Reliance Jio च्या या प्लॅनसोबत फ्री मिळतं Netflix सब्सक्रिप्शन, अवश्य घ्या जाणून

Last Updated:

प्रायव्हेट टेलिकॉम कंपनी रिलायन्स जिओचे अनेक रिचार्ज प्लॅन उपलब्ध आहेत. पण आज आम्ही तुम्हाला कंपनीच्या अशा प्लानबद्दल सांगणार आहोत ज्यामध्ये यूजर्सना Netflixचे फ्री सब्सक्रिप्शन मिळते.

Reliance Jio Rs Plan
Reliance Jio Rs Plan
Reliance Jio Recharge Plans: खाजगी टेलिकॉम कंपनी रिलायन्स जिओचे अनेक रिचार्ज प्लॅन आहेत. पण आज आम्ही तुम्हाला कंपनीच्या अशा प्लॅनविषयी सांगणार आहोत ज्यामध्ये यूजर्सना नेटफ्लिक्सचे फ्री सब्सक्रिप्शन मिळते.
1799 प्रीपेड प्लॅन
या प्लॅनसह तुम्हाला नेटफ्लिक्सचे बेसिक सबस्क्रिप्शन 84 दिवसांसाठी फ्री मिळते. Netflix बेसिक सबस्क्रिप्शनची किंमत 199 रुपये प्रति महिना आहे, परंतु ही ऑफर या प्लॅनमध्ये समाविष्ट आहे.
प्लॅन फायदे:
-84 दिवसांची व्हॅलिडिटी
-दररोज 3GB डेटा
-अनलिमिटेड 5G अॅक्सेस
advertisement
-अनलिमिटेड व्हॉइस कॉलिंग
-डेली 100 एसएमए
-Jio Cinema, Jio TV आणि Jio Cloud चा अॅक्सेस
1299 प्रीपेड प्लॅन
हा प्लॅन कमी बजेट असलेल्यांसाठी आहे. यामध्ये, Netflix चे मोबाईल सबस्क्रिप्शन मोफत उपलब्ध आहे, ज्याची किंमत प्रति महिना 149 रुपये आहे.
advertisement
प्लॅनचे फीचर्स
- 84 दिवसांची व्हॅलिडिटी
- दररोज 2GB डेटा
- अनलिमिटेड व्हॉइस कॉलिंग
- रोज 100 एसएमएस
- नेटफ्लिक्स मोबाईल सबस्क्रिप्शन
749 रुपयांचा पोस्टपेड प्लॅन
749 रुपयांचा हा प्लॅन पोस्टपेड यूझर्ससाठी खूपच आकर्षक आहे. यामध्ये तुम्हाला नेटफ्लिक्स बेसिक आणि ॲमेझॉन प्राइम सबस्क्रिप्शन दोन्ही मोफत मिळतात.
जिओचे प्लॅन खास का आहेत?
या प्लॅनमध्ये केवळ डेटा आणि कॉलिंगच नाही तर मनोरंजनासाठी नेटफ्लिक्स आणि ॲमेझॉन प्राइम सारख्या सेवाही फ्री उपलब्ध आहेत. यासोबतच Jio Cinema आणि Jio TV वर अॅक्सेस देखील उपलब्ध आहे. जे हे पॅकेज आणखी आकर्षक बनवते. अशा परिस्थितीत जिओच्या या प्लॅनमध्ये यूजर्सना नेटफ्लिक्सचे फ्री सब्सक्रिप्शन मिळते. याद्वारे लोक मनोरंजनाचा पुरेपूर लाभ घेऊ शकतात. त्याच वेळी, Airtel आणि Vi च्या अनेक प्लॅनमध्ये यूजर्सला Netflix चे सबस्क्रिप्शन देखील मिळते.
मराठी बातम्या/टेक्नोलॉजी/
Reliance Jio च्या या प्लॅनसोबत फ्री मिळतं Netflix सब्सक्रिप्शन, अवश्य घ्या जाणून
Next Article
advertisement
OTT Series: ओटीटीवरची 8 एपिसोडची हॉरर-थ्रिलर सीरीज, पाहून अंगावर येईल काटा
ओटीटीवरची 8 एपिसोडची हॉरर-थ्रिलर सीरीज, पाहून अंगावर येईल काटा
    View All
    advertisement