जीएसटी रेट्स
नवी दिल्ली : वस्तू आणि सेवा कर (जीएसटी) कपातीनंतर, उद्या, 22 सप्टेंबरपासून टेलिव्हिजन, रेफ्रिजरेटर, वॉशिंग मशीन आणि एसी सारख्या ग्राहकोपयोगी इलेक्ट्रॉनिक्सच्या किमतीत लक्षणीय कपात होणार आहे. या प्रोडक्टवरील जीएसटी दर 28% वरून 18% पर्यंत कमी करण्यात आले आहेत. 32 इंचापेक्षा जास्त स्क्रीन आकाराच्या टीव्ही सेटवरील शुल्क सध्याच्या 28% वरून 18% पर्यंत कमी करण्यात आले आहे. यामुळे टीव्हीच्या किमती ₹2,500 ते ₹85,000 पर्यंत कमी होतील.
सोनी, एलजी आणि पॅनासोनिक सारख्या प्रमुख टीव्ही कंपन्यांनी 22 सप्टेंबर 2025 पासून नवीन दर रेट लिस्‍ट केली आहे. सोनी इंडियाने 43-इंच ते 98-इंच स्क्रीन आकाराच्या ब्राव्हिया टीव्ही मॉडेल्सवर ₹5,000 ते ₹71,000 पर्यंत एमआरपी कपात जाहीर केली आहे. 43 इंचाच्या ब्राव्हिया 2 ची किंमत 59,900 वरून 54,900 करण्यात आली आहे, 55 इंचाच्या ब्राव्हिया 7 ची किंमत 2.30 लाखांवरून 2.50 लाख करण्यात आली आहे आणि 98 इंचाच्या स्क्रीन आकारासह त्याचे टॉप-एंड ब्राव्हिया 5 मॉडेल सोमवारपासून 8.29 लाख रुपयांना उपलब्ध होईल, जे सध्याचे 9 लाख रुपये आहे.
advertisement
एलजीनेही किमती कमी केल्या आहेत
एलजी इलेक्ट्रॉनिक्स इंडियाने त्यांच्या 43 इंचाच्या ते 100 इंचाच्या स्क्रीन आकाराच्या टीव्ही सेटवर 2,500 ते 85,800 रुपयांपर्यंतच्या किमती कमी करण्याची घोषणा केली आहे. 43 इंचाच्या मॉडेलची किंमत 30,990 वरून 28,490 रुपयांपर्यंत कमी केली आहे. कंपनीने 55 इंचाच्या आणि 65 इंचाच्या स्क्रीन आकाराच्या दोन लोकप्रिय मॉडेल्सच्या किमती 3,400 रुपयांनी कमी केल्या आहेत. एलजीच्या 100 इंचाच्या टीव्हीची किंमत 5,85,590 वरून 4,99,790 करण्यात आली आहे. पॅनासोनिकनेही त्यांची एमआरपी 3,000 ची कमी करून 32,000 केली आहे.
advertisement
अॅक्सेसरीज आणि रेफ्रिजरेटरच्या किमतीही कमी होतील
जीएसटी कपातीनंतर कंपन्यांनी एअर कंडिशनरच्या किमती 4,500 ची आणि डिशवॉशरच्या किमती 8,000 ची कमी केल्या आहेत. महागाईमुळे बरेच लोक त्यांच्या घरात एसी बसवण्याचे टाळत होते. आता, 10% कर कपातीमुळे, लोक ते बसवू शकतील. 30,000 किमतीचा सॅमसंग एसी 3,000 च्या डिस्काउंटमध्ये उपलब्ध असेल. 40,000 किमतीच्या एसीला अंदाजे 4,000 चे डिस्काउंट मिळेल. 22 सप्टेंबरपासून मॉडेल आणि ब्रँडनुसार वॉशिंग मशीनच्या किमतीही 1,000 ते 5,000ची कमी होतील.
मराठी बातम्या/टेक्नोलॉजी/
New GST Rates : टीव्ही, फ्रीज, वॉशिंग मशीनसह AC झाले स्वस्त; पाहा किती पैसे वाचतील
Next Article
advertisement
OTT Trending: ना अ‍ॅक्शन, ना कोणी व्हिलन, 2 तास 40 मिनिटांच्या फिल्मने जिंकली मने, ओटीटीवर वर 4 कपलची कहाणी हिट
ना अ‍ॅक्शन, ना कोणी व्हिलन,2 तास 40 मिनिटांच्या फिल्मने जिंकली मने,OTT ट्रेंडिंग
    View All
    advertisement