Recover Deleted Call History : बॉयफ्रेंड दिवसभर कोणाशी फोनवर बोलला? त्याने डिलिट केलं तरीही 'या' ट्रीकने शोधता येणार
- Published by:Devika Shinde
Last Updated:
एक अशी ट्रिक आहे, ज्यामुळे तुम्ही डिलिट केलेली कॉल हिस्ट्रीसुद्धा सहजपणे पाहू शकता आणि तेही कोणतंही थर्ड पार्टी अॅप न वापरता.
मुंबई : आजच्या डिजिटल युगात नातेसंबंध फक्त भावना नाही, तर टेक्नॉलॉजीवरही बरेच काही अवलंबून असतात. अनेकदा अशी परिस्थिती येते, की आपल्या पार्टनरने दिवसभर कोणाशी बोललं, किती वेळ बोललं, हे जाणून घ्यायचं असतं. पण काही हुशार बॉयफ्रेंड्स कॉल हिस्ट्री लगेच डिलिट करतात. अशावेळी एक अशी ट्रिक आहे, ज्यामुळे तुम्ही डिलिट केलेली कॉल हिस्ट्रीसुद्धा सहजपणे पाहू शकता आणि तेही कोणतंही थर्ड पार्टी अॅप न वापरता.
कॉल हिस्ट्री मिळवण्याची 'स्मार्ट' ट्रिक
तुमच्या बॉयफ्रेंडने फोनमधून कॉल हिस्ट्री डिलिट केली असली, तरी ती पूर्णपणे गायब होत नाही. कारण तुम्ही वापरत असलेला सिमकार्ड प्रोवायडर जसे की Jio, Airtel किंवा Vi त्यांच्या अॅप्समध्ये ही माहिती सुरक्षित राहाते.
Jio वापरत असाल, तर हे करा:
तुमच्या स्मार्टफोनमध्ये MyJio अॅप उघडा.
लॉगिन नसेल, तर बॉयफ्रेंडचा फोन नंबर टाका आणि OTPद्वारे लॉगिन करा.
advertisement
लॉगिन केल्यानंतर वर उजव्या कोपऱ्यातील प्रोफाइल आयकॉनवर क्लिक करा.
तिथे ‘Usage’ किंवा ‘Call Details’ पर्याय दिसेल, त्यावर टॅप करा.
इथे तुम्हाला मागील काही दिवसांची कॉल हिस्ट्री वेळेसह आणि नंबरसह मिळेल.
कॉल हिस्ट्री कधीच पूर्ण डिलिट होत नाही
कितीही डिलिट केलं, तरी सिमकार्ड कंपन्यांचे अॅप्स (MyJio, Airtel Thanks, Vi App) कॉल डिटेल्स सर्व्हरवर सेव्ह करत असतात. त्यामुळे जरी बॉयफ्रेंडने कॉल हिस्ट्री डिलिट केली असली, तरी त्या सर्व नोंदी या अॅप्समधून मिळू शकतात कारण त्या कधीच डिलिट करचा येत नाहीत.
advertisement
हा पर्याय कुठे उपयोगी पडतो?
जर तुमचं नातं संशयाच्या फेऱ्यात असलं
बॉयफ्रेंड कुणाशी सतत बोलतो, हे जाणून घ्यायचं असेल
किंवा फक्त कोणाशी बोललं याची खात्री करून घ्यायची असेल, तर ही ट्रिक एकदम उपयुक्त ठरते. पण या माहितीचा वापर जबाबदारीने करावा आणि कुणाची प्रायव्हसी पूर्णपणे भंग होणार नाही याचीही काळजी घ्या.
view commentsLocation :
Mumbai,Maharashtra
First Published :
July 21, 2025 10:27 PM IST
मराठी बातम्या/टेक्नोलॉजी/
Recover Deleted Call History : बॉयफ्रेंड दिवसभर कोणाशी फोनवर बोलला? त्याने डिलिट केलं तरीही 'या' ट्रीकने शोधता येणार


