कायको आँख मै मिर्ची डाल रही है... शेजारच्या महिलेला 'मम्मा' म्हटल्याने मुलीच्या डोळ्यात मिरची पावडर टाकली
- Published by:Prachi Amale
Last Updated:
नराधम महिलेने चिमुकलीच्या डोळ्यांत आणि जिभेवर मिरचीची पूड टाकून तिला एका खोलीत डांबल्याचा संतापजनक प्रकार समोर आला आहे.
ठाणे : जिथे लहान मुलांचे बोबडे बोल ऐकून आनंद व्हायला हवा, तिथे त्याच बोलांमुळे एका तीन वर्षांच्या निरागस चिमुकलीला नरकयातना भोगाव्या लागल्याची धक्कादायक घटना कल्याणमध्ये उघडकीस आली आहे. कल्याणमधील बैलबाजार परिसरातील झंकार मोहल्ला येथे एका महिलेने आपल्याच दत्तक घेतलेल्या तीन वर्षाच्या मुलीला अमानुषपणे मारहाण केली. इतकेच नव्हे, तर या नराधम महिलेने चिमुकलीच्या डोळ्यांत आणि जिभेवर मिरचीची पूड टाकून तिला एका खोलीत डांबल्याचा संतापजनक प्रकार समोर आला आहे. या घटनेचा व्हिडीओ व्हायरल झाला आहे.
समोर आलेल्या माहितीनुसार, व्हायरल झालेल्या व्हिडीओमधील तीन वर्षांच्या मुलीला या कुटुंबाने दत्तक घेतले आहे. घटनेच्या दिवशी या चिमुकलीने सहजपणे शेजारच्या एका महिलेला 'मम्मा' म्हणून हाक मारली. या एका शब्दाने आरोपी महिला इतकी संतप्त झाली की, तिने माणुसकीच्या सर्व सीमा ओलांडल्या. तिला पुन्हा मम्मा म्हणशील का? तिला पप्पी देशील का? असे म्हणत या महिलेने लहान मुलीला बेदम मारहाण करण्यास सुरुवात केली.
advertisement
नको... नाही.. म्हणत होती पण...
महिलेचा संताप इतक्यावरच थांबला नाही. तिने चिमुकलीच्या डोळ्यांत आणि जिभेवर मिरचीची पूड टाकली. डोळ्यांची आग होत असल्याने ती लहान मुलगी रडत ओरडत होती, "नको... नाही..." म्हणून विनवणी करत होती, पण या उलट्या काळाजाच्या महिलेला तिची दया आली नाही. या उलट तिने मुलीला एका खोलीत कोंडून ठेवले. या घटनेचा व्हिडिओ घरातच असलेल्या एका इसमाने बनवला आहे.
advertisement
कल्याणमध्ये संतापाची लाट उसळली
व्हिडिओमध्ये हा इसम त्या महिलेला समजावताना दिसत आहे. 'कशाला तिच्या डोळ्यात मिरची टाकतेय? लहान मुलगी आहे ती, उद्या काही झालं तर आपण गोत्यात येऊ, असे तो सांगत होता. मात्र, रागाच्या भरात असलेल्या या महिलेने कोणाचेही ऐकले नाही. हा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाल्यानंतर कल्याणमध्ये संतापाची लाट उसळली आहे.
advertisement
मुलांच्या सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर
दत्तक घेतलेल्या मुलांशी अशा प्रकारचे वर्तन करणे हा केवळ गुन्हा नसून तो सामाजिक कलंक आहे. या चिमुकलीवर ओढवलेला हा प्रसंग पाहून पोलिसांनी या प्रकरणाची दखल घेत आरोपी महिलेवर कठोर कारवाई करण्याची मागणी केली आहे. चिमुकलीला सुरक्षित स्थळी हलवावे आणि त्या निर्दयी महिलेला कायद्याचा धडा शिकवावा, अशी मागणी होत आहे.
advertisement
Location :
Thane,Maharashtra
First Published :
Mar 07, 2026 5:38 PM IST
मराठी बातम्या/ठाणे/
कायको आँख मै मिर्ची डाल रही है... शेजारच्या महिलेला 'मम्मा' म्हटल्याने मुलीच्या डोळ्यात मिरची पावडर टाकली








