advertisement

गुढी पाडव्यानिमित्त डोंबिवलीतील नेहरू मैदानात उभारलेली महाकाय 150 फुटांची गुढी

Last Updated:

यंदाच्या स्वागतयात्रेत डोंबिवलीच्या सांस्कृतिक संचितासोबतच राष्ट्रीयत्वाच्या विचारधारेचेही दर्शन घडले.

News18
News18
डोंबिवली: डोंबिवलीतील नववर्ष स्वागतयात्रेचे यंदाचे २८ वे वर्ष होते. या वर्षीचे अजून एक खास आकर्षण ठरले ते म्हणजे नेहरू मैदानात उभारलेली महाकाय दीडशे फुटांची गुढी.  विशाल हिंदुत्व आणि भव्य सांस्कृतिक सोहळ्याचे प्रतीक म्हणून ही महाकाय गुढी डौलाने उभारल्याचं प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांनी सांगितलं.
डोंबिवलीमध्ये गुढीपाडव्याच्या दिवशी शोभायात्राचं आयोजन करण्यात आलं होतं. यावेळी नेहरू मैदानात महाकाय दीडशे फुटांची गुढी उभारण्यात आली. या कार्यक्रमाला भाजपचे प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण उपस्थित होते.
"आपल्या हिंदू संस्कृतीच्या नव्या वर्षाची सुरुवात मंगलमय व्हावी आणि तरुण पिढीला आपल्या भारतीय संस्कृतीशी नाते टिकवून ठेवावे या उद्देशाने ही संकल्पना सांस्कृतिक डोंबिवलीत शहरातून श्री गणेश मंदिर संस्थानाच्या माध्यमातून सुरु झाली आणि याचा एक डोंबिवलीकर म्हणून कायमच अभिमान वाटतो, असे प्रतिपादन भाजपा महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष रविंद्र चव्हाण यांनी केले. या संकल्पनेचे श्रेय आबासाहेब पटवारी आणि सुधीर जोगळेकर या भाजपा संघ परिवारातील डोंबिवलीकरांना असल्याचे त्यांनी आवर्जून सांगितले.
advertisement
त्याच बरोबर डोंबिवलीतील शोभायात्रेत यावर्षी दोन ठळक गोष्टींनी लोकांचे लक्ष वेधले 'वंदे मातरम्' या राष्ट्रगानाचे शतकोत्तरी सुवर्णमहोत्सवी (१५०वे) वर्ष आणि राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे शताब्दी (१००वे) वर्ष यावर आधारित डोंबिवलीकर एक सांस्कृतिक परिवाराने २ चित्ररथ साकारले होते. हे चित्ररथ यंदाच्या स्वागतयात्रेचे विशेष आकर्षण ठरले. यामुळे यंदाच्या स्वागतयात्रेत डोंबिवलीच्या सांस्कृतिक संचितासोबतच राष्ट्रीयत्वाच्या विचारधारेचेही दर्शन घडले. हा दुर्मिळ असा दुग्ध शर्करा योग आल्याने यंदा डोंबिवलीकर परिवाराने याच राष्ट्रीयत्वाच्या विषयाला अनुसरून चित्ररथ साकारले.
advertisement
वंदे मातरमचा शतकोत्तर सुवर्ण महोत्सव आणि रास्व संघाच्या पंचसूत्रीवर आधारित चित्ररथाच्या संकल्पनेला अपेक्षेनुसार डोंबिवलीकरांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला याचा आनंद असल्याची प्रतिक्रिया भाजपा प्रदेशाध्यक्ष रविंद्र चव्हाण यांनी दिली.
तसंच, यंदाच्या वर्षी देशभक्तीची अनेक रूपं अशा आशयाची संकल्पना राबवली त्यास डोंबिवलीकरांचा प्रचंड प्रतिसाद लाभला. "क्रांतिकारी देशसेवक" या संकल्पनेवर आधारित वेशभूषा स्पर्धा झाली. त्यामध्ये ५ वर्षांच्या चिमुकल्यांपासून ७५ वर्षांच्या आजी आजोबांपर्यंत आबालवृद्धांनी सहभाग घेतला. विजेत्यास २५,००० रुपयांची रोख रक्कम देण्यात आले तर उपविजेत्यास १५,००० त्याचबरोबर अन्य पारितोषिके देण्यात आली.
view comments
मराठी बातम्या/ठाणे/
गुढी पाडव्यानिमित्त डोंबिवलीतील नेहरू मैदानात उभारलेली महाकाय 150 फुटांची गुढी
Next Article
एका रात्रीत भारतीयांनी ChatGPTचा नाद सोडला, मग कोणते App डाऊनलोड केले? नाव ऐकून बसेल आश्चर्याचा धक्का!
एका रात्रीत भारतीयांनी ChatGPTचा नाद सोडला, मग कोणते App डाऊनलोड केले?
  • भारतीय धडाधड डाऊनलोड करतायत हे App

  • ॲपसाठी उडाली झुंबड

  • नाव वाचून थक्क व्हाल

View All
advertisement