Bhiwandi News: जी बॅट घेऊन रोज मैदान गाजवायचा, तिच्यासाठी तरुणाचा गेला जीव, भिवंडीतील हृदयद्रावक घटना
- Published by:Chetan Bodke
- local18
Last Updated:
भिवंडीमध्ये एक धक्कादायक बातमी घटना घडली आहे. भिवंडीच्या समरू बाग परिसरात राहणाऱ्या एका तरूणाचा क्रिकेट खेळताना मृत्यू झाला.
भिवंडी: भिवंडीतून एक धक्कादायक बातमी समोर येत आहे. भिवंडी शहरामध्ये क्रिकेट खेळताना एका तरूणाचा मृत्यू झाला. 25 वर्षीय तरूण क्रिकेट खेळता खेळता शेजारी असलेल्या विहिरीमध्ये पडला. बराच वेळ झाला तो तरूण दिसत नसल्यामुळे परिसरामध्ये त्याची शोधाशोध सुरू झाली. तेव्हा त्याचा विहिरीमध्ये पडून मृत्यू झाल्याची उकल झाली आहे. 25 वर्षीय तरूणाच्या मृत्यूमुळे भिवंडी परिसरात नागरिकांवर दु:खाचा डोंगर कोसळला आहे.
नेमकं प्रकरण काय?
भिवंडीच्या समरू बाग परिसरात हा तरूण राहायला होता. रविवारी दुपारच्या सुमारास मित्रांसोबत क्रिकेट खेळत असताना विहिरीमध्ये पडलेली बॅट काढायला गेलेल्या बिलाल अन्सारी नावाच्या तरूणाचा मृत्यू झाला आहे. तो 25 वर्षाचा होता. क्रिकेट खेळत असताना त्या तरूणाची बॅट विहिरीमध्ये पडली. विहिरीमध्ये पडलेली बॅट बाहेर काढण्याचा तो प्रयत्न करत होता. पण तो विहिरीमध्ये पडला आणि त्याचा मृत्यू झाला. समरू बाग परिसरामध्ये असलेल्या जीन्स कंपनीच्या कम्पाऊंडमध्ये ही घटना घडली आहे.
advertisement
घटना
जीन्स कंपनीच्या कम्पाऊंडमधील विहीरीतच पडून तरूणाचा मृत्यू झाला. रविवारी (22 फेब्रुवारी) दुपारी क्रिकेट खेळत असताना बिलाल अन्सारीची बॅट विहिरीमध्ये पडली. विहिरीतली बॅट बाहेर काढण्यासाठी तो तरूण विहिरीमध्ये खाली उतरला. परंतू त्याला पाण्याचे प्रमाण कळाले नाही, म्हणून त्याचा मृत्यू झाल्याची घटना घडली आहे. बराच वेळ बिलाल बाहेर न आल्यामुळे आजूबाजूच्या नागरिकांमध्ये चर्चा होऊ लागली. म्हणून काहींनी विहीरीमध्ये डोकावून पाहिले. शेवटी नको तेच घडलं होतं. रविवारी दुपारी बिलाल पाण्यामध्ये बेशुद्ध अवस्थेत पडला होता. घटनेची माहिती स्थानिकांनी पोलिसांनी दिली.
advertisement
पोलिसांना घटनेची माहिती मिळताच तात्काळ घटनास्थळी पोलीस दाखल झाले. पोलीस घटनास्थळी दाखल झाल्यानंतरच त्या तरूणाला बाहेर काढण्यात आले. पण तो पर्यंत त्या तरूणाचा मृत्यू झाला होता. बाहेर काढल्यानंतर लगेचच पोलिसांनी तरूणाचा मृतदेह जवळच्या एका खासगी रूग्णालयात पोस्टमार्टमसाठी नेला. परिसरामध्ये 25 वर्षीय तरूणाच्या मृत्यूमुळे शोक व्यक्त केला जात आहे.
Location :
Bhiwandi Nizampur,Thane,Maharashtra
First Published :
Feb 23, 2026 8:35 PM IST
मराठी बातम्या/ठाणे/
Bhiwandi News: जी बॅट घेऊन रोज मैदान गाजवायचा, तिच्यासाठी तरुणाचा गेला जीव, भिवंडीतील हृदयद्रावक घटना









