कडाक्याची थंडी, रड रड रडला अन् भुके वाचून जीव सोडला, दृश्य पाहून गावकरीही सुन्न
- Published by:Sachin S
Last Updated:
आश्रमशाळेजवळ स्थानिक नागरिकांना पहाटेच्या सुमारास रस्त्यावर जाताना कचऱ्याजवळ लहान बाळाचा मृतदेह असल्याचं निदर्शनास आलं.
राहुल पाटील, प्रतिनिधी
डहाणू : नऊ महिने गर्भात वाढवायचं आणि नकोशी झाली म्हणून कचऱ्यात फेकून द्यायचं, मागील काही दिवसांपासून अशा मानसिकतेच्या काळीज पिळवटून टाकणाऱ्या घटना समोर येत आहे. अशातच पालघर जिल्ह्याच्या डहाणू तालुक्यातील साखरे गावात एक हृदयद्रावक घटना समोर आली आहे. एका आश्रमशाळेजवळ आज नवजात अर्भक मृतावस्थेत कचऱ्याच्या ढिगाऱ्यात आढळून आलं आहे. ही घटना उघडकीस येताच परिसरात एकच खळबळ उडाली असून परिसरातील नागरिकांकडून संताप व्यक्त करण्यात येतोय.
advertisement
मिळालेल्या माहितीनुसार, डहाणू येथील साखरे गावात ही घटना समोर आली आहे. गावात असलेल्या आश्रमशाळेजवळ स्थानिक नागरिकांना पहाटेच्या सुमारास रस्त्यावर जाताना कचऱ्याजवळ लहान बाळाचा मृतदेह असल्याचं निदर्शनास आलं. याची माहिती मिळताच वानगाव पोलिसांनी तातडीने घटनास्थळी धाव घेत अर्भकाच मृत शरीर पुढील वैद्यकीय तपासणी आणि शवविच्छेदनासाठी स्थानिक रुग्णालयात पाठवण्यात आलं आहे.
पोलिसांनी दिलेल्या प्राथमिक माहितीनुसार, हे अर्भक जन्मानंतर लगेचच कुणी तरी त्याला कचऱ्याच्या ढिगार्यात फेकलं असावं, कचऱ्यात फेकल्यामुळे अर्भकाचा थंडी, भूक किंवा श्वास गुदमरून मृत्यू झाला असावा, असा प्राथमिक अंदाज वानगाव पोलिसांनी व्यक्त केला आहे. या घटनेमुळे परिसरातून संताप व्यक्त होत असून दोषींवर कठोर कारवाईची मागणी होत आहे. पोलिसांनी परिसरातील सीसीटीव्ही फुटेज आणि इतर तांत्रिक माहिती गोळा करत आहे. लवकरच आरोपीला अटक केली जाईल, असं आश्वासन पोलिसांनी दिलंय.
advertisement
दोन आठवड्यातली दुसरी घटना
view commentsपालघर जिल्ह्याच्या विविध भागांत गेल्या काही वर्षांमध्ये नवजात शिशूंना सार्वजनिक ठिकाणी किंवा कचऱ्याच्या ढिगाऱ्यात सोडून देण्याच्या घटनांमध्ये वाढ झाल्याचं दिसून येत आहे. दोन आठवड्यांपूर्वीच पालघर रेल्वे स्थानकावरही एक दिवसाचे अर्भक आढळून आलं होतं, ज्याला पोलिसांनी जीवदान दिलं. आई-वडिलांना नको असलेल्या या नवजात अर्भकांना अनेकदा निर्जन भागात, कचरा जमा होण्याच्या ठिकाणी किंवा झुडपांमध्ये टाकले जाते. यामुळे पोलिसांना आरोपींचा शोध घेणे आणि पुरावे जमा करणे हे एक मोठे आव्हान ठरत आहे.
Location :
Palghar,Thane,Maharashtra
First Published :
December 03, 2025 6:37 PM IST


