WhatsApp-Instagram च्या स्टेटसवर दिसतायत ब्लर फोटो? ही सेटिंग बदलली की फोटो-व्हिडिओ दिसतील HD Quality
- Published by:Devika Shinde
Last Updated:
बऱ्याचदा जेव्हा आपण एखादा सुंदर फोटो किंवा व्हिडिओ WhatsApp स्टेटसवर किंवा Instagram स्टोरीवर टाकतो, तेव्हा तो HD क्वालिटीमध्ये दिसण्याऐवजी ब्लर होतो. अशावेळी अनेकजण आपल्या फोन किंवा इंटरनेट कनेक्शनला दोष देतात. पण खरं कारण काही वेगळंच असतं.
मुंबई : आजच्या डिजिटल युगात WhatsApp आणि Instagram आपल्या दैनंदिन आयुष्याचा एक अविभाज्य भाग झाले आहेत. ऑफिसमधील काम असो, घरातील अपडेट्स असो किंवा शाळा-कॉलेजमधील माहिती सर्व काही आज या अॅप्सवरूनच पोहोचतं. भारतातच नव्हे तर जगभरात WhatsApp हे सर्वाधिक वापरलं जाणारं अॅप आहे. युजर्सचा अनुभव अधिक चांगला व्हावा म्हणून हे अॅप सतत नवनवीन अपडेट्स आणि फीचर्स घेऊन येत असतं.
मात्र, बऱ्याचदा जेव्हा आपण एखादा सुंदर फोटो किंवा व्हिडिओ WhatsApp स्टेटसवर किंवा Instagram स्टोरीवर टाकतो, तेव्हा तो HD क्वालिटीमध्ये दिसण्याऐवजी ब्लर होतो. अशावेळी अनेकजण आपल्या फोन किंवा इंटरनेट कनेक्शनला दोष देतात. पण खरं कारण काही वेगळंच असतं.
या ऍप्समध्ये डिफॉल्टने लो क्वालिटी सेटिंग्स लागू असतात, ज्यामुळे कंटेंटची क्वालिटी कमी होते. जर तुम्हाला तुमच्या पोस्ट्स आणि स्टेटस HD क्वालिटीमध्ये अपलोड करायच्या असतील, तर खालील 3 सीक्रेट सेटिंग्स लगेच बदलून बघा.
advertisement
WhatsApp स्टेटसवर HD क्वालिटी कंटेंट कसं अपलोड कराल?
फक्त एक छोटीशी सेटिंग बदलून तुम्ही तुमचं स्टेटस अधिक चांगल्या क्वालिटीमध्ये टाकू शकता:
सर्वप्रथम WhatsApp उघडा आणि Settings मध्ये जा.
त्यानंतर Storage and Data या पर्यायावर क्लिक करा.
इथे तुम्हाला Upload Quality हा पर्याय दिसेल. तो HD वर सेट करा आणि सेव्ह करा.
advertisement
ही सेटिंग बदलल्यानंतर तुम्ही जोही फोटो किंवा व्हिडिओ स्टेटसवर अपलोड कराल, तो आधीपेक्षा जास्त स्पष्ट आणि आकर्षक दिसेल.
Instagram वर स्टोरी आणि पोस्ट प्रीमियम क्वालिटीमध्ये शेअर करण्यासाठी
Instagram वर अनेकदा फोटो किंवा व्हिडिओ थोडे धूसर दिसतात. पण खालील सेटिंग बदलल्यास हा प्रश्न संपेल:
तुमच्या प्रोफाइल पिक्चर वर क्लिक करा.
वरच्या बाजूला असलेल्या तीन रेघांच्या (☰) मेन्यू वर जा.
advertisement
त्यानंतर खाली स्क्रोल करून Media Quality हा पर्याय शोधा.
इथे Upload at highest quality हा पर्याय ON करा.
ही सेटिंग ऑन केल्यावर तुमच्या सर्व पोस्ट्स आणि स्टोरीज उत्तम रिझॉल्यूशनमध्ये अपलोड होतील.
सर्वोत्तम क्वालिटीसाठी कॅमेरा सेटिंग्सही बदलून घ्या
फक्त अॅपच्या सेटिंग्स बदलून उपयोग नाही; कॅमेराची सेटिंग्सही योग्य असणं महत्त्वाचं आहे.
व्हिडिओ शूट करताना क्वालिटी 4K 30fps किंवा 4K 60fps वर सेट करा.
advertisement
व्हिडिओ रेकॉर्डिंग करताना Stabilization ऑन ठेवा.
फोटो क्लिक करताना 16:9 ratio निवडा आणि जास्तीत जास्त Megapixels वापरा.
फ्रेमिंग योग्य ठेवण्यासाठी कॅमेरा सेटिंग्समधील Grid Lines ऑन करा.
या काही सोप्या सेटिंग्ज बदलून तुम्ही तुमच्या फोटो आणि व्हिडिओंची क्वालिटी मोठ्या प्रमाणात सुधारू शकता आणि सोशल मीडियावर त्यांचा आकर्षक लूक कायम ठेवू शकता.
view commentsLocation :
Mumbai,Maharashtra
First Published :
October 25, 2025 4:11 PM IST
मराठी बातम्या/टेक्नोलॉजी/
WhatsApp-Instagram च्या स्टेटसवर दिसतायत ब्लर फोटो? ही सेटिंग बदलली की फोटो-व्हिडिओ दिसतील HD Quality


