Boisar Crime : धक्कादायक! क्षुल्लक वाद विकोपाला गेला; नातेवाईकांच्या डोळ्यादेखत पुतण्याकडून काकूची निर्घृण हत्या

Last Updated:

Boisar Crime News : बोईसरजवळ तारापूर परिसरात मद्यपानास विरोध केल्याने पुतण्याने कुऱ्हाडीने काकीची निर्घृण हत्या केली. या प्रकरणी तारापूर पोलिसांत गुन्हा दाखल असून आरोपी फरार आहे.

News18
News18
ठाणे : बोईसरजवळील तारापूर परिसरात मद्यपानास विरोध केल्याच्या क्षुल्लक कारणावरून पुतण्याने काकीची निर्घृण हत्या केल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. या प्रकरणी तारापूर पोलीस ठाण्यात खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला असून आरोपी अद्याप फरार आहे. घटनेनंतर परिसरात भीतीचे वातावरण पसरले आहे.
पुतण्याने घरच्यांसमोर काकूचा घेतला जीव
परनाळी येथील आंबात पाडा परिसरात नातेवाईक एकत्र येऊन घरातील एका विषयावर चर्चा करत होते. याच वेळी रमा काशिनाथ दांडेकर (वय 59) यांनी पुतण्या हरेश प्रवीण दांडेकर याला मद्यपान करू नये असे सांगितले. मात्र या साध्या विरोधाचा हरेशला प्रचंड राग आला. संतापाच्या भरात त्याने जवळच असलेल्या कुऱ्हाडीने रमा दांडेकर यांच्या डोक्यात जोरदार वार केला.
advertisement
हा हल्ला इतका गंभीर होता की रमा दांडेकर जागीच कोसळल्या. नातेवाईकांनी त्यांना तातडीने मदत करण्याचा प्रयत्न केला. मात्र गंभीर जखमांमुळे त्यांचा मृत्यू झाला. घटनेनंतर आरोपी हरेश दांडेकर घटनास्थळावरून पळून गेला. या घटनेची माहिती मिळताच तारापूर पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. सध्या मृतदेह शवविच्छेदनासाठी पाठवण्यात आला असून आरोपीविरोधात भारतीय दंड संहितेनुसार खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलीस आरोपीचा शोध घेण्यासाठी विशेष पथके तयार करून परिसरात शोधमोहीम राबवत आहेत.
view comments
मराठी बातम्या/ठाणे/
Boisar Crime : धक्कादायक! क्षुल्लक वाद विकोपाला गेला; नातेवाईकांच्या डोळ्यादेखत पुतण्याकडून काकूची निर्घृण हत्या
Next Article
advertisement
BMC Election : बीएमसी निवडणुकीत उलथापालथ, वॉर्ड २२६ मध्ये गेम फिरला, नार्वेकरांना निवडणूक जड?  मनसेने खेळ बिघडवला
BMCमध्ये उलथापालथ,,वॉर्ड २२६ मध्ये मनसेने गेम फिरवला, नार्वेकरांना निवडणूक जड?
  • मुंबई महापालिका निवडणुकीत काही ठिकाणी चांगलीच उलथापालथ झाली आहे.

  • वॉर्ड क्रमांक २२६ मधील निवडणूक चांगलीच चर्चेत आली आहे.

  • राजकीय समीकरणे चांगलीच बदलली असून मनसेच्या एका डावाने सगळा खेळ बिघडला आहे.

View All
advertisement