तुम्ही फोनवर कोणाशी किती वेळ बोललात, 'या' ॲपवर सापडेल तुमची ‘कॉल हिस्ट्री’

Last Updated:

तुम्ही एका महिन्यात कोणाशी किती वेळ बोललात हे सगळं तुम्हाला फोनवरच कळू शकतं.

News18
News18
काही लोकांना त्यांचा फोन इतरांनी पाहिलेलं आवडत नाही. फोन कुणीही बघू नये, यासाठी बहुतांश लोक पासवर्डही वापरतात. काही जण तर फोनवर कुणाशी बोलले याची कॉल हिस्ट्री डिलीट करतात. मात्र, जिओचे सिम कार्ड वापरणाऱ्यांना त्यांची एका महिन्याची कॉल हिस्ट्री पाहता येऊ शकते. कोणत्याही कारणाने तुम्हाला जर तुमची कॉल हिस्ट्री काढायची असेल तर ते खूप सोपं आहे.
तुम्ही एका महिन्यात कोणाशी किती वेळ बोललात हे सगळं तुम्हाला फोनवरच कळू शकतं. रिलायन्स जिओने युजर्सना माय जिओ ॲपमध्ये हे फीचर दिलं आहे. हे फीचर तुमच्यासाठी उपयुक्त ठरू शकतं. पण तुमचा फोन दुसऱ्याच्या हातात गेल्यास त्यांनाही तुमची कॉल हिस्ट्री पाहता येऊ शकते. तुम्ही तुमच्या फोनची कॉल हिस्ट्री लपवत असाल आणि अशा परिस्थितीत फोन जर तुमच्या पत्नीच्या हातात गेला आणि तिने इथे तुमची एका महिन्याची कॉल हिस्ट्री पाहिल्यास तुम्ही अडचणीत येऊ शकता. तुम्ही एका महिन्यात कोणत्या नंबरवर सर्वाधिक बोलला आहात, तेही इथे पाहायला मिळेल.
advertisement
ज्याचा फोन आहे, त्याच्यासाठी हे फीचर फायद्याचं असू शकतं, पण अनोळखी व्यक्ती किंवा तुम्ही ज्यांच्यापासून काहीतरी लपवताय त्यांच्या हातात तुमचा फोन गेल्यास तुम्ही अडचणीत याल. तुम्ही जिओचं सिमकार्ड वापरत असाल तर जिओ प्रिपेड नंबरची कॉल हिस्ट्री माय जिओ ॲपवर कशी पाहायची ते जाणून घेऊयात.

माय जिओ ॲपवर दिसेल कॉल हिस्ट्री

advertisement
फोनमध्ये माय जिओ ॲप ओपन करा.ॲपमध्येवर उजव्या बाजूला तुमच्या प्रोफाईल आयकॉनवर क्लिक करा. यानंतर तुम्हाला मोबाईल सेक्शन दिसेल. व्हु मोअरवर टॅप करा, तिथे तुम्हाला स्टेटमेंट लिहिलेलं दिसेल. स्टेटमेंटवर क्लिक केल्यानंतर तुम्हाला किती दिवसाची कॉल हिस्ट्री काढायची आहे, ते टाईप करावं लागेल. तुम्ही सात दिवस, 15 दिवस, 30 दिवसाची कॉल हिस्ट्री काढू शकता. तारखा निवडल्यावर तुम्हाला कॉल हिस्ट्री कोणत्या स्वरुपात पाहिजे ते निवडण्याचे ऑप्शन मिळते. ई मेल स्टेटमेंट, स्टेटमेंट डाउनलोड व व्ह्यु स्टेटमेंट हे तीन पर्याय तिथे दिसतात. तुम्ही तुम्ही ही कॉल हिस्ट्री ई मेलवर मिळवू शकता किंवा स्टेटमेंट डाउनलोड करू शकता किंवा तिथेच पाहू शकतात. तुम्ही जे ऑप्शन निवडाल, त्यानुसार प्रक्रिया पूर्ण होईल.
मराठी बातम्या/टेक्नोलॉजी/
तुम्ही फोनवर कोणाशी किती वेळ बोललात, 'या' ॲपवर सापडेल तुमची ‘कॉल हिस्ट्री’
Next Article
advertisement
Blockbuster Movie: पत्नीने खर्च केले 300 कोटी, हिरो पतीचा 19 वर्षांनी लहान अभिनेत्रीसोबत रोमान्स; सिनेमा ठरला ब्लॉकबस्टर
पत्नीने खर्च केले 300 कोटी, हिरो पतीचा 19 वर्षांनी लहान अभिनेत्रीसोबत रोमान्स
    View All
    advertisement