advertisement

Crime News : सूनसान रात्र अन् कुटुंबांचा आक्रोश! भिवंडीत एकामागोमाग एक घडलेल्या घटनांनी खळबळ; काय घडलं नेमकं?

Last Updated:

Bhiwandi Crime : भिवंडीत सूनसान रात्रीत एकामागोमाग दोन घरफोडीच्या घटनांनी खळबळ उडाली.या प्रकारामुळे नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले असून पोलिस तपास सुरू आहे.

भिवंडीत एकाच रात्री दोन ठिकाणी घरफोडी
भिवंडीत एकाच रात्री दोन ठिकाणी घरफोडी
भिवंडी : भिवंडी शहरात एकाच रात्री दोन भयंकर घडना घडलेल्या आहेत. ज्यामुळे परिसरात मोठी खळबळ उडाली असून नागरिकांमध्ये भितीचे वातावरण निर्माण झालेले आहे. या घडलेल्या प्रकरणी सध्या अज्ञात आरोपीविरोद्धात गुन्हा दाखल केला आहे.
घडलं काय?
मिळालेल्या माहितीनुसार, भिवंडी शहरात एकाच रात्री दोन घरफोडीच्या घटना घडलेल्या आहेत ज्यात चोरट्यांनी रोख रकमेसह अनेक मौल्यवान वस्तू चोरुन नेल्या आहेत.
पहिल्या घटना ही भिवंडीतील कळेशी परिसरातील आहे. या परिसरात आरती महेश प्रजापती या वास्तव्यास आहेत. त्या रात्री घराच्या उघड्या खिडकीतून एका अज्ञात चोरट्याने प्रवेश केला आणि घरातील मोबाईल, चांदीची चैन तसेच रोख रक्कम असा तब्बल 25 हजार 500 रुपयांचा मुद्देमाल चोरुन नेला आहे. आरती यांच्या सर्व घटना उघडकीस आल्यावर त्यांनी नारपोली पोलिस ठाण्यात अज्ञात आरोपीविरोद्धात गुन्हा दाखल केला आहे.
advertisement
तर दुसरी घटनाही याच शहरातील आहे. चोरट्यांनी नियोजन करुन योग्य संधी साधत कंपनीच्या मागील बाजूस असलेल्या इमर्जन्सी एक्झिट जिन्याचा वापर केला. त्यानंतर दुसऱ्या मजल्यावरील खिडकीचे ग्रील तोडून त्यांनी कंपनीत प्रवेश केला. या कंपनीच्या लॉकरमध्ये असलेले तब्बल 1 लाख 20 हजरांची रोख रक्कम चोरुन नेली.
view comments
मराठी बातम्या/ठाणे/
Crime News : सूनसान रात्र अन् कुटुंबांचा आक्रोश! भिवंडीत एकामागोमाग एक घडलेल्या घटनांनी खळबळ; काय घडलं नेमकं?
Next Article
IPLमधील 'डील'चे गूढ! संघाची 15,300 कोटींना विक्री; फक्त जुना मालक नाही, BCCIला देखील मिळाले पैसे, गणित वाचून चक्रावून जाल
IPLमधील 'डील'चे गूढ! संघाची 15,300 कोटींना विक्री; जुना मालक नाही, BCCIला देखील मिळाले पैसे, गणित वाचून चक्रावून जाल
  • राजस्थान रॉयल्सची 15,300 कोटींना विक्री

  • मालकाच्या खिशात 3,000 कोटी कमी का?

  • BCCIला किती मिळाले? चक्रावून टाकणारे गणित

View All
advertisement