ऑनलाइन खरेदी करताय? Flipkart-Meesho वरून घेतलेली ही इलेक्ट्रॉनिक उपकरणं ठरू शकतात जीवघेणी
- Published by:Devika Shinde
Last Updated:
भारतीय मानक ब्युरो (BIS) कडून नुकतीच आंध्रप्रदेशातील कृष्णा जिल्ह्यातील Flipkart, E-Kart आणि Meesho च्या गोदामांवर छापेमारी करण्यात आली.
मुंबई : आजच्या डिजिटल युगात अनेक लोक Flipkart, Meesho यांसारख्या ऑनलाइन प्लॅटफॉर्म्सवरून सहज आणि स्वस्तात इलेक्ट्रॉनिक वस्तू खरेदी करत असतात. LED बल्ब, पंखा, चार्जर किंवा इतर उपयुक्त वस्तूंसाठी या प्लॅटफॉर्म्सवर बऱ्यापैकी सवलतीही असतात. पण अलीकडे समोर आलेल्या एका धक्कादायक माहितीमुळे सर्वसामान्य ग्राहकांमध्ये चिंता वाढली आहे.
भारतीय मानक ब्युरो (BIS) कडून नुकतीच आंध्रप्रदेशातील कृष्णा जिल्ह्यातील Flipkart, E-Kart आणि Meesho च्या गोदामांवर छापेमारी करण्यात आली. या कारवाईत अनेक बिनधास्तपणे विक्रीस ठेवलेले, पण BIS मंजुरी नसलेले इलेक्ट्रॉनिक प्रोडक्ट्स सापडले.
या गोदामांमध्ये छापेमारी दरम्यान LED बल्ब, टेबल फॅन, खेळणी, चार्जर यांसारख्या 25 पेक्षा अधिक श्रेणींमधील प्रोडक्ट्स BIS प्रमाणपत्र किंवा ISI मार्कशिवाय आढळले. याचा अर्थ, हे सगळे उत्पादन सरकारी सुरक्षा मानकांपासून दूर असून ग्राहकांच्या सुरक्षिततेला धोकादायक ठरू शकतात.
advertisement
BIS कायद्यानुसार, कोणतीही इलेक्ट्रॉनिक वस्तू प्रमाणनाशिवाय स्टोअर करणे वा विकणे हा कायद्याचा भंग मानला जातो. BIS कायदा 2016 अंतर्गत हे गंभीर गुन्हे मानले जातात.
काय आहे शिक्षा?
अशा उल्लंघनांवर BIS कायद्याच्या कलम 29(3) अंतर्गत 3 वर्षांपर्यंत कारावास, ₹10 लाख पर्यंत दंड किंवा संपूर्ण वस्तूच्या किमतीपेक्षा 10 पट दंड आकारला जाऊ शकतो.
advertisement
ही घटना केवळ एका कारवाईपुरती मर्यादित नाही, तर ती आपण ऑनलाइन खरेदी करताना किती अनभिज्ञ आहोत याचं चिंताजनक उदाहरण आहे.
कशी ओळखाल सुरक्षित प्रोडक्ट्स?
अशा परिस्थितीत, जेव्हा तुम्ही कोणतंही इलेक्ट्रॉनिक उपकरण ऑनलाइन खरेदी करत असाल, तेव्हा खालील गोष्टी तपासा:
उत्पादनावर BIS (भारतीय मानक ब्युरो) चा लोगो आहे का?
ISI किंवा CRS मार्क असलेलं प्रमाणित उत्पादन आहे का?
advertisement
विक्रेत्याची माहिती आणि रेटिंग तपासा.
जर या गोष्टींचा अभाव असेल, तर त्या वस्तूंची खरेदी आपल्या आरोग्यासाठी आणि मालमत्तेसाठी धोका ठरू शकते.
सावध रहा – स्मार्ट ग्राहक बना
स्वस्त ऑफर्स आणि आकर्षक डिल्समुळे आपण अनेकदा तपासणी न करता वस्तू खरेदी करतो. पण लक्षात ठेवा, शॉर्ट सर्किट, आग, वीजेचा झटका यांसारख्या गंभीर अपघातांचे मूळ बिनप्रमाणित इलेक्ट्रॉनिक वस्तूंमध्ये असू शकते.
advertisement
Flipkart, Meesho, किंवा इतर कोणत्याही प्लॅटफॉर्मवर खरेदी करताना "मूल्य"पेक्षा "सुरक्षितता" अधिक महत्त्वाची आहे."
view commentsLocation :
Mumbai,Maharashtra
First Published :
July 16, 2025 10:27 PM IST
मराठी बातम्या/टेक्नोलॉजी/
ऑनलाइन खरेदी करताय? Flipkart-Meesho वरून घेतलेली ही इलेक्ट्रॉनिक उपकरणं ठरू शकतात जीवघेणी


