फक्त साडेतीन हजार खर्च करा, चोर आल्यास गावभर होईल बोंब, राक्षे बंधूंचं यंत्र पाहिलं का?
- Published by:News18 Marathi
- Reported by:Prachi Balu Kedari
Last Updated:
पुण्यातील आयुष आणि जयदीप या 21 वर्षीय राक्षे बंधूंनी अनोखं यंत्र तयार केलंय. यामुळे चोर दारात येताच गावभर बोंब होणार आहे.
प्राची केदारी, प्रतिनिधी
पुणे : सध्याच्या काळात सुरक्षेच्या दृष्टीने अनेकजण काळजी घेत असतात. सीसीटीव्ही सारखी सुरक्षेची उपकरणेही घरात बसवली जातात. आता पुण्यातील आयुष आणि जयदीप या 21 वर्षीय राक्षे बंधूंनी अनोखं यंत्र तयार केलंय. यामुळे चोर दारात येताच गावभर बोंब होणार आहे. त्यांनी तयार केलेली सिक्युरिटी अलार्म सिस्टीम अगदी परवडणाऱ्या दरात मिळतेय. ही सिस्टीम कशी काम करते याबाबतच माहिती जाणून घेऊ.
advertisement
आयुष आणि जयदीप हे राक्षे बंधू पुण्यातील आंबेगाव मंचर भागातील आहेत. 21 वर्षे वयाच्या राक्षे बंधूंचा केबल टीव्ही, ऑनलाईन सर्व्हिसचा व्यवसाय आहे. या माध्यमातून ते सीसीटीव्ही, केबल, सिक्युरिटी सिस्टीम यांची कामं करतात. हे काम करत असतानाच त्यांना सिक्युरिटी अलार्म सिस्टीम तयार करण्याची कल्पना सुचली. 15 दिवसांच्या प्रयत्नानंतर हे खास सिक्युरिटी अलार्म सिस्टीम तयार झाल्याचं राक्षे बंधू सांगतात.
advertisement
चोरापासून सावध करणारं उकरण
सध्या चोरीचं प्रमाण वाढत आहे. यामुळे अनेक वेळा भीतीदायक वातावरण तयार होतं. त्यामुळे चोरा पासून बचाव करण्यासाठी एक उपकरण तयार केल आहे. जे अगदी सर्वांसाठी आहे. एखादा चोर जर तुमच्या दारावर आला असेल आणि त्याने पाऊल ठेवलं की आवाजामुळे तुम्ही सावध होता. या उपकरणाचा आवाज इतका आहे की 1 किलोमीटरच्या अंतरापर्यंत जातो.
advertisement
किती आहे किंमत?
हे उपकरण तयार करण्यासाठी कमीत कमी 15 दिवस इतका कालावधी लागला. याची किंमत साडेतीन हजार रुपये आहे. अगदी परवडणाऱ्या दरात हे उपकरण मिळत असल्याने महाराष्ट्रातून चांगला प्रतिसाद मिळतोय. अनेकजण ते आपल्या घराला बसवत असल्याचंही राक्षे बंधूंनी साांगितलं. .
Location :
Pune,Maharashtra
First Published :
August 11, 2024 4:34 PM IST
मराठी बातम्या/टेक्नोलॉजी/
फक्त साडेतीन हजार खर्च करा, चोर आल्यास गावभर होईल बोंब, राक्षे बंधूंचं यंत्र पाहिलं का?