पालघरच्या तलासरीत गुजरातच्या घुसखोरीचा आरोप, दोन्ही राज्यांकडून संयुक्त सीमा मोजणी सुरू

Last Updated:

पालघरच्या वेवजी येथे महाराष्ट्र-गुजरात सीमावादावर संयुक्त मोजणी सुरू असून, अतिक्रमणाचा मुद्दा चर्चेत आहे. स्थानिकांनी प्रशासनावर वेळकाढूपणाचा आरोप केला आहे.

News18
News18
राहुल पाटील, प्रतिनिधी पालघर: महाराष्ट्र-गुजरात सीमाभागात असलेला वाद पुन्हा एकदा चर्चेत आला आहे. पालघर जिल्ह्याच्या तलासरी तालुक्यातील वेवजी ग्रामपंचायत हद्दीत गुजरात राज्याकडून 'घुसखोरी' सुरू असल्याचा आरोप यापूर्वी स्थानिक नागरिकांनी केला होता. या गंभीर आरोपांच्या पार्श्वभूमीवर आज महाराष्ट्र आणि गुजरात राज्याच्या प्रशासनाकडून वेवजी येथे संयुक्त सीमा निश्चिती मोजणीला सुरुवात करण्यात आली आहे.
संयुक्त मोजणीला सुरुवात
दोन्ही राज्यांमध्ये सीमावाद मिटवण्यासाठी आता प्रशासकीय स्तरावर हालचालींना वेग आला आहे. वेवजी ग्रामपंचायत हद्दीतील वादग्रस्त जागेची मोजणी सध्या सुरू आहे. या मोजणीसाठी पालघरच्या जिल्हा प्रशासनासह गुजरातच्या उंबरगावचे तहसीलदार, सार्वजनिक बांधकाम विभागाचे अधिकारी आणि भूमी लेख अधिकारी उपस्थित आहेत. दोन्ही राज्यांच्या अधिकाऱ्यांकडून ही संयुक्त मोजणी पार पडत आहे.
किती अतिक्रमण झाले, होणार स्पष्ट
या संयुक्त मोजणीनंतर गुजरात राज्यातील किती अतिक्रमण महाराष्ट्र सीमा हद्दीत आले आहे, हे स्पष्ट होणार आहे. वेवजी ग्रामस्थांनी केलेल्या आरोपामुळे हा नवा वाद निर्माण झाला होता आणि आता प्रशासकीय स्तरावर त्यावर तोडगा काढण्याचे प्रयत्न सुरू आहेत.
advertisement
स्थानिकांचा प्रशासनावर आरोप
या संयुक्त मोजणीच्या वेळेबद्दल मात्र स्थानिकांनी नाराजी व्यक्त केली आहे. सध्या विधानसभेचे अधिवेशन सुरू असतानाच जिल्हा प्रशासनाने ही मोजणी सुरू केली आहे. त्यामुळे जिल्हा प्रशासन केवळ वेळ मारून नेत आहे, असा आरोप स्थानिक नागरिकांकडून करण्यात येत आहे.
महाराष्ट्र आणि गुजरात राज्याचा पालघर जिल्ह्याच्या हद्दीत सुरू असलेला हा सीमावाद लवकरात लवकर मिटवण्यासाठी प्रशासनाने गंभीर पाऊले उचलावीत, अशी मागणी स्थानिकांनी केली आहे. या मोजणीच्या अंतिम अहवालाकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
view comments
मराठी बातम्या/ठाणे/
पालघरच्या तलासरीत गुजरातच्या घुसखोरीचा आरोप, दोन्ही राज्यांकडून संयुक्त सीमा मोजणी सुरू
Next Article
advertisement
Mahayuti : शिंदे गट–भाजपात कुरघोडीचा डाव, पण पडद्यामागे मोठ्या घडामोडी, महायुतीचा महापालिकेचा फॉर्म्युला ठरला
शिंदे–भाजपात कुरघोडीचा डाव, पण पडद्यामागे घडामोडी, महापालिकेसाठी फॉर्म्युला ठर
  • शिंदे–भाजपात कुरघोडीचा डाव, पण पडद्यामागे घडामोडी, महापालिकेसाठी फॉर्म्युला ठर

  • शिंदे–भाजपात कुरघोडीचा डाव, पण पडद्यामागे घडामोडी, महापालिकेसाठी फॉर्म्युला ठर

  • शिंदे–भाजपात कुरघोडीचा डाव, पण पडद्यामागे घडामोडी, महापालिकेसाठी फॉर्म्युला ठर

View All
advertisement