Shocking : सुरक्षिततेची चिंता पित्याला नडली! छेडछाड करणाऱ्याची माहिती न दिल्याने मुलीनं...;ठाण्यातील घटना
Last Updated:
Thane Crime News : ठाण्यातील एका मुलीने वडिलांच्या एका कारणांमुळे घर सोडले. पण समोर आलेल्या कारणामुळे पोलिसही काही वेळ अवाक् झाले होते.
ठाणे : पालकांच्या बोलण्याचा मनात राग ठेवून अनेक अल्पवयीन मुल-मुली घरं सोडून जातात, बऱ्याचदा अशा घटना समोर आलेल्या आहेत. मात्र सध्या ठाणे शहरातून समोर आलेल्या घटनेने सर्वांना हादरुन सोडले आहे.
त्या रात्री काय घडले?
मिळालेल्या माहितीनुसार, ठाणे शहरातील रुपादेवी पाडा परिसरातील ही घटना आहे. या परिसरात राहणारी 15 वर्षीय मुलगी ही 10 मार्च रोजी रात्री काही काम असल्याचे सांगून बाहेर पडली. पण बरेच तास उलटूनही ती घरी परतली नाही,त्यामुळे घरच्यांची तिंचा वाढू लागली. सुरुवातीस मुलगीचा पत्ता न लागल्याने तिच्या कुटुंबियांनी परिसरात शोधाशोध सुरु केली.
advertisement
नातेवाईक अन् मित्र-मैत्रिणींकडेही पत्ता लागेना
परिसरात पाहून झाल्यानंतर तिच्या जवळच्या मित्र-मैत्रिणींच्या घरी शिवाय काही जवळच्या नातेवाइकांकडे चौकशी केली. पण सर्व प्रयत्न करुनही तिचा तपास कुठे लागला नसल्याने कुटुंबियांची चिंता अधिक वाढली. शेवटी जाऊन त्यांनी श्रीनगर पोलिस ठाण्यात मुलीच्या अपहरणाची तक्रार दाखल केली.
मुलीच्या कुटुंबियांची तक्रार मिळताच पोलिसांनीही तातडीने तपास सुरु केला. पोलिसांनी तिच्या परिसरातील माहिती गोळा करताना मुलगी ही तिच्या एका मैत्रिणीकडे गेल्याचे समोर आले असून ती त्या ठिकाणी सुरक्षित असल्याचे स्पष्ट झाले.
advertisement
सुरक्षिततेसाठी दिलेला दम मुलीला नडला
गेल्या काही दिवसांपूर्वी छेडछाड करणाऱ्या तरुणाविरोधात तक्रार करण्यासाठी मुलीचे वडील तिला सांगत होते. त्यातून वडिलांनी तिला ओरडल्याने तिच्या मनात राग भरला होता,या सर्व कारणांमुळे तिने घर सोडून मैत्रिणीकडे राहण्याचा निर्णय घेतला, असे पोलिस तपासात समोर आले.
Location :
Mumbai,Maharashtra
First Published :
Mar 15, 2026 7:30 AM IST
मराठी बातम्या/ठाणे/
Shocking : सुरक्षिततेची चिंता पित्याला नडली! छेडछाड करणाऱ्याची माहिती न दिल्याने मुलीनं...;ठाण्यातील घटना









