चैत्र नवरात्रोत्सवात उभारली 70 फूटी तुळजाभवानी मंदिराची प्रतिकृती, कुठे आहे भव्य दिव्य सेट?
- Published by:Chetan Bodke
- local18
Last Updated:
उद्यापासून राज्यामध्ये चैत्र नवरात्रोत्सवाला सुरूवात होतेय. सध्या 70 फूटी तुळजाभवानी मंदिराची प्रतिकृतीची सोशल मीडियावर जोरदार चर्चा सुरू आहे.
ठाणे: उद्यापासून अर्थात 19 मार्चपासून चैत्र नवरात्रीला सुरूवात होणार आहे. चैत्र नवरात्र महाराष्ट्रामध्ये अनेक ठिकाणी साजरी केली जाते. ठाणेसह मुंबईतही मोठ्या जल्लोषामध्ये चैत्र नवरात्री साजरी होते. अशातच ठाण्यातील छत्रपती शिवाजी महाराज मैदानामध्ये, चैत्र नवरात्र साजरी केली जाते. माजी खासदार राजन विचारे यांच्या मार्गदर्शनाखाली आणि आनंद चॅरिटेबल ट्रस्टतर्फे आयोजित यंदाच्या चैत्र नवरात्रोत्साचे 31 वे वर्ष असणार आहे. पण यंदा एक आकर्षणाचा बिंदू असणार आहे, त्यामुळे सध्या या मंडळाची ठाण्यामध्ये जोरदार चर्चा सुरू आहे.
आनंद चेरिटेबल ट्रस्टकडून साजरी केली जाणाऱ्या चैत्र नवरात्रोत्सवात 70 फूट उंच तुळजाभवानी मंदिराची भव्य प्रतिकृती साकारली जाणार आहे, हे यंदाचे देखाव्याचे आकर्षणाचे केंद्रबिंदू ठरणार आहे. नाजूक कोरीवकाम आणि अनेक देव देवतांच्या मूर्तींनी डिझाईन केलेला 70 फूट उंच कळसाची प्रतिकृती उभारली आहे. पारंपरिक विधींसाठी 40 x 40 फूट क्षेत्रफळाचा यज्ञ होमकुंडासाठी विशेष जागा सुद्धा आहे. यंदाच्या चैत्र नवरात्रोत्सवाच्या सोहळ्यात धार्मिक विधींसह सांस्कृतिक कार्यक्रमांचीही मैफल ठाणेकरांना पाहायला मिळणार आहे. शहरातील भाविकांसाठी हा उत्सव एक अनोखा आध्यात्मिक अनुभव ठरणार आहे.
advertisement
गुढीपाडव्याच्या दिवशी म्हणजेच, गुरुवार, 19 मार्च 2026 रोजी सकाळी 10:00 वाजता कळवा बाजारातून निघणाऱ्या भव्य मिरवणुकीने उत्सवाला सुरुवात होईल. या मिरवणुकीत लेझीम पथके, भजन करणाऱ्या वारकाऱ्यांचा ग्रुप, आदिवासी समाजाची कलाकृती सादर करणारा ग्रुप आणि ब्रास बँडसह अशा 300 हून अधिक कलाकारांचा सहभाग असेल. भव्य दिव्य सेटच्या आधारे तुळजाभवानी मंदिराची भव्य प्रतिकृती सादर केली जाणार आहे. भाविकांना प्रवेशद्वारापासूनच प्रसन्न वाटेल, यात काहीच शंका नाही. आनंद चॅरिटेबल ट्रस्टकडून नवरात्रीमध्ये सांस्कृतिक कार्यक्रम ठेवण्यात आले आहेत. अनेक वेगवेगळ्या कार्यक्रमांची ठाणेकरांना आस्वाद घेता येणार आहे.
Location :
Thane,Maharashtra
First Published :
Mar 18, 2026 10:31 PM IST
मराठी बातम्या/ठाणे/
चैत्र नवरात्रोत्सवात उभारली 70 फूटी तुळजाभवानी मंदिराची प्रतिकृती, कुठे आहे भव्य दिव्य सेट?








